Home / News / International drug mafia Salim Dola arrested : आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया सलीम डोलाला इस्तंबूलमध्ये अटक! दाऊद इब्राहिमला मोठा धक्का

International drug mafia Salim Dola arrested : आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया सलीम डोलाला इस्तंबूलमध्ये अटक! दाऊद इब्राहिमला मोठा धक्का

Dawood Ibrahim – International drug mafia Salim Dola arrested – आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी रॅकेटचा प्रमुख सूत्रधार मानला जाणारा आणि...

By: Team Navakal
International drug mafia Salim Dola arrested
Social + WhatsApp CTA

Dawood Ibrahim – International drug mafia Salim Dola arrested – आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी रॅकेटचा प्रमुख सूत्रधार मानला जाणारा आणि भारताचा कुख्यात ड्रग्ज माफिया सलीम डोला याला तुर्कीमध्ये अटक करण्यात आली आहे.भारतीय सुरक्षा यंत्रणांनी याला दुजोरा दिला आहे. तुर्कीच्या सुरक्षा यंत्रणांनी इस्तंबूलमध्ये एक मोठी मोहीम राबवून भारतीय ड्रग्ज माफिया सलीम डोलाच्या मुसक्या बांधल्या.सलीम हा कराचीत असलेल्या दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी म्हणुन ओळखला जात होता.

मूळचा मुंबईतील डोंगरीतील असलेला सलीम डोला याला तुर्की देशामध्ये अटक केली असल्याने त्याचे भारताकडे प्रत्यार्पण होणार की नाही याबाबत साशंकता आहे.त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस देखील जारी केली होती.काही महिन्यांपूर्वी सांगली जिल्ह्यात एमडी ड्रग्जच्या एका कारखान्यावर पोलिसांनी धाड मारली होती.

त्यावेळी २५० कोटींचे ड्रग्ज जप्त केले होते.तेव्हापासून सलीम फरार झाला होता. केंद्रीय अन्वेषण विभागाने जारी केलेल्या इंटरपोल अलर्टनंतर सलीम डोलाला ताब्यात घेण्यात आले.सलीम हा दाऊदच्या अमली पदार्थ व्यवसायातील सर्व गुप्त माहिती असलेला व्यक्ती मानला जातो.जर त्याला भारतात आणले गेले आणि त्याची सखोल चौकशी झाली, तर दाऊदच्या जागतिक ड्रग्ज नेटवर्कचे अनेक धक्कादायक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये मुंबई पोलिसांनी सलीम डोला यांचा मुलगा ताहिर डोला याच्यासह त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांना दुबईतून अटक केली.

कारचोर ते ड्रग्ज डॉन! दाऊदचा खास माणूस सलीम डोलाची थरारक कहाणी

मुंबईच्या डोंगरी भागात राहणारा सलीम डोला याने गुन्हेगारी जगतातील प्रवास एका साध्या कारचोरापासून सुरू केला. सुरुवातीला वाहन चोरी करणारा डोला हळूहळू अंडरवर्ल्डच्या संपर्कात आला आणि पुढे Dawood Ibrahimच्या छत्रछायेखाली काम करणाऱ्या अमली पदार्थ तस्कर Iqbal Mirchiला सामील झाला.इक्बाल मिर्चीच्या तस्करीच्या साम्राज्यात डोलाने विश्वासू साथीदार म्हणून स्थान मिळवले. पैशांची उलाढाल, परदेशातील संपर्क आणि अमली पदार्थांची तस्करी यामध्ये तो पारंगत झाला. मात्र २०१३ मध्ये London येथे हृदयविकाराच्या झटक्याने इक्बाल मिर्चीचा मृत्यू झाला आणि या साम्राज्याचा कारभार डळमळीत झाला.यानंतर दाऊद इब्राहिमने आपल्या ड्रग्ज नेटवर्कची सूत्रे पाकिस्तानी नागरिक जबीर मोतीवाला याच्याकडे सोपवली.

मोतीवाला काही काळ कारभार पाहत होता, पण Federal Bureau of Investigationने त्याच्यावर अमेरिकेत अमली पदार्थ आयात, मनी लाँडरिंग आणि दाऊदशी संबंध असल्याचे आरोप ठेवत त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली.लंडनमध्ये दीर्घकाळ चाललेल्या वादग्रस्त न्यायप्रक्रियेनंतर एफबीआयने अचानक आपला दावा मागे घेतला आणि मोतीवाला २०२१ मध्ये Karachiला परतला. मात्र त्यावेळी त्याची प्रकृती खालावलेली होती.याच संधीचा फायदा घेत दाऊदने पुन्हा एकदा जुना, विश्वासू आणि धाडसी चेहरा पुढे आणला सलीम डोला. कारचोरीपासून सुरू झालेला त्याचा प्रवास आता आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ साम्राज्याच्या प्रमुखपदापर्यंत पोहोचला होता.

सलीम डोलाच्या गुन्हेगारी साम्राज्याचा खरा चेहरा तेव्हा समोर आला, जेव्हा त्याच्या गुप्त औषधनिर्मिती नेटवर्कचा पर्दाफाश झाला. बाहेरून साधे उद्योगधंदे वाटणाऱ्या ठिकाणी आत मात्र कोट्यवधींच्या ड्रग्जचा काळा व्यवसाय सुरू होता.डोलाने आपल्या साथीदारांसह, आणि स्वतःच्या मुलगा ताहेरलाही या जाळ्यात उतरवले होते. Sangli, Satara आणि Surat येथील गुप्त युनिट्समध्ये मेफेड्रोन अर्थात एमडी ड्रग्जचे उत्पादन सुरू होते. ही फक्त तस्करी नव्हती, तर थेट उत्पादनापासून पुरवठ्यापर्यंतचे पूर्ण जाळे होते.या साम्राज्याचा धागा हाताला लागला तो मोहम्मद सलीम शेखच्या चौकशीतून. ताहेरसोबत Dubaiहून प्रत्यार्पित करण्यात आलेल्या शेखने चौकशीत अनेक धक्कादायक माहिती उघड केली.

त्यानंतर तपास यंत्रणा सतर्क झाली.Sangli येथील कारखान्यावर छापा टाकण्यात आला आणि तिथे आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल २५० कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. या कारवाईने संपूर्ण अंडरवर्ल्ड हादरले. मात्र मुख्य सूत्रधार सलीम डोला तेव्हाच फरार झाला.तपासात असेही समोर आले की, डोलाकडे पाकिस्तानी पासपोर्ट होता. त्यामुळे त्याला सहजपणे Pakistanमध्ये ये-जा करता येत होती. याचमुळे तो अनेक वर्षे कायद्याच्या हाताबाहेर राहिला.अंडरवर्ल्ड वर्तुळात सलीम डोला हा केवळ ड्रग्ज निर्माता नव्हता, तर Mumbaiतील बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत ड्रग्ज पोहोचवणारा मोठा पुरवठादार म्हणूनही त्याची ओळख होती. ग्लॅमरच्या दुनियेच्या पडद्यामागे त्याचे काळे साम्राज्य शांतपणे फोफावत होते.


Web Title:
संबंधित बातम्या