Home / लेख / FDA Action Tukaram Mundhe: भेसळखोरांवर तुकाराम मुंढेंचा सर्जिकल स्ट्राईक! चार्ज घेताच ३ दिवसांत राज्यभर धाडी, ३३ जणांना बेड्या

FDA Action Tukaram Mundhe: भेसळखोरांवर तुकाराम मुंढेंचा सर्जिकल स्ट्राईक! चार्ज घेताच ३ दिवसांत राज्यभर धाडी, ३३ जणांना बेड्या

FDA Action Tukaram Mundhe: आपल्या कडक आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी 25 मे रोजी अन्न...

By: Team Navakal
FDA Action Tukaram Mundhe: भेसळखोरांवर तुकाराम मुंढेंचा सर्जिकल स्ट्राईक! चार्ज घेताच ३ दिवसांत राज्यभर धाडी, ३३ जणांना बेड्या
Social + WhatsApp CTA

FDA Action Tukaram Mundhe: आपल्या कडक आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी 25 मे रोजी अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. खुर्चीवर बसताच अवघ्या 3 दिवसांत त्यांनी आपली ‘ॲक्शन’ दाखवून दिली आहे. त्यांच्या आदेशानंतर संपूर्ण राज्यातील यंत्रणा वेगाने धावली आणि गुटखा तसेच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या 53 ठिकाणी तातडीने छापे टाकण्यात आले.

या धडक कारवाईत खालील मोठे यश आले आहे:

  • एकूण 34 ठिकाणी बंदी असलेला गुटखा आणि पानमसाला रंगेहात जप्त करण्यात आला.
  • या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत 25 एफआयआर दाखल करण्यात आले असून 33 आरोपींना अटक केली आहे.
  • गुटख्याची वाहतूक करणारी 5 वाहने जप्त करण्यात आली असून, एकूण 27 दुकाने सील करण्यात आली आहेत.
  • या संपूर्ण कारवाईत 20,57,296 रुपयांचा बेकायदेशीर साठा हस्तगत करण्यात आला आहे.

दूध, पनीर, तूप आणि खाद्यतेलाची होणार प्रयोगशाळेत चाचणी

केवळ गुटखाच नाही, तर नागरिकांच्या दैनंदिन खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या शुद्धतेवरही मुंढेंच्या पथकाने लक्ष केंद्रित केले आहे. राज्यातील आणखी 23 मोठ्या अन्न उत्पादन केंद्रांवर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या. यामध्ये दूध, पनीर, तूप, खवा, खाद्यतेल, नूडल्स, आईसक्रीम, मसाले, बेकरी पदार्थ आणि पॅकबंद पिण्याचे पाणी यांचे नमुने तपासण्यात आले.

अस्वच्छ आणि असुरक्षित वातावरणात अन्न तयार करणाऱ्या या केंद्रांमधून तब्बल 28,78,572 रुपयांचा संशयास्पद साठा जप्त करण्यात आला आहे. हा सर्व माल जप्त करून त्याचे नमुने प्रयोगशाळेतील चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रात मोहिमेचा धसका

नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार घेताच राज्यातील सर्व विभागांतील अधिकाऱ्यांना तातडीने सक्रिय होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या सर्वच विभागांमध्ये एकाच वेळी ही धडक मोहीम राबवण्यात आली. आयुक्त मुंढे यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे राज्यातील भेसळखोर आणि नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

हे देखील वाचा – NEET UG Re Exam 2026: नीट पेपर लीक रोखण्यासाठी आता थेट वायुसेनेची मदत! 21 जूनच्या परीक्षेसाठी केंद्र सरकारचा मोठा प्लॅन

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या