Home / देश-विदेश / Cockroach party : समस्येचा फोटो काढून पोस्ट करा ! कॉकरोच पार्टीची पहिली मोहीम

Cockroach party : समस्येचा फोटो काढून पोस्ट करा ! कॉकरोच पार्टीची पहिली मोहीम

Cockroach party : सरन्यायाधीशांच्या वक्तव्यानंतर तरुणाईच्या सोशल मीडियावरील उद्रेकातून सुरू झालेल्या ‌’कॉकरोच जनता पार्टी‌’ने आपल्या पहिल्या मोहिमेची घोषणा केली आहे....

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

Cockroach party : सरन्यायाधीशांच्या वक्तव्यानंतर तरुणाईच्या सोशल मीडियावरील उद्रेकातून सुरू झालेल्या ‌’कॉकरोच जनता पार्टी‌’ने आपल्या पहिल्या मोहिमेची घोषणा केली आहे. ‌’लाईफ ऑफ अ कॉकरोच‌’ असे नाव असलेल्या या राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत नागरिकांना त्यांच्या परिसरातील सरकारी यंत्रणांमधील त्रुटी, भ्रष्टाचार, अस्वच्छता, खड्डे, पाणीटंचाई, शासकीय शाळा-रुग्णालयांची दयनीय अवस्था अशा विविध समस्यांचे फोटो किंवा व्हिडिओ पुराव्यासह पोस्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


या मोहिमेबाबतचा एआय व्हिडिओ पार्टीच्या एक्सवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, कॉकरोच जनता पार्टी आपल्या अजेंड्यांवर प्रत्यक्ष कृती करायला कधी सुरुवात करणार, याची अनेक लोक वाट पाहत आहेत. त्यामुळे आज आपण पहिले पाऊल म्हणून एक राष्ट्रीय मोहीम सुरू करत आहोत. तिचे नाव आहे ‌‘लाईफ ऑफ अ कॉकरोच‌’ आहे. ही मोहीम त्या प्रत्येक कॉकरोचसाठी आहे, जो सरकारच्या अपयशामुळे आणि दुर्लक्षामुळे त्रस्त आहे. जे लोक आपला आवाज उठवू शकत नाहीत किंवा ज्यांचा आवाज योग्य ठिकाणी पोहोचत नाही, त्यांना अनेकदा दुर्लक्षित वाटते. त्यांना असे वाटते की, तक्रार करून तरी काय होणार? कारण नेते आणि अधिकारी यांनी जाणीवपूर्वक डोळेझाक केली आहे. लाईफ ऑफ अ कॉकरोच मोहीम अशा नेत्यांवर आणि अधिकाऱ्यांवर कृती करण्यासाठी दबाव निर्माण करेल. ज्यांना ते दिवस-रात्र देशद्रोही म्हणतात, त्या भारतीय तरुणांना आणि सामान्य नागरिकांना कोणत्या परिस्थितीत जगावे लागते हे त्यांना दाखवेल.


या  मोहिमेनुसार प्रत्येक कॉकरोचने आपल्या परिसरातील कोणत्याही सरकारी यंत्रणेतील समस्येचा फोटो किंवा व्हिडिओ काढून पोस्ट करा,असे आवाहन केले आहे.  त्यासाठी इंटरनेटवर जीपीएस कॅमेरासारखी अनेक ॲप्स आहेत जी फोटो किंवा व्हिडिओवर वेळ आणि गुगल लोकेशन दाखवतात. तुम्हाला तुमचा चेहरा दाखवायचा नसेल, तर हरकत नाही, फक्त समस्या दाखवा, लोकेशन टॅग जोडा आणि त्या फोटो किंवा व्हिडिओमध्ये कॉकरोच जनता पार्टीला टॅग करा. तसेच लाइफ ऑफ अ कॉकरोच किंवा कॉकरोचजिंदगी हा हॅशटॅग वापरा. सीजेपी  अशा प्रत्येक पोस्ट आणि तक्रारीला प्रसिद्धी देईल. विविध स्तरांवर प्रशासन आणि नेत्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करेल. ज्या मुद्द्यांबाबत सर्वाधिक तक्रारी येतील, त्यावर माहिती अधिकारात अर्ज दाखल केल्या जातील. माध्यमांचे लक्ष वेधले जाईल,आवश्यकतेनुसार निधी संकलन आणि याचिका मोहीमा राबवल्या जातील. आता निवडून आलेल्या नेत्यांकडे डोळेझाक करण्याचा पर्याय उरलेला नाही. यामध्ये सरकारी शाळा, महाविद्यालये किंवा रुग्णालयांची दयनीय अवस्था,घराबाहेर साचलेला कचरा,उघडे खड्डे किंवा नाले, पिण्याच्या पाण्याची किंवा हवेची प्रदूषित स्थिती, दलित, आदिवासी, शेतकरी किंवा महिलांवर होणारा व्यवस्थेचा अन्याय, सरकारी कार्यालयांमधील उघडपणे सुरू असलेला भ्रष्टाचार या गोष्टींचा समावेश आहे.


कॉकरोच पार्टीच्या मते, 2 कोटी फॉलोअर्स एकत्र आल्यास सरकारी व्यवस्थेवर प्रभावी दबाव निर्माण होऊ शकतो. लाइफ ऑफ अ कॉकरोच ही केवळ सोशल मीडिया मोहीम नसून जनसहभागातून उत्तरदायित्वाची मागणी करणारी चळवळ आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील समस्यांचे फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करून सहभागी व्हावे आणि व्यवस्थेतील वास्तव पुराव्यासह देशासमोर आणावे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या