Home / देश-विदेश / Kalyan Banerjee Attacked : तृणमूलच्या अभिषेक बॅनर्जींनंतर खासदार कल्याण बॅनर्जींवर हल्ला

Kalyan Banerjee Attacked : तृणमूलच्या अभिषेक बॅनर्जींनंतर खासदार कल्याण बॅनर्जींवर हल्ला

Kalyan Banerjee Attacked – पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर सुरू असलेल्या राजकीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर हल्ल्यांच्या घटना वाढत असल्याचे दिसत...

By: Team Navakal
Kalyan Banerjee Attacked
Social + WhatsApp CTA

Kalyan Banerjee Attacked – पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर सुरू असलेल्या राजकीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर हल्ल्यांच्या घटना वाढत असल्याचे दिसत आहे. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर सोनारपूर येथे काल हल्ला झाला होता. त्यानंतर आज पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हुगळी येथे हल्ला झाला.

खासदार कल्याण बॅनर्जी हे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याचा निषेध करण्यासाठी समर्थकांसह आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी ते पायी चालत असताना मागून फेकण्यात आलेला दगड त्यांच्या डोक्याला लागला. या घटनेनंतर त्यांनी डोके धरून रस्त्यावरच कोसळल्याने परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला. हुगळी येथे उपस्थित आंदोलकांनी “चोर, चोर!” अशा घोषणा देत कल्याण बॅनर्जी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली आणि त्यांच्यावर हल्ला झाल्याचेही समोर आले. या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कल्याण बॅनर्जी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.

कल्याण बॅनर्जी यांचे आरोप

या हल्ल्यानंतर डोक्यावर रुमाल ठेऊन खासदार कल्याण बॅनर्जी यांनी भाजपवर सूडबुद्धीने हल्ला केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, हा कोणताही जनआक्रोश नव्हता. भगवी वस्त्रे घातलेल्या १५ ते २० भाजपा कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला. त्यांनी मला शिवीगाळ केली आणि माझ्या डोक्यावर दगड मारला, ज्यामुळे प्रचंड रक्तस्त्राव झाला. हल्ला झाला तेव्हा बंगाल पोलीस मूकप्रेक्षक बनून उभे होते. मला एका केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानाने वाचवले. राज्यात पूर्णपणे कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असून, हा माझा खून करण्याचा प्रयत्न होता. विरोधी आवाज दाबण्यासाठी खुद्द मुख्यमंत्रीच हुकूमशाही पद्धतीने वागत आहेत.

भाजपाचा इन्कार

भाजपाने कल्याण बॅनर्जी यांच्या आरोपांचा इन्कार केला आहे. कल्याण बॅनर्जी यांच्या हल्ल्याचे आणि ते जखमी झाल्याचे दावे भाजपाने खोटे असल्याचे म्हटले आहे. कल्याण बॅनर्जी जखमी झाले नसून ते फक्त नाटक करत आहेत, असे भाजपाने म्हटले आहे. अभिषेक बॅनर्जी यांच्या प्रकरणावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ते असे करत आहेत, असेही भाजपाने म्हटले आहे.

अभिषेक बॅनर्जी यांच्यावर काल हल्ला

काल पश्चिम बंगालमधील सोनारपूर दक्षिण येथे तृणमूलचे काँग्रेसचे खासदार आणि ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर काल संध्याकाळी हल्ला झाला. ते निवडणुकीतील हिंसाचाराचे बळी ठरलेल्या तृणमूलचे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भेटायला गेले होते. तिथे पोहोचताच भाजपe कार्यकर्त्यांनी त्यांना घेरले आणि घोषणाबाजी करत त्यांच्यावर हल्ला केला. लोकांनी त्यांच्यावर दगड, चपला आणि अंडी फेकली, तसेच त्यांचा शर्ट फाडला आणि चोर- चोर अशा घोषणा दिल्या. हेल्मेट घालून अभिषेक यांना घटनास्थळावरून बाहेर काढण्यात आले. सविस्तर बातमी कर

Web Title:
संबंधित बातम्या