Sharad Pawar Admit – राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते (Nationalist Congress Party leader)शरद पवार यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic)येथे दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील दोन दिवस रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे
मागील आठवड्यातही शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर याच रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र पुन्हा अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही मिनिटांतच त्यांना सलाईन लावण्यात आले असून, सध्या डॉक्टरांची विशेष टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. ते सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत.
रुबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ ग्रँट (Dr. Parvez Grant)यांनी माहिती दिली की, पवारांची रक्ताची चाचणी आणि सिटीस्कॅन करण्यात आले असून सर्व रिपोर्ट समाधानकारक (नॉर्मल) आहे.सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून केवळ विश्रांती आणि पुढील उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. दिवसात डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांना अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे तपासण्या आणि उपचारासाठी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत त्यांची मुलगी आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसद्वारे (WhatsApp status) माहिती दिली. त्यांनी स्टेटसमध्ये म्हटले आहे की, “आम्ही बाबांना पुन्हा पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये अॅडमिट केले आहे. त्यांना हायड्रेशनचा त्रास (dehydration issue)होत होता आणि काही तपासण्या बाकी आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. बाबांवर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे मनापासून आभार.
We are admitting Baba to Ruby Hall, Pune for follow-up tests and hydration.
— Supriya Sule (@supriya_sule) February 22, 2026
Thanking all the doctors and healthcare workers.
राज्यसभा निवृत्तीपूर्वी लेकीची शरद पवारांसाठी लक्षवेधी पोस्ट
राज्यातील सात राज्यसभा खासदारांचा मार्च २०२६ मध्ये कार्यकाळ संपणार आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाही समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांची लेक आणि लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी लक्षवेधी एक्स पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी जुना फोटो शेअर करत शरद पवार यांच्या सहा दशकांच्या संसदीय आणि राजकीय प्रवासाला उजाळा देत कार्यकर्ते व जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

सुप्रिया सुळे यांनी एक्सवर लिहिले की, आदरणीय पवार साहेब यांची संसदीय कारकीर्द आज साठाव्या वर्षांत पदार्पण करीत आहे. या सहा दशकांच्या काळात कित्येक महत्त्वाच्या घडामोडींचे ते साक्षीदार आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी सहा वेळा तर एकदा विधानपरिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. तब्बल सात वेळा ते लोकसभेत निवडून गेले तर दोन वेळा त्यांनी राज्यसभेत प्रतिनिधित्व केले आहे. सन १९६७ साली आजच्या दिवशी सुरू झालेला हा अविजीत प्रवास आजही अव्याहतपणे सुरु आहे. या संपूर्ण प्रवासात त्यांच्यासोबत त्यांचे जीवाभावाचे सोबती, कार्यकर्ते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मायबाप जनता ठामपणे उभे राहिले. जनतेने आदरणीय त्यांच्यावर अलोट प्रेम केले, प्रचंड विश्वास टाकला. या विश्वासाच्या बळावरच हा प्रवास शक्य झाला आहे. याबद्दल या सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार.
आदरणीय पवार साहेब यांची संसदीय कारकीर्द आज साठाव्या वर्षांत पदार्पण करीत आहे. या सहा दशकांच्या काळात कित्येक महत्त्वाच्या घडामोडींचे ते साक्षीदार आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी सहा वेळा तर एकदा विधानपरिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. तब्बल सात वेळा ते लोकसभेत… pic.twitter.com/rLkURdFVqV
— Supriya Sule (@supriya_sule) February 22, 2026
हे देखील वाचा –
स्वीकृत नगरसेवक निवडीवरून मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ नाराज
वाल्मिक कराडच्या मुलांपासून आम्हाला धोका’; महादेव मुंडेंच्या पत्नीची थेट एसपींकडे धाव











