Home / देश-विदेश / CBSE Board Rules: सीबीएसई बोर्डाचे परीक्षा नियम बदलले! 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना आता शिकाव्या लागणार ‘या’ 3 भाषा

CBSE Board Rules: सीबीएसई बोर्डाचे परीक्षा नियम बदलले! 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना आता शिकाव्या लागणार ‘या’ 3 भाषा

CBSE Board Rules: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आगामी शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून शालेय शिक्षणात एक अतिशय मोठा आणि महत्त्वपूर्ण...

By: Team Navakal
CBSE Board Rules
Social + WhatsApp CTA

CBSE Board Rules: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आगामी शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून शालेय शिक्षणात एक अतिशय मोठा आणि महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णयाचा थेट परिणाम सीबीएसई 10वीच्या बोर्ड परीक्षेवर होणार आहे.

बोर्डाने जारी केलेल्या नवीन परिपत्रकानुसार, आता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना दोन ऐवजी तीन भाषा (R3) शिकणे सक्तीचे करण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या तीन भाषांपैकी किमान दोन भाषा या भारतीय मूळच्या असणे अनिवार्य असणार आहे.

CBSE Board Rules: काय आहे सीबीएसईचा ‘R’ फॉर्म्युला?

एनसीईआरटीच्या (NCERT) नवीन अभ्यासक्रमानुसार हा बदल केला जात आहे. 1 जुलै 2026 पासून 9वीच्या वर्गासाठी हा नियम लागू होईल. बोर्डाने भाषा विषयांची विभागणी तीन भागांत केली आहे:

  1. R1: प्राथमिक भाषा (पहिली भाषा)
  2. R2: दुसरी भाषा
  3. R3: तिसरी भाषा

या नवीन सिस्टीममध्ये विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत दोन भारतीय भाषा निवडाव्याच लागतील. यामध्ये मराठी, हिंदी, आसामी, बंगाली, तमिळ, तेलगू यांसारख्या अनेक भारतीय भाषांचा समावेश आहे.

CBSE Board Rules: परदेशी भाषा निवडण्यासाठी पाळावी लागेल ‘ही’ अट

अनेक विद्यार्थ्यांना जर्मन, फ्रेंच यांसारख्या परदेशी भाषा शिकण्याची इच्छा असते. अशा विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने एक अट ठेवली आहे. विद्यार्थ्यांना परदेशी भाषा निवडता येईल, पण ती केवळ ‘तिसरी भाषा’ (R3) म्हणून किंवा ‘चौथी अतिरिक्त भाषा’ म्हणून निवडता येईल. पहिल्या दोन भाषा मात्र भारतीयच असाव्या लागतील.

CBSE Board Rules: 10वीच्या बोर्ड परीक्षेत कसा होणार बदल?

सीबीएसईने विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी एक मोठा दिलासाही दिला आहे. 10वीच्या बोर्ड परीक्षेत या तिसऱ्या भाषेचा (R3) मुख्य पेपर घेतला जाणार नाही.

  • मूल्यमापन शाळा पातळीवर: तिसऱ्या भाषेची परीक्षा आणि मूल्यमापन फक्त शाळा पातळीवरच मर्यादित असेल.
  • मार्कशीटमध्ये नोंद: जरी याची बोर्ड परीक्षा होणार नसली, तरी या विषयाचे अंतर्गत गुण (इंटरनल मार्क्स) किंवा ग्रेड 10वीच्या फायनल मार्कशीटवर दाखवले जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना हा विषय हलक्यात घेता येणार नाही.
  • परीक्षा देण्यापासून रोखता येणार नाही: कोणत्याही विद्यार्थ्याला तिसऱ्या भाषेच्या गुणांच्या कारणावरून मुख्य बोर्ड परीक्षेला बसण्यापासून शाळा रोखू शकणार नाही, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे.

पुस्तकांची कमतरता; शाळांना पर्यायी निर्देश

या नव्या नियमासाठी अद्याप माध्यमिक पातळीवर लागणारी विशेष पाठ्यपुस्तके पूर्णपणे उपलब्ध झालेली नाहीत. त्यामुळे बोर्डाने शाळांना तात्पुरता पर्याय दिला आहे. शाळांनी 9वीच्या वर्गासाठी 6वीच्या पातळीची पाठ्यपुस्तके (2026-27 ची आवृत्ती) वापरावीत. सोबतच स्थानिक किंवा राज्यातील साहित्य, लघुकथा, कविता आणि कथाबाह्य गद्य यांचा अभ्यासात समावेश करावा, असे सांगण्यात आले आहे.

शाळांना 30 जूनपर्यंतची मुदत

सीबीएसईने एकूण 19 भाषांची यादी जाहीर केली असून, त्यातून शाळांना तिसरी भाषा निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. सर्व शाळांना 30 जूनपर्यंत आपल्या ओएसआयएस (Oasis) पोर्टलवर भाषांचे हे पर्याय अपडेट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिव्यांग मुले (CwSN), परदेशी विद्यार्थी आणि परदेशातील सीबीएसई शाळांसाठी या नियमात काही विशेष सवलती देण्यात आल्या आहेत.

हे देखील वाचा – CJI Surya Kant: “काही तरुण झुरळांसारखे…”; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अखेर मोठे स्पष्टीकरण!

Web Title:
संबंधित बातम्या