पैठणच्या पांडुरंगालाहोळीनिमित्त अभिषेक

पैठण – .होळी पौर्णिमेनिमित्त काल शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज मंदिरातील या भगवंत विजयी पांडुरंग मूर्तीसह देवांना अभिषेक करण्यात आला. तसेच संध्याकाळी नवग्रह मंदिराजवळ होलिका उत्सव साजरा करण्यात आला.

अभिषेकानंतर बुधवार २७ मार्च रोजी तुकाराम बीजेच्या शुभ मुहूर्तावर येथील पवित्र रांजनाचे पूजन करून त्यात कावडीद्वारे पवित्र गंगा गोदावरीचे जल प्रवाहित करण्यात येणार आहे. याच दिवसापासून नाथषष्टी यात्रेला औपचारिक सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी काल होलिका उत्सव निमित्य विजयी पांडुरंगांना अभिषेक करून गुलाल अबीर उधळत गोडगाठींचा आरास करण्यात आली होती.
पैठण गावातील मंदिराच्या देवघरात पांडुरंगाची एक वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे. पांडुरंगाची ही मूर्ती सदैव फुले व वस्त्र अलंकाराने झाकलेली असते. त्यामुळे या मूर्तीचे फक्त मुखकमल दर्शन होत असते. तसेच या मूर्तीतील पांडुरंगाचा डावा कमरेवर तर उजवा हात तळवा पुढे करून कमरेच्या खाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top