रिलायन्स व्हायकॉम १८ मधील पॅरामाउंटचा हिस्सा खरेदी करणार

मुंबई :

रिलायन्स इंडस्ट्रीजने एंटरटेन्मेट नेटवर्क व्हायकॉम १८ मीडियामधील पॅरामाउंट ग्लोबलचा संपूर्ण १३.०१ टक्के हिस्सा खरेदी करण्यास सहमती दर्शवली आहे. या कराराची किंमत सुमारे ४ हजार २८६ कोटी रुपये असेल.

रिलायन्स इंडस्ट्रीजने दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स आणि पॅरामाउंट ग्लोबलच्या दोन सहाय्यक कंपन्यांमध्ये एकूण ४ हजार २८६ कोटी रुपयांमध्ये पॅरामाउंट ग्लोबलद्वारे व्हायकॉम १८ मीडियाची १३.०१ टक्के हिस्सा खरेदी करण्यास सहमती दर्शवली आहे. हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर, रिलायन्सचा व्हायकॉम १८मधील हिस्सा पूर्णतः डाइल्यूटेड बेसिसवर ७०.४९ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. सध्या रिलायन्सकडे व्हायकॉमचे १८ टक्के शेअर आहेत. ते ५७.४८ टक्क्यांच्या इक्विटी स्टेकच्या बरोबरीचे आहेत.
दरम्यान, व्हायकॉम १८ रिलायन्सच्या मालकीचे ४० टीव्ही चॅनेलचे नेटवर्क चालवते. यामध्ये कॉमेडी सेंट्रल, निकेलोडियन आणि एमटीव्ही सारख्या लोकप्रिय ब्रँडचा समावेश आहे. पॅरामाउंटने करार पूर्ण झाल्यानंतर व्हायकॉम १८ ला कंटेंटचे लायसन्स देणे सुरू ठेवण्याचे मान्य केले आहे. पॅरामाउंटचा कंटेंट सध्या रिलायन्सच्या जिओ सिनेमा प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top