Home / महाराष्ट्र / Panjabrao Dakh Monsoon Update: महाराष्ट्रात दुष्काळ पडणार नाही; जूनच्या ‘या’ आठवड्यात सुरू होणार मुसळधार पाऊस, पंजाबराव डखांचा मोठा अंदाज

Panjabrao Dakh Monsoon Update: महाराष्ट्रात दुष्काळ पडणार नाही; जूनच्या ‘या’ आठवड्यात सुरू होणार मुसळधार पाऊस, पंजाबराव डखांचा मोठा अंदाज

Panjabrao Dakh Monsoon Update: महाराष्ट्रात अधिकृतपणे मान्सूनचे आगमन झाले असले तरी अद्याप अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झालेला नाही. जूनचा पंधरवडा...

By: Team Navakal
Panjabrao Dakh Monsoon Update: महाराष्ट्रात दुष्काळ पडणार नाही; जूनच्या 'या' आठवड्यात सुरू होणार मुसळधार पाऊस, पंजाबराव डखांचा मोठा अंदाज
Social + WhatsApp CTA

Panjabrao Dakh Monsoon Update: महाराष्ट्रात अधिकृतपणे मान्सूनचे आगमन झाले असले तरी अद्याप अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झालेला नाही. जूनचा पंधरवडा उलटून गेला तरी आकाश कोरडे असल्याने राज्यातील बळीराजा कमालीचा चिंतेत आहे. पाऊस न पडल्यामुळे आधीच शेतात उभी असलेली पिके करपू लागली आहेत, तर दुसरीकडे पेरण्या खोळंबल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत.

प्रशांत महासागरात होत असलेल्या वातावरणीय बदलांमुळे यंदा मान्सूनचा प्रवास मंदावला आहे. त्यातच यंदा भारतीय मान्सूनवर ‘अल निनो’चे सावट असल्याने सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. यामुळे पेरणी करावी की नाही, अशा विवंचनेत शेतकरी अडकले आहेत.

Panjabrao Dakh Monsoon Update: घाबरू नका, यंदा कडक पाऊस होणार; डखांचा दिलासादायक अंदाज

एकीकडे हवामान खात्याकडून कमी पावसाचा इशारा दिला जात असताना, दुसरीकडे महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे:

  • दुष्काळाची भीती नाही: महाराष्ट्रात यंदा कोणत्याही परिस्थितीत दुष्काळ पडणार नाही. याउलट यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर आणि उत्तम ठरेल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
  • जूनच्या शेवटच्या आठवड्यात आगमन: जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात पावसाचे जोरदार पुनरागमन होईल. या पावसानंतर रखडलेल्या पेरण्यांना वेग येईल.
  • जुलैमध्ये तुफान पाऊस: ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या जून महिन्यात पूर्ण होऊ शकणार नाहीत, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. 10 जुलै ते 15 जुलै दरम्यान राज्यामध्ये तुफान पाऊस पडणार असून या काळात उरलेल्या पेरण्या सहज करता येतील.

Panjabrao Dakh Monsoon Update: पाऊस का रखडला? पंजाबराव डखांनी सांगितले तांत्रिक कारण

मान्सून दाखल झाल्यानंतर तो एकाच ठिकाणी स्थिरावला आहे. सध्या राज्यामध्ये वेगाने वारे वाहत आहेत. सामान्यतः अशी परिस्थिती पाऊस पडून गेल्यानंतर पुढच्या महिन्यात निर्माण होते. मात्र, यंदा ही स्थिती पावसाच्या सुरुवातीलाच आल्यामुळे पाऊस पडत नाहीये.

वारा शांत होताच ढग दाटून येतील आणि पावसाला सुरुवात होईल. त्यामुळे ही परिस्थिती तात्पुरती असून शेतकऱ्यांनी अजिबात पॅनिक होऊ नये, असे आवाहन डख यांनी केले आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या