Home / लेख / BSNL Plans: बीएसएनएलचा धमाका! फक्त 999 रुपयांत 5000GB डेटा आणि सुपरफास्ट स्पीड; खाजगी कंपन्यांचे टेन्शन वाढले

BSNL Plans: बीएसएनएलचा धमाका! फक्त 999 रुपयांत 5000GB डेटा आणि सुपरफास्ट स्पीड; खाजगी कंपन्यांचे टेन्शन वाढले

BSNL Superstar Broadband plan 999 details : खाजगी टेलिकॉम कंपन्यांना तगडी टक्कर देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (BSNL) एक...

By: Team Navakal
BSNL Superstar Broadband plan 999 details
Social + WhatsApp CTA

BSNL Superstar Broadband plan 999 details : खाजगी टेलिकॉम कंपन्यांना तगडी टक्कर देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (BSNL) एक जबरदस्त ब्रॉडबँड प्लॅन सादर केला आहे. करोडो युजर्सना आकर्षित करण्यासाठी कंपनीने केवळ 999 रुपयांत इंटरनेटचा महाखजिना खुला केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना हाय-स्पीड इंटरनेटसोबतच मनोरंजनाची मेजवानीही मिळणार आहे.

999 रुपयांच्या प्लॅनमध्ये काय मिळेल?

BSNL ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून या ‘सुपरस्टार ब्रॉडबँड’ प्लॅनची घोषणा केली आहे. या प्लॅनची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

  • सुपरफास्ट स्पीड: युजर्सना घरामध्ये 200Mbps या वेगाने इंटरनेट वापरता येईल.
  • डेटाचा पाऊस: या प्लॅनमध्ये दरमहा तब्बल 5TB म्हणजेच 5000GB डेटा दिला जात आहे.
  • अनलिमिटेड कॉलिंग: इंटरनेटसोबतच देशभरात कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे.
  • OTT चे फ्री सबस्क्रिप्शन: या प्लॅनमध्ये JioHotstar, Zee5, Hungama, Shemaroo.me आणि Epic ON सारख्या लोकप्रिय ओटीटी ॲप्सचा मोफत एक्सेस मिळेल.

स्वस्त मोबाईल प्लॅनही लाँच

ब्रॉडबँडसोबतच बीएसएनएलने मोबाईल युजर्ससाठी 799 रुपयांचा एक स्वस्त प्लॅन आणला आहे. यामध्ये ग्राहकांना 150 दिवसांची मोठी वैधता मिळते. तसेच दररोज 2GB डेटा, मोफत रोमिंग आणि रोज 100 एसएमएस दिले जात आहेत.

5G सेवेची तयारी

देशभरात आपली कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी बीएसएनएलने आतापर्यंत 1 लाख नवीन 4G मोबाईल टॉवर्स उभे केले आहेत. लवकरच दिल्ली आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये कंपनी आपली हाय-स्पीड 5G सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. खाजगी कंपन्यांच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर बीएसएनएलचे हे स्वस्त प्लॅन ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहेत.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या