पंतप्रधानांच्या शाळेत प्रेरणा अभ्यासदौरा

नवी दिल्ली – गुजरातच्या वडनगर येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शाळेत सात दिवसांच्या अभ्यास दौऱ्यावर जाण्याची संधी देशातल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ही योजना आखली आहे.
या अभ्यास दौऱ्यासाठी शिक्षण मंत्रालयाने एक पोर्टल विकसित केले असून त्यामध्ये देशभरातले विद्यार्थी नोंदणी करू शकतील. देशातले ९ वी ते १२ पर्यंतचे विद्यार्थी या अभ्यास दौऱ्यात सहभागी होऊ शकणार आहेत.

वर्षभर दर आठवड्याला १० विद्यार्थी आणि १० विद्यार्थीनींची निवड या अभ्यास दौऱ्यासाठी करण्यात येईल. प्रेरणा एक प्रायोगिक शिक्षण कार्यक्रम असे या योजनेचे नाव असून याद्वारे अर्थपूर्ण, विशेष आणि प्रेरणादायी अनुभव मिळणार आहे. याद्वारे अभ्यास दौऱ्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुणही विकसित होतील, असेही शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top