Home / मनोरंजन / Adhokshaj Karhade: मुलाचं नाव ‘अक्षोभ्य’ का ठेवलं? ट्रोल करणाऱ्यांना अभिनेता अधोक्षज कऱ्हाडेने दिलं सडेतोड उत्तर

Adhokshaj Karhade: मुलाचं नाव ‘अक्षोभ्य’ का ठेवलं? ट्रोल करणाऱ्यांना अभिनेता अधोक्षज कऱ्हाडेने दिलं सडेतोड उत्तर

Adhokshaj Karhade Son Name : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि कवी संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ, अभिनेता अधोक्षज कऱ्हाडे सध्या त्याच्या मुलाच्या...

By: Team Navakal
Adhokshaj Karhade Son Name
Social + WhatsApp CTA

Adhokshaj Karhade Son Name : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि कवी संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ, अभिनेता अधोक्षज कऱ्हाडे सध्या त्याच्या मुलाच्या नामकरणामुळे चर्चेत आहे. अधोक्षजने आपल्या चिमुकल्याचे नाव ‘अक्षोभ्य’ ठेवले आहे.

हे नाव उच्चारण्यास कठीण असल्याचे म्हणत काहींनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले, तर काहींनी या हटके नावाची प्रशंसा केली. अखेर या नावामागील नेमका विचार काय आहे, याचा खुलासा स्वतः अधोक्षजने एका मुलाखतीत केला आहे.

ट्रेंड नाही, तर संस्कृती जपण्याचा प्रयत्न

अधोक्षज म्हणाला की, त्याने हे नाव कोणत्याही आधुनिक ट्रेंडचा भाग म्हणून ठेवलेले नाही. उलट, आजच्या फॅशनेबल नावांच्या गर्दीत हरवलेली आपली भारतीय आणि हिंदू संस्कृती जपण्याचा हा एक प्रयत्न आहे. ‘अक्षोभ्य’ हे नाव पौराणिक असून ते भगवान विष्णूच्या हजार नावांपैकी (विष्णुसहस्त्रनाम) एक आहे. तसेच, जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या पाच प्रमुख बुद्धांपैकी एकाचे नावही ‘अक्षोभ्य’ आहे.

कऱ्हाडे कुटुंबातील नावांचे ‘विष्णू’ कनेक्शन

कऱ्हाडे कुटुंबात केवळ अधोक्षजच्या मुलाचेच नाही, तर सर्वांचीच नावे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. यामागचे कारण सांगताना तो म्हणाला:

  • कऱ्हाडे कुटुंबाचे कुलदैवत तिरुपती बालाजी आहे.
  • कुटुंबातील गोविंद (वडील), अनंत (आजोबा), संकर्षण (भाऊ), अधोक्षज आणि संकर्षणची मुले सर्वज्ञ व स्राग्वी ही सर्व नावे भगवान विष्णूच्या नावांवरूनच ठेवली आहेत.

मुलांच्या नावांतून देवाचे नामस्मरण

नावामागची आईची भावना स्पष्ट करताना अधोक्षजने सांगितले की, आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला देवाचे नामस्मरण करायला वेळ मिळत नाही. जर मुलांची नावे देवाची असतील, तर त्यांना हाक मारताना आपोआप देवाचे नाव मुखात येईल, हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे.

नाव अवघड नसतं, सवय हवी!

नाव उच्चारताना अनेकांची बोबडी वळते, यावर भाष्य करताना अधोक्षजने स्पष्ट सांगितले की, “कोणतेही नाव अवघड नसते, फक्त आपल्याला ते उच्चारण्याची सवय नसते. जर आपण स्तोत्रे आणि मंत्रांचे नियमित पठण केले, तर आपले उच्चार शुद्ध होतात आणि अशी नावे घेणे अजिबात कठीण वाटत नाही.”

हे देखील वाचा – 

FASTag Fraud Alert: सावधान! फास्टॅगच्या नावाखाली वाहनधारकांची मोठी फसवणूक; चुकूनही ‘या’ वेबसाईटवर करू नका पेमेंट

Sanju Samson Records: संजू सॅमसनने वानखेडेवर इतिहास रचला! रोहित-राहुलला मागे टाकत नोंदवले ‘हे’ 5 मोठे विक्रम

Trump on India : ट्रम्प यांच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानानंतर अमेरिकेकडून डॅमेज कंट्रोल; भारताने स्पष्ट केली भूमिका

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या