PM Modi Norway visit Rahul Gandhi criticism : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच देशांच्या दौऱ्याचा चौथा टप्पा सध्या नॉर्वेमध्ये सुरू आहे. संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स आणि स्वीडनच्या दौऱ्यानंतर ते ओस्लो येथे पोहोचले आहेत. विमानतळावर नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोअर यांनी स्वतः त्यांचे जंगी स्वागत केले.
या दौऱ्यात दोन्ही नेत्यांमध्ये अत्यंत महत्त्वाची द्विपक्षीय चर्चा झाली असली, तरी दुसरीकडे या दौऱ्यावरून देशांतर्गत राजकारण तापले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एका पत्रकार परिषदेतील प्रसंगावरून जोरदार निशाणा साधला आहे.
राहुल गांधींचा ‘तो’ आरोप नक्की काय आहे?
नॉर्वेमधील एका वृत्तपत्राच्या महिला समीक्षकाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट लिहिली होती. तिच्या मते, संयुक्त पत्रकार निवेदनादरम्यान तिने विचारलेल्या प्रश्नांना पंतप्रधान मोदींनी उत्तर दिले नाही. या पोस्टचा हवाला देत राहुल गांधींनी पंतप्रधानांवर थेट हल्लाबोल केला.
राहुल गांधी यांनी लिहिले की, “जेव्हा काही लपवण्यासारखे नसते, तेव्हा घाबरण्याचे काहीच कारण नसते. जेव्हा संपूर्ण जग एका पंतप्रधानांना काही प्रश्नांपासून दूर पळताना पाहते, तेव्हा भारताच्या प्रतिमेला काय धक्का पोहोचत असेल?”
पंतप्रधानांनी माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तरे न दिल्याचा आरोप करत राहुल गांधींनी त्यांच्यावर टीका केली आहे.
भारत आणि नॉर्वेमध्ये झाले ‘हे’ ऐतिहासिक करार
या राजकीय वादाच्या पलीकडे, दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये विविध क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यासाठी अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीतील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
हरित धोरणात्मक भागीदारी: दोन्ही देशांनी आपल्या संबंधांना एका नव्या पातळीवर नेण्यासाठी ‘ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’ची घोषणा केली आहे. यामध्ये पर्यावरणपूरक विकास आणि हवामान बदलावर एकत्र काम केले जाईल.
व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य: भारत आणि नॉर्वे यांच्यातील सध्याचा व्यापार 2030 पर्यंत थेट दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. व्यापार आणि आर्थिक भागीदारी करारांतर्गत (TEPA) भारतात 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक आणणे आणि 10 लाख नवीन रोजगार निर्माण करणे, यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला.
ब्लू इकॉनॉमी आणि तंत्रज्ञान: सागरी परिसंस्थेचे रक्षण, जहाजबांधणी, ग्रीन शिपिंग, स्पेस, रोबोटिक्स, सायबर सुरक्षा आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या क्षेत्रांत दोन्ही देशांचे पथक एकत्र काम करेल.
संयुक्त राष्ट्रात भारताला पाठिंबा: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) सुधारित रचनेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्यासाठी नॉर्वेने आपला पाठिंबा पुन्हा एकदा जाहीर केला आहे.
याशिवाय, पंतप्रधान मोदींनी नॉर्वेला जून 2026 मध्ये फ्रान्समध्ये होणाऱ्या ‘भारत इनोव्ह्हेट्स 2026’ मध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. तसेच दोन्ही देशांमध्ये स्टार्टअप इनोव्हेशन हब सुरू करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.
PM Modi Norway Visit: राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल! नॉर्वे दौऱ्यातील ‘त्या’ घटनेवरून टीका
PM Modi Norway visit Rahul Gandhi criticism : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच देशांच्या दौऱ्याचा चौथा टप्पा सध्या नॉर्वेमध्ये सुरू...
