Samsung Mini LED TV: सॅमसंगने भारतीय बाजारपेठेत आपले तंत्रज्ञान अधिक प्रगत करत नवीन Vision AI-powered Mini LED TV लाइनअप सादर केली आहे. हे टीव्ही केवळ उत्कृष्ट चित्र गुणवत्तेसाठीच नाही, तर प्रगत एआय फीचर्स आणि गेमिंगसाठी खास डिझाइन करण्यात आले आहेत. या नवीन श्रेणीमध्ये ग्राहकांना आधुनिक डिस्प्ले तंत्रज्ञानासोबतच दीर्घकालीन सॉफ्टवेअर सपोर्टचाही अनुभव घेता येणार आहे.
Samsung Mini LED TV ची किंमत आणि ऑफर्स
भारतात सॅमसंगच्या या नवीन टीव्ही मालिकेची सुरुवातीची किंमत 42,990 रुपये आहे. लाँचिंग ऑफर म्हणून कंपनी निवडक कार्ड्सवर 5% पर्यंत कॅशबॅक आणि शून्य डाउन पेमेंटसह 30 महिन्यांपर्यंत सुलभ ईएमआय (EMI) पर्याय देत आहे. हे टीव्ही प्रमुख रिटेल स्टोअर्स, फ्लिपकार्ट आणि सॅमसंगच्या अधिकृत वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
Samsung Mini LED TV : प्रमुख वैशिष्ट्ये आणि स्पेसिफिकेशन्स
या नवीन सिरीजमध्ये 43 इंच ते 100 इंच अशा विविध स्क्रीन साईजचे पर्याय उपलब्ध आहेत.
- डिस्प्ले तंत्रज्ञान: यामध्ये अचूक बॅकलाइट कंट्रोलसाठी लहान LEDs चा वापर करण्यात आला आहे. पिक्सेल-लेव्हल अचूकतेसाठी ‘प्युअर स्पेक्ट्रम कलर’ आणि 90% पेक्षा जास्त वाइड कलर गॅमटसाठी फॉस्फर तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
- गेमिंग आणि स्पोर्ट्स: गेमिंग प्रेमींसाठी यामध्ये ‘मोशन एक्सलरेटर 144Hz’ तंत्रज्ञान दिले आहे, जे वेगवान दृश्यांदरम्यान चित्र अस्पष्ट होऊ देत नाही.
- प्रोसेसर: टीव्हीमध्ये NQ4 AI Gen2 प्रोसेसर असून तो रिअल-टाइम पिक्चर आणि साउंड ऑप्टिमायझेशनसाठी काम करतो. हा प्रोसेसर एआय अपस्केलिंगला सपोर्ट करतो, ज्यामुळे जुन्या दर्जाचे व्हिडिओ देखील हाय-डेफिनिशनमध्ये दिसतात.
Samsung Mini LED TV : ७ वर्षांपर्यंत ओएस अपडेट्स
सॅमसंगचे हे नवीन टीव्ही One UI Tizen वर चालतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, कंपनीने या टीव्हीसाठी पुढील 7 वर्षांपर्यंत ओएस (OS) अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय ‘Samsung TV Plus’ द्वारे युजर्सना 14 भाषांमध्ये 150 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चॅनेल्स विनामूल्य पाहता येतील.
सुरक्षेसाठी यामध्ये सॅमसंग नॉक्स (Knox) आणि स्मार्ट होम मॅनेजमेंटसाठी स्मार्टथिंग्स इंटिग्रेशन देण्यात आले आहे. मेटालिक बॉडी आणि स्लिम बेझल्समुळे हा टीव्ही तुमच्या घराच्या सौंदर्यात अधिक भर घालेल.
हे देखील वाचा – UFO Disclosure: एलियन्सचे अस्तित्व सिद्ध होणार? अमेरिकेकडून UFO संबंधित हजारो फाईल्स सार्वजनिक










