Google Pixel 10 Price Discount Offer : तुम्ही जर गुगलचा प्रिमियम आणि तगडा कॅमेरा असलेला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आली आहे. गेल्या वर्षी भारतात लाँच झालेला ‘गुगल पिक्सेल 10’ (Google Pixel 10) हा स्मार्टफोन सध्या मोठ्या डिस्काउंटसह विक्रीसाठी उपलब्ध आहे. रिटेल साईट क्रोमावर (Chroma) या फोनच्या किंमतीत घसघशीत कपात करण्यात आली असून, त्यावर बँक ऑफर्सही दिल्या जात आहेत.
लाँचिंग किंमतीपेक्षा 20 हजार रुपयांनी स्वस्त!
हा स्मार्टफोन ऑगस्ट 2025 मध्ये 79,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र, सध्या क्रोमावर याचा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट थेट 64,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे.
याशिवाय, ग्राहकांसाठी एक भन्नाट बँक ऑफर देखील आहे. जर तुम्ही हा फोन खरेदी करताना HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केले, तर तुम्हाला 5,000 रुपये इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. म्हणजेच, हा फोन तुम्हाला केवळ 59,999 रुपयांमध्ये पडेल. एकूणच लाँचिंग किंमतीच्या तुलनेत ग्राहकांची तब्बल 20,000 रुपयांची थेट बचत होणार आहे.
Google Pixel 10 चे दमदार फीचर्स:
- डिस्प्ले आणि प्रोसेसर: या फोनमध्ये 6.3 इंचाचा अॅक्टुआ ओलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 60 ते 120Hz चा अॅडॉप्टिव्ह रिफ्रेश रेट आणि 3,000 निट्सपर्यंतची पीक ब्राइटनेस मिळते, ज्यामुळे उन्हातही स्क्रीन स्पष्ट दिसते. चांगल्या परफॉर्मन्ससाठी यात गुगलचा स्वतःचा टेन्सर G5 प्रोसेसर वापरण्यात आला आहे.
- ऑपरेटिंग सिस्टम आणि बॅटरी: हा स्मार्टफोन अँड्रॉइड 16 या अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4970mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे, जी 30W फास्ट चार्जिंग आणि 10W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
- कनेक्टिव्हिटी: यात 5जी, वाय-फाय 6E, ब्लूटूथ व्हर्जन 6, एनएफसी, जीपीएस आणि सुरक्षेसाठी ड्युअल सिम सपोर्टसह यूएसबी टाईप सी पोर्ट 3.2 देण्यात आला आहे.
कॅमेरा सेटअप कसा आहे?
गुगलचे फोन त्यांच्या फोटोग्राफीसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. पिक्सेल 10 च्या मागच्या बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. यामध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य वाईड कॅमेरा, 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 10.8 मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोरच्या बाजूला 10.5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. या फोनचे एकूण वजन 204 ग्राम असून त्याची जाडी 8.6 मिमी इतकी आहे.
हे देखील वाचा – PM Modi on Foreign Travel Tax: परदेश प्रवासावर नवीन कर लागणार? सोशल मीडियावरील ‘त्या’ चर्चेवर स्वतः पंतप्रधान मोदींनी दिले स्पष्टीकरण










