Home / लेख / Viral Business Idea: पठ्ठ्याने डोंगरावर लावला मॅगीचा स्टॉल; १ दिवसात केली तब्बल ‘एवढी’ रुपयांची कमाई, व्हिडिओ पाहून नेटीझन्स म्हणाले…

Viral Business Idea: पठ्ठ्याने डोंगरावर लावला मॅगीचा स्टॉल; १ दिवसात केली तब्बल ‘एवढी’ रुपयांची कमाई, व्हिडिओ पाहून नेटीझन्स म्हणाले…

Viral Business Idea: डोंगराळ आणि थंड हवेच्या ठिकाणी फिरायला गेल्यानंतर गरमागरम मॅगी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पर्यटकांसाठी हे हक्काचे...

By: Team Navakal
Viral Business Idea
Social + WhatsApp CTA

Viral Business Idea: डोंगराळ आणि थंड हवेच्या ठिकाणी फिरायला गेल्यानंतर गरमागरम मॅगी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पर्यटकांसाठी हे हक्काचे कम्फर्ट फूड मानले जाते. याच कल्पनेचा वापर करून दिल्लीतील एका कंटेंट क्रिएटरने डोंगराळ भागात थेट रस्त्याच्या कडेला मॅगीचा स्टॉल सुरू केला. एका दिवसात या व्यवसायातून किती कमाई होऊ शकते, हे पाहण्यासाठी त्याने हा अनोखा प्रयोग केला होता.

‘देवांश त्यागी’ नावाच्या या तरुणाचा हा बिझनेस प्रयोग सध्या इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल झाला असून कोट्यवधी लोकांनी तो पाहिला आहे.

असा उभारला डोंगरावर मॅगी कॅफे

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, देवांश एका सुंदर डोंगराळ ठिकाणी मॅगीचे पॅकेट्स, गॅस, भांडी, फोल्डिंग टेबल आणि प्लास्टिकच्या खुर्च्या घेऊन पोहोचतो. एका मोकळ्या जागेत, जिथून डोंगराचा सुंदर नजराणा दिसतो, तिथे तो आपला छोटा ओपन-एअर कॅफे थाटतो.

स्टॉल सुरू होताच तिथून जाणाऱ्या पर्यटकांनी आणि ट्रेकर्सनी गरमागरम मॅगी खाण्यासाठी गर्दी करायला सुरुवात केली. देवांशने स्वतः प्रत्येक ग्राहकासाठी मॅगी तयार केली आणि त्यांच्याशी गप्पाही मारल्या. त्याने साध्या मॅगीची किंमत 100 रुपये तर बटर मॅगीची किंमत 120 रुपये ठेवली होती. रात्री दुकान बंद करताना त्याने संपूर्ण हिशोब केला, तेव्हा एका दिवसात तब्बल 24,000 रुपयांची विक्री झाल्याचा दावा त्याने केला आहे.

सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

या व्हिडिओला सोशल मीडियावर आतापर्यंत 112 दशलक्ष (11.2 कोटी) पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून नेटीझन्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या असून कॉर्पोरेट नोकरीपेक्षा हा व्यवसाय अधिक फायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

एका युझरने लिहिले, “नवीन बिझनेस आयडिया अनलॉक झाली आहे.” दुसऱ्या एका युझरने गमतीने लिहिले, “मी पण आता सरकारी परीक्षेची तयारी सोडून डोंगरावर मॅगी विकायला जात आहे.”

नेटीझन्सनी काढल्या चुका

एकीकडे कौतुक होत असताना, काही नेटीझन्सनी या कमाईमधील गणितही समजावून सांगितले. २४,००० रुपये हा निव्वळ नफा (Profit) नसून ती एकूण विक्री (Sales) आहे, असे युझर्सनी स्पष्ट केले. यामध्ये मॅगीचे पॅकेट्स, वाहतूक खर्च, गॅस, डिस्पोजेबल भांडी आणि बसण्याची व्यवस्था या सर्वांचा खर्च वजा केल्यास प्रत्यक्ष नफा खूप कमी असेल, असे काहींनी सांगितले.

याशिवाय, व्हिडिओमधील स्वच्छतेच्या पद्धतीवरही काही लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मॅगी बनवण्यासाठी डोंगरावरील पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाचा (झरा) वापर केल्याचे व्हिडिओत दिसल्यामुळे, “नदी-झऱ्याचे पाणी वापरणे आरोग्यासाठी अयोग्य आहे,” अशी टीकाही एका युझरने केली.

हे देखील वाचा – CJI Surya Kant: “काही तरुण झुरळांसारखे…”; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अखेर मोठे स्पष्टीकरण!

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या