Home / देश-विदेश / Raghav Chadha News: राघव चड्ढांच्या भाजप प्रवेशानं ‘Gen Z’ भडकला; एका रात्रीत १० लाख फॉलोअर्स गायब

Raghav Chadha News: राघव चड्ढांच्या भाजप प्रवेशानं ‘Gen Z’ भडकला; एका रात्रीत १० लाख फॉलोअर्स गायब

Raghav Chadha News: दिल्लीच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून आम आदमी पार्टीला जय महाराष्ट्र करत राघव चड्ढा यांनी भाजपचा झेंडा हाती...

By: Team Navakal
Raghav Chadha News
Social + WhatsApp CTA

Raghav Chadha News: दिल्लीच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून आम आदमी पार्टीला जय महाराष्ट्र करत राघव चड्ढा यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यांच्यासोबत ‘आप’च्या ६ राज्यसभा खासदारांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मात्र, राजकारणातील या उलथापालथीचा सर्वात मोठा फटका राघव चड्ढा यांच्या लोकप्रियतेला बसला असल्याचे समोर आले आहे. विशेषतः ‘जेन झेड’ (Gen Z) म्हणजेच तरुण पिढीमध्ये त्यांच्या या निर्णयाबाबत तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे.

२४ तासांत १० लाखांचा फटका

सोशल मीडियावरील आकडेवारीनुसार, शुक्रवारी राघव चड्ढा यांचे इन्स्टाग्रामवर १४.६ दशलक्ष फॉलोअर्स होते. मात्र, भाजप प्रवेशाची बातमी येताच अवघ्या २४ तासांत शनिवारी दुपारी १ वाजेपर्यंत ही संख्या १३.५ दशलक्षवर आली आहे. म्हणजेच १० लाख फॉलोअर्सनी त्यांची साथ सोडली आहे.

तरुणांच्या प्रश्नांमुळे मिळवली होती ओळख

राघव चड्ढा यांनी आतापर्यंत संसदेत आणि सोशल मीडियावर तरुणांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न लावून धरले होते. यामध्ये खालील मुद्द्यांचा समावेश होता:

  1. गिग वर्कर्स: १० मिनिटांत डिलिव्हरी देणाऱ्या कंपन्यांकडून होणारी कामगारांची पिळवणूक. (स्वतः डिलिव्हरी पार्टनर बनून त्यांनी हा अनुभव घेतला होता).
  2. दैनंदिन गरजा: विमानतळावरील महागडे समोसे, डेटा लिमिट आणि ट्रॅफिकची समस्या.
  3. पितृत्व रजा (Paternity Leave): वडिलांना मिळणाऱ्या रजेचा मुद्दा त्यांनी संसदेत मांडला होता.

यामुळेच तरुणांमध्ये त्यांची प्रतिमा एक ‘वेगळा राजकारणी’ म्हणून निर्माण झाली होती. अभिनेत्री परिणीती चोप्राशी विवाहबद्ध झालेल्या चड्ढा यांनी स्वतःचा ‘जेन झेड’ पक्ष काढावा, अशी मागणीही त्यांचे चाहते करत होते.

‘Unfollow’ मोहिमेचा जोर

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राघव चड्ढा यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करणाऱ्या जुन्या पोस्ट डिलीट केल्या आहेत. यावरून ‘आप’ नेते सौरभ भारद्वाज यांनी टीका केली आहे.

सध्या सोशल मीडियावर #unfollowRaghavChadha हा ट्रेंड सुरू असून, अनेकजणांनी त्यांना अनफॉलो केल्याचे समोर आले आहे.

हे देखील वाचा – KL Rahul Record: केएल राहुलचा धमाका! आयपीएलमध्ये १५० धावांचा टप्पा ओलांडणारा पहिला भारतीय; मोडला १५ वर्षांपूर्वीचा विक्रम

Web Title:
संबंधित बातम्या