Home / महाराष्ट्र / Dhananjay Deshmuk Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; धनंजय देशमुखांवर का दाखल झाला गुन्हा ?

Dhananjay Deshmuk Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; धनंजय देशमुखांवर का दाखल झाला गुन्हा ?

Dhananjay Deshmuk Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh )हत्या प्रकरणातील घडामोडी दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीच्या होत असून आता या...

By: Team Navakal
Dhananjay Deshmuk Case
Social + WhatsApp CTA


Dhananjay Deshmuk Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh )हत्या प्रकरणातील घडामोडी दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीच्या होत असून आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh Case ) यांच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात (Beed Rural Police)गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय हत्या प्रकरणातील साक्षीदाराला धमकावून साक्ष बदलण्यासाठी दबाव टाकल्याचाही आरोप समोर आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय देशमुख यांचे साडू (Brother-in-law) दादा खिंडकर यांचा सख्खा भाऊ समाधान खिंडकर (Samadhan Khindkar) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत करण्यात आलेल्या आरोपांनुसार, समाधान खिंडकर हे एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले असताना तेथे धनंजय देशमुखही उपस्थित होते. यावेळी धनंजय देशमुख यांनी आपल्या अंगरक्षकाकडील पिस्तूल (Pistol) काढून समाधान खिंडकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली.


या घटनेमुळे हॉटेल परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. समाधान खिंडकर यांच्या तक्रारीनंतर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हॉटेलमधील वादातून गंभीर आरोप


तक्रारीनुसार, समाधान खिंडकर जेवणासाठी बसले असताना धनंजय देशमुख यांनी अचानक संताप व्यक्त केला. त्यानंतर अंगरक्षकाकडील पिस्तूल हातात घेत थेट धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर समाधान खिंडकर यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.
धनंजय देशमुख यांच्यावरील या आरोपांमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आधीच राज्यभर गाजत असलेल्या या प्रकरणात नव्या गुन्ह्याची भर पडल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे.

साक्षीदाराला धमकी देऊन साक्ष बदलण्याचा दबाव?


दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील महत्त्वाचे साक्षीदार दादा खिंडकर (Dada Khindkar) यांना धमकावल्याचाही गंभीर आरोप समोर आला आहे. या संदर्भात बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात स्वतंत्र तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, दादा खिंडकर हे त्यांच्या घरी असताना त्यांचा सख्खा लहान भाऊ समाधान खिंडकर तेथे आला. दोघांमध्ये जुन्या वादातून चर्चा सुरू झाली. यावेळी समाधान खिंडकर याने संतोष देशमुख हत्या प्रकरणात साक्ष देऊ नये, तसेच हे प्रकरण मिटवून घेण्यासाठी धनंजय देशमुख यांना सांगावे, असा दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दादा खिंडकर यांनी या मागणीला विरोध केला असता समाधान खिंडकर याने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे हत्या प्रकरणातील साक्षीदारांच्या सुरक्षेचा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कौटुंबिक वादातून प्रकरण अधिक गुंतागुंतीचे


विशेष म्हणजे तक्रारदार दादा खिंडकर आणि आरोपी समाधान खिंडकर हे सख्खे भाऊ (Brothers) आहेत. दोघांमध्ये गेल्या काही काळापासून कौटुंबिक आणि इतर कारणांवरून वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या तक्रारीमागे नेमके काय कारण आहे, याबाबतही विविध चर्चा सुरू आहेत.
यापूर्वी काही तरुणांना मारहाण (Beating) केल्याप्रकरणी दादा खिंडकर यांच्यावरही गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणातील साक्षीदाराला साक्ष बदलण्यासाठी किंवा साक्ष देऊ नये म्हणून दबाव टाकल्याचा आरोप थेट त्यांच्याच सख्ख्या भावावर झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.


पोलिसांचा तपास सुरू
दोन्ही तक्रारींनंतर संबंधित पोलीस ठाण्यांनी गुन्हे नोंदवून तपास सुरू केला आहे. धनंजय देशमुख यांच्यावरील जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या आरोपासह साक्षीदाराला धमकावल्याच्या प्रकरणाचीही चौकशी केली जात आहे. तपासानंतरच या आरोपांमागील सत्य स्पष्ट होणार असले तरी संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित या नव्या घडामोडींमुळे बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे.


हे देखील वाचा –

मनोज जरांगेंचे मध्यरात्री उपोषण मागे; सरकारकडून मागण्या मान्य, नेमका तोडगा काय निघाला?

सायन – माटुंगादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली ; मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

 जड रोलर अंगावरून गेल्याने आरव चौधरीचा दुर्दैवी अंत; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Web Title:
संबंधित बातम्या