PM Modi Norway visit Rahul Gandhi criticism : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच देशांच्या दौऱ्याचा चौथा टप्पा सध्या नॉर्वेमध्ये सुरू आहे. संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स आणि स्वीडनच्या दौऱ्यानंतर ते ओस्लो येथे पोहोचले आहेत. विमानतळावर नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोअर यांनी स्वतः त्यांचे जंगी स्वागत केले.
या दौऱ्यात दोन्ही नेत्यांमध्ये अत्यंत महत्त्वाची द्विपक्षीय चर्चा झाली असली, तरी दुसरीकडे या दौऱ्यावरून देशांतर्गत राजकारण तापले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एका पत्रकार परिषदेतील प्रसंगावरून जोरदार निशाणा साधला आहे.
राहुल गांधींचा ‘तो’ आरोप नक्की काय आहे?
नॉर्वेमधील एका वृत्तपत्राच्या महिला समीक्षकाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट लिहिली होती. तिच्या मते, संयुक्त पत्रकार निवेदनादरम्यान तिने विचारलेल्या प्रश्नांना पंतप्रधान मोदींनी उत्तर दिले नाही. या पोस्टचा हवाला देत राहुल गांधींनी पंतप्रधानांवर थेट हल्लाबोल केला.
राहुल गांधी यांनी लिहिले की, “जेव्हा काही लपवण्यासारखे नसते, तेव्हा घाबरण्याचे काहीच कारण नसते. जेव्हा संपूर्ण जग एका पंतप्रधानांना काही प्रश्नांपासून दूर पळताना पाहते, तेव्हा भारताच्या प्रतिमेला काय धक्का पोहोचत असेल?”
पंतप्रधानांनी माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तरे न दिल्याचा आरोप करत राहुल गांधींनी त्यांच्यावर टीका केली आहे.
भारत आणि नॉर्वेमध्ये झाले ‘हे’ ऐतिहासिक करार
या राजकीय वादाच्या पलीकडे, दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये विविध क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यासाठी अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीतील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
याशिवाय, पंतप्रधान मोदींनी नॉर्वेला जून 2026 मध्ये फ्रान्समध्ये होणाऱ्या ‘भारत इनोव्ह्हेट्स 2026’ मध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. तसेच दोन्ही देशांमध्ये स्टार्टअप इनोव्हेशन हब सुरू करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.
हे देखील वाचा – Fuel Price Hike: सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका! 5 दिवसातच पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ
Fuel Price Hike: सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका! 5 दिवसातच पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ
Dadar Street Food Video: दादर स्थानकाबाहेर इडली विक्रेत्याकडून शौचालयातील पाण्याचा वापर; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
IPL : आयपीएल स्पर्धेतील क्रिकेटपटूंच्या विमानासाठी बेसुमार इंधन का वापरता? उद्योजकांचे क्रीडामंत्र्यांना पत्र
SRPF Exam Cancelled: 100 पैकी 85 प्रश्न एकाच पुस्तकातून; अखेर राज्य राखीव पोलीस दलाची परीक्षाच रद्द
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचे 90 दिवसांत तब्बल 3,700 शेअर व्यवहार !वॉल स्ट्रीटवर खळबळ
Share:
Must Read
‘चीनला शत्रू मानण्याचा विचार थांबवावा लागेल’, सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झाला वाद
NTPC मध्ये नोकरीची संधी, 400 पदांसाठी भरती जाहीर, पाहा संपूर्ण माहिती
इलॉन मस्क यांच्या ‘टेस्ला’मध्ये काम करायचं आहे? कंपनीने भारतात सुरू केली भरती
कर्मचाऱ्यांनी किती तास काम करावे? आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केले मत
गिग कामगार म्हणजे नक्की कोण? त्यांच्यासाठी सरकारने बजेटमध्ये कोणत्या घोषणा केल्या आहेत?
जिओने लाँच केला 445 रुपयांचा शानदार रिचार्ज प्लॅन, डेटा-कॉलिंगसह 13 ओटीटी अॅपचे सबस्क्रिप्शन मोफत