Home / देश-विदेश / Gautam Adani US Fraud Charges: गौतम अदानींना मोठा दिलासा? अमेरिकेतील लाचखोरीचे आरोप मागे घेण्याच्या हालचाली

Gautam Adani US Fraud Charges: गौतम अदानींना मोठा दिलासा? अमेरिकेतील लाचखोरीचे आरोप मागे घेण्याच्या हालचाली

Gautam Adani US Fraud Charges: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यासाठी एक मोठी आणि सकारात्मक बातमी समोर येत आहे. अमेरिकेतील...

By: Team Navakal
Gautam Adani US Fraud Charges
Social + WhatsApp CTA

Gautam Adani US Fraud Charges: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यासाठी एक मोठी आणि सकारात्मक बातमी समोर येत आहे. अमेरिकेतील न्याय विभाग आणि सुरक्षा विनिमय आयोग अदानी यांच्यावरील फसवणुकीचे आणि लाचखोरीचे आरोप मागे घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त न्यूयॉर्क टाइम्स आणि ब्लूमबर्गने दिले आहे.

Gautam Adani US Fraud Charges: काय आहे नेमकं प्रकरण?

नोव्हेंबर 2024 मध्ये अमेरिकेच्या न्याय विभागाने गौतम अदानी आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. भारतातील सौर ऊर्जा कंत्राटे मिळवण्यासाठी सुमारे 250 दशलक्ष डॉलर्सची लाच दिल्याचा आणि ही बाब अमेरिकन गुंतवणूकदारांपासून लपवून ठेवल्याचा दावा करण्यात आला होता. अदानी समूहाने हे सर्व आरोप सुरुवातीपासूनच फेटाळून लावले होते.

Gautam Adani US Fraud Charges: डोनाल्ड ट्रम्प यांच्या वकिलाची एन्ट्री

या प्रकरणाला कलाटणी मिळण्यामागे गौतम अदानी यांनी नियुक्त केलेली नवीन कायदेशीर टीम असल्याचे बोलले जात आहे. अदानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वैयक्तिक वकील रॉबर्ट जी. ग्युफ्रा ज्युनियर यांची नियुक्ती केली होती. ग्युफ्रा यांनी गेल्या महिन्यात वॉशिंग्टनमध्ये न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. “या प्रकरणात अदानींविरुद्ध पुरेसे पुरावे नाहीत आणि हे प्रकरण अमेरिकेच्या कार्यक्षेत्रात येत नाही,” असा भक्कम युक्तिवाद त्यांनी मांडला, जो यशस्वी ठरल्याचे दिसत आहे.

Gautam Adani US Fraud Charges: गुंतवणूकदारांवरील दडपण हटणार?

जर हे आरोप अधिकृतपणे मागे घेतले गेले, तर अदानी समूहावर गेल्या काही काळापासून असलेले संकट दूर होईल. जागतिक गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी ही घडामोड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. विशेषतः अदानी ग्रीन एनर्जीच्या प्रकल्पांसाठी यामुळे मोठा मार्ग मोकळा होऊ शकतो.

अदानी समूहाकडून अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, अमेरिकेतील या संभाव्य निर्णयामुळे भारतीय बाजारपेठेत आणि अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळू शकते.

हे देखील वाचा – Petrol Diesel Price Hike 2026: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ; पाहा तुमच्या शहरातील नवे दर

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या