Home / देश-विदेश / Trump Daughter : डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेकीला संपवण्याची शपथ घेणाऱ्याचा एफबीआयकडून गेम ओव्हर! फ्लोरिडाचा नकाशा पोस्ट करत इव्हांका ट्रम्पला दिली होती थेट मृत्यूची धमकी!

Trump Daughter : डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेकीला संपवण्याची शपथ घेणाऱ्याचा एफबीआयकडून गेम ओव्हर! फ्लोरिडाचा नकाशा पोस्ट करत इव्हांका ट्रम्पला दिली होती थेट मृत्यूची धमकी!

Trump Daughter : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका ट्रम्प यांना जीवे मारण्याचा एक मोठा कट अमेरिकन गुप्तचर...

By: Team Navakal
Trump Daughter
Social + WhatsApp CTA

Trump Daughter : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका ट्रम्प यांना जीवे मारण्याचा एक मोठा कट अमेरिकन गुप्तचर संस्थांनी (FBI) उधळून लावला आहे. ‘द न्यूयॉर्क पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) शी संबंधित एका दहशतवाद्याने इव्हांका ट्रम्प यांना लक्ष्य करण्याची योजना आखली होती. याप्रकरणी एफबीआयने मोहम्मद बाकेर साद दाऊद अल-सादी या ३२ वर्षीय इराकी नागरिकाला अटक केली असून, त्याने इव्हांकाची हत्या करण्याची शपथ घेतल्याचा खळबळजनक आरोप ठेवण्यात आला आहे.

फ्लोरिडामधील घराची रेकी आणि सोशल मीडियावरील धमक्या
तपासादरम्यान संशयित अल-सादी याच्याकडे फ्लोरिडा येथील इव्हांका ट्रम्प आणि तिचे पती जेरेड कुशनर यांच्या निवासस्थानाचे नकाशे (ब्लूप्रिंट्स) सापडले आहेत. विशेष म्हणजे, या आरोपीने ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फ्लोरिडा परिसराचा नकाशा पोस्ट केला होता, जिथे इव्हांका यांचे अंदाजे २४ दशलक्ष डॉलर्स किमतीचे आलिशान घर आहे. सोशल मीडियावर धमकावताना त्याने म्हटले होते की, “केवळ कडक सुरक्षा आणि ‘सिक्रेट सर्व्हिस’ अमेरिकन नेत्यांचे संरक्षण करू शकणार नाही; आम्ही त्यांच्यावर सतत नजर ठेवून आहोत आणि योग्य वेळ येताच सूड घेतला जाईल.”

दहशतवादी संघटना ‘कताइब हिजबुल्लाह’शी संबंध
आरोपी मोहम्मद अल-सादी हा ‘कताइब हिजबुल्लाह’ या खतरनाक दहशतवादी संघटनेचा वरिष्ठ सदस्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. या संघटनेला अमेरिकेने यापूर्वीच ‘परदेशी दहशतवादी संघटना’ म्हणून घोषित केले आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा विभागाचे सहाय्यक ॲटर्नी जनरल जॉन ए. आयझेनबर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल-सादीने गेल्या केवळ तीन महिन्यांत युरोपमध्ये अमेरिकेशी संबंधित लक्ष्यांवर १८ दहशतवादी हल्ल्यांचे कट रचले होते. तसेच तो न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया आणि ॲरिझोना या राज्यांमध्ये मोठ्या हल्ल्यांची तयारी करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

रशियाचा अमेरिकेवर निशाणा
एकीकडे हा गंभीर कट उघड झाला असतानाच, रशियाचे वरिष्ठ अधिकारी मिखाईल उल्यानोव्ह यांनी यावर प्रतिक्रिया देत अमेरिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उल्यानोव्ह यांच्या मते, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या वाटाघाटींबाबत अमेरिका जी माहिती देत आहे, ती अतिशयोक्तीपूर्ण आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या