Home / News / Kedarnath Yatra Halted : केदारनाथ यात्रा तात्पुरती स्थगित ; ऑरेंज अलर्टमुळे प्रशासनाचा निर्णय

Kedarnath Yatra Halted : केदारनाथ यात्रा तात्पुरती स्थगित ; ऑरेंज अलर्टमुळे प्रशासनाचा निर्णय

Kedarnath Yatra Halted : उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांमध्ये सतर्कतेचा...

By: Team Navakal
Kedarnath Yatra Halted
Social + WhatsApp CTA

Kedarnath Yatra Halted : उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) रुद्रप्रयागसह (Rudraprayag) अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केल्यानंतर प्रशासनाने केदारनाथ यात्रेबाबत (Kedarnath Yatra) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यात्रेकरूंच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत केदारनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली असून पुढील आदेश येईपर्यंत भाविकांना प्रवास न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाने रुद्रप्रयाग जिल्ह्यात पुढील काही तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यासोबतच मेघगर्जना (Thunderstorm), विजांचा कडकडाट, ताशी वेगाने वाहणारे वारे (storms) आणि प्रतिकूल हवामानाचा इशाराही देण्यात आला आहे. डोंगराळ भागांमध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे भूस्खलन, दरड कोसळणे आणि रस्ते बंद होण्याचा धोका वाढला आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार ( Nandan Singh Rajwar )यांनी सांगितले की, हवामान विभागाच्या सूचनांनुसार आणि ऑरेंज अलर्ट लक्षात घेऊन केदारनाथ यात्रेवर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. परिस्थिती सामान्य होईपर्यंत यात्रेकरूंना पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सतर्क ठेवण्यात आल्या आहेत.

Kedarnath Yatra
Kedarnath Yatra

केदारनाथ धामाकडे जाणाऱ्या हजारो भाविकांना विविध टप्प्यांवर आणि प्रशासनाने निश्चित केलेल्या होल्डिंग एरिया (Holding Area) मध्ये थांबविण्यात आले आहे. या ठिकाणी भाविकांच्या निवास, अन्न, पिण्याचे पाणी आणि वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. पायी प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंनाही सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंड, सोनप्रयाग आणि केदारनाथ मार्गावरील अनेक संवेदनशील ठिकाणी प्रशासनाने विशेष पथके तैनात केली आहेत. डोंगराळ भागांमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे काही ठिकाणी लहान-मोठ्या दरडी कोसळण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे कोणताही धोका पत्करण्याऐवजी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून यात्रा थांबविण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, श्रीनगर (Srinagar )परिसरातून केदारनाथकडे जाणाऱ्या वाहनांची वाहतूकही तात्पुरती बंद करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांना पुढे जाण्यापासून रोखले आहे. भाविकांनी हवामानात सुधारणा होईपर्यंत प्रशासनाच्या (Administration)सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून काही भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि स्थानिक प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

चारधाम यात्रेसाठी देशभरातून लाखो भाविक उत्तराखंडमध्ये दाखल होत असतात. अशा परिस्थितीत यात्रेकरूंच्या सुरक्षेला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हवामानात सुधारणा झाल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन केदारनाथ यात्रा पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सध्या प्रशासनाने भाविकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले असून हवामानाशी संबंधित अधिकृत माहिती आणि सूचना नियमितपणे तपासण्यास सांगितले आहे. अतिवृष्टीचा इशारा कायम असल्याने पुढील काही दिवस उत्तराखंडमध्ये सतर्कतेचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.


हे देखील वाचा –

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; धनंजय देशमुखांवर का दाखल झाला गुन्हा ?

सायन – माटुंगादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली ; मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

 जड रोलर अंगावरून गेल्याने आरव चौधरीचा दुर्दैवी अंत; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या