Home / लेख / डिस्प्ले पाहून लॅपटॉपही विसराल! दमदार फीचर्ससह Motorola चा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन Razr Fold लाँच

डिस्प्ले पाहून लॅपटॉपही विसराल! दमदार फीचर्ससह Motorola चा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन Razr Fold लाँच

Motorola Razr Fold price and specifications India : स्मार्टफोन जगतात आपल्या फोल्डेबल उपकरणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मोटोरोला कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपला...

By: Team Navakal
Motorola Razr Fold price and specifications India
Social + WhatsApp CTA

Motorola Razr Fold price and specifications India : स्मार्टफोन जगतात आपल्या फोल्डेबल उपकरणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मोटोरोला कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपला आतापर्यंतचा सर्वात प्रगत फोन Motorola Razr Fold अधिकृतपणे लाँच केला आहे. हा फोन केवळ डिझाइनमध्येच नाही, तर फीचर्सच्या बाबतीतही प्रतिस्पर्धी कंपन्यांना मोठी टक्कर देणार आहे.

Motorola Razr Fold : किंमत आणि उपलब्धता

मोटोरोलाने हा फोन तीन वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे:

  1. 12GB + 256GB: १,४९,९९९ रुपये.
  2. 16GB + 512GB: १,५९,९९९ रुपये.
  3. FIFA World Cup 26 Edition (16GB + 512GB): १,६९,९९९ रुपये.

या फोनचे प्री-ऑर्डर सुरू झाले असून, २० मे २०२६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून फ्लिपकार्ट, रिलायन्स डिजिटल आणि मोटोरोलाच्या अधिकृत संकेतस्थळावर याची विक्री सुरू होईल.

Motorola Razr Fold : डिस्प्ले आणि परफॉर्मन्स

या फोनचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे याचे दोन डिस्प्ले. फोन उघडल्यावर ८.१ इंचाचा भव्य 2K LTPO pOLED मुख्य डिस्प्ले मिळतो, ज्याची ब्राइटनेस ६२०० निट्स इतकी प्रचंड आहे. तर बाहेरच्या बाजूला ६.५६ इंचाचा कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. वेगवान कामगिरीसाठी यात लेटेस्ट स्नॅपड्रॅगन ८ जनरेशन ५ प्रोसेसर वापरण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड १६ वर आधारित असून कंपनीने यावर चक्क ७ वर्षांचे सॉफ्टवेअर अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले आहे.

Motorola Razr Fold : कॅमेरा आणि बॅटरी

फोटोग्राफीसाठी मोटोरोलाने यात ५० मेगापिक्सलचे तीन रिअर कॅमेरे दिले आहेत. यात मुख्य कॅमेरा, अल्ट्रा-वाइड लेन्स आणि पेरिस्कोप टेलिफोटो लेन्सचा समावेश आहे. सेल्फीसाठी फोनच्या आत ३२ मेगापिक्सल आणि बाहेर २० मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

शक्तीशाली परफॉर्मन्ससाठी यात ६०००mAh ची मोठी बॅटरी आहे, जी ८०W फास्ट चार्जिंग आणि ५०W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहण्यासाठी IP46, IP48 आणि IP49 रेटिंगसह येतो, ज्यामुळे तो अधिक टिकाऊ बनतो.

हे देखील वाचा- Milk Price Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूल आणि मदर डेअरीच्या दुधात मोठी दरवाढ; आजपासूनच लागू झाले नवीन दर

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या