Weight Loss 30 Day Plan: अनेक प्रयत्न करूनही वजन कमी होत नसल्याने निराश झालेल्या नागरिकांसाठी एक आशेचा किरण समोर आला आहे. फिटनेस तज्ञांच्या मते, वजन कमी करणे हा कोणताही जादूचा खेळ नसून, तो केवळ आहार आणि व्यायामातील अचूक शिस्तीचा भाग आहे.
३0 दिवसांचे एक विशेष चॅलेंज सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असून, याद्वारे अवघ्या एका महिन्यात सुमारे 15 पाउंड म्हणजेच 6.8 किलो वजन सहज कमी केले जाऊ शकते.
हा संपूर्ण प्लॅन शरीरातील फॅट कमी करण्यासाठी डिझाईन केला गेला आहे. यामध्ये कोणत्याही चुकीच्या औषधांचा किंवा शॉर्टकटचा वापर न करता, नैसर्गिक आणि आरोग्यदायी पद्धतीने जीवनशैलीत बदल करण्यावर भर देण्यात आला आहे.
Weight Loss 30 Day Plan: डाएटमधील हे नियम बदलतील तुमच्या शरीराचा आकार
वेट लॉसच्या प्रवासात खाण्यापिण्याला सर्वाधिक महत्त्व असते. जर तुम्ही आहारात योग्य संतुलन राखले, तर चरबी वेगाने वितळण्यास सुरुवात होते. त्यासाठी खालील नियमांचे काटेकोर पालन करा:
- मोजून-मापून कॅलरीज घ्या: वजन घटवण्यासाठी सर्वात आधी ‘कॅलरी डेफिसिट’ मोडवर जावे लागेल. म्हणजेच तुमच्या दैनंदिन गरजेपेक्षा 500 ते 750 कमी कॅलरीज शरीरात गेल्या पाहिजेत. जेवताना अंदाज लावण्यापेक्षा कॅलरीज ट्रॅक करण्याची सवय लावा.
- प्रत्येक जेवणात प्रोटीनला प्राधान्य: तुमच्या जेवणाची सुरुवात प्रोटीनयुक्त पदार्थांनी झाली पाहिजे. दररोज शरीराच्या वजनानुसार प्रति पाउंड 0.8 ते 1 ग्रॅम प्रोटीन मिळणे आवश्यक आहे. बहुतेक लोकांसाठी हे प्रमाण दररोज 130 ते 180 ग्रॅम इतके भरते. प्रत्येक वेळच्या जेवणातून किमान 20 ते 30 ग्रॅम प्रोटीन शरीराला मिळालेच पाहिजे.
- खाण्यापिण्यातील या गोष्टींना करा हद्दपार: प्रक्रिया केलेली साखर, चॉकलेट, पेस्ट्री, गोड सिरीयल्स आणि पॅकबंद जंक फूड ३0 दिवस पूर्णपणे बंद करा.
- कॅलरीयुक्त पेयांना नकार: जास्त साखर असलेले चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स किंवा पॅक केलेले ज्यूस पिणे टाळा. त्याऐवजी भरपूर पाणी आणि घरगुती साखर नसलेली पेये घ्या.
- केवळ सकस अन्न: आहारात अंडी, चिकन, भात, ओट्स, फळे आणि हिरव्या पालेभाज्या यांसारख्या नैसर्गिक पदार्थांचा समावेश करा. कोणतेही ‘चीट मील’ न घेता ३0 दिवस यावर ठाम राहा.
Weight Loss 30 Day Plan: व्यायाम आणि कार्डिओचे अचूक गणित
चरबी वितळवण्याचा वेग वाढवण्यासाठी योग्य शारीरिक हालचाली आणि व्यायामाची अत्यंत गरज असते. यासाठी या ३0 दिवसांत खालील गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे:
- नियोजनासह स्ट्रेंथ ट्रेनिंग: आठवड्यातून किमान 3 दिवस वजनासह व्यायाम करा. जिममध्ये जाऊन काहीही व्यायाम करण्यापेक्षा एका ठरलेल्या वर्कआउट प्लॅननुसारच सराव करा.
- रोज १० हजार पावले: दररोज 10000 पेक्षा जास्त पावले चालण्याचे उद्दिष्ट पूर्ण करा. यामुळे शरीरावर कोणताही अतिरिक्त ताण न येता फॅट लॉस होण्यास मदत होते.
- कार्डिओवर भर: आठवड्यातून 3 ते 5 वेळा किमान 30 ते 45 मिनिटांसाठी ट्रेडमिलवर चढतीवर चालणे (इन्क्लाइन वॉकिंग) किंवा स्टेअरमास्टरचा सराव करा.
Weight Loss 30 Day Plan: शांत झोप आणि मानसिक तयारीही आवश्यक
वजन कमी करताना केवळ डाएट आणि व्यायाम पुरेसा नसून, शरीराला विश्रांती देणेही तितकेच गरजेचे आहे:
अगाऊ नियोजन: भूक लागल्यावर काहीही खाण्याची चूक टाळण्यासाठी, तुमच्या दिवसभराच्या जेवणाचे नियोजन आदल्या दिवशीच करून ठेवा.
७ ते ९ तासांची झोप: अपुऱ्या झोपेमुळे शरीराची चयापचय शक्ती मंदावते, ज्यामुळे वजन घटण्याची प्रक्रिया थांबते. त्यामुळे दररोज रात्री किमान 7 ते 9 तासांची गाढ झोप घेणे अनिवार्य आहे.
दररोज सकाळी वजन मोजा: रोज सकाळी उठल्यानंतर आणि वॉशरुममधून आल्यानंतर रिकाम्या पोटी तुमचे वजन मोजा. यामुळे तुम्हाला तुमच्या प्रगतीचा अचूक अंदाज येईल.
हे देखील वाचा – Abhishek Banerjee Attacked: “शासकच बनले मारेकरी!”; पुतण्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ममता बॅनर्जींचा भाजप सरकारवर हल्लाबोल










