Home / देश-विदेश / Ram Mandir : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरणी प्रमुख ट्रस्टींचा राजीनामा! ठाकरेंची वीट गायब

Ram Mandir : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरणी प्रमुख ट्रस्टींचा राजीनामा! ठाकरेंची वीट गायब

Ram Mandir- अयोध्येच्या राम मंदिरात भक्तांनी दिलेले दान चोरीस जात असल्याचे धक्कादायक प्रकरण सध्या गाजत आहे. या प्रकरणात अंतरिम चौकशी...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

Ram Mandir- अयोध्येच्या राम मंदिरात भक्तांनी दिलेले दान चोरीस जात असल्याचे धक्कादायक प्रकरण सध्या गाजत आहे. या प्रकरणात अंतरिम चौकशी होऊन आठ कर्मचार्‍यांना अटक करण्यात आल्यानंतर मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि आणखी एक प्रमुख ट्रस्टी अनिल मिश्रा यांनी ट्रस्टचा राजीनामा दिला. ज्या कर्मचार्‍यांना अटक झाली ते या दोघांचे निकटवर्ती असल्याने हे दोघे महत्त्वाचे ट्रस्टी संशयाच्या भोवर्‍यात आहेत. त्यांच्यावर गुन्हा का दाखल नाही, असा प्रश्न विचारला जात असताना त्यांनी ट्रस्टचा राजीनामा दिला. ही अटकेपासून पळवाट आहे असे आता बोलले जात आहे.


अयोध्या राम मंदिराला दान केलेल्या चांदी, सोन्याच्या विटा, मूर्ती, रोकड असे 2 हजार कोटींचे दान चोरल्याचा आरोप आहे. महाराष्ट्रात उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज दावा केला की, उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील राम मंदिरासाठी 1 कोटी रुपयांचे दान चेकने दिले होते. त्याबरोबर चार किलो चांदीची वीटही दान केली होती. याची कोणतीही पावती ट्रस्टकडून दिली गेली नाही. ही चांदीची वीट नेमकी कुठे गेली? या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आता आली आहे. चांदीच्या विटेसह कोटी रुपयांचे दान कुठे गेले? ते राजकारणात वापरले की खासदार-आमदारांच्या फोडाफोडीसाठी वापरले ते समजले पाहिजे. 2 हजार कोटी रुपयांची चोरी झाली आहे. हा तर प्राथमिक आकडा असल्याचे एसआयटीचे म्हणणे आहे. या दानपेट्या चोरल्या, त्याला आपण ऑपरेशन टायगर नाव देऊया.


अयोध्येत राम मंदिरातील देणगी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर तब्बल 19 दिवसांनी चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने अंतरिम तपास अहवाल सरकारला सादर केला. मात्र योगी सरकारने हा अहवाल उघड केलेला नाही. अंतरिम अहवालात शिफारस केल्यानंतर दोन दिवसांनी पहिले आरोपपत्र दाखल करण्यात आले. यात दानपेटी मोजण्याची जबाबदारी असलेल्या आठ
कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. मात्र  या एफआयआरमध्ये महासचिव चंपत राय आणि ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांच्यासह इतर मोठ्या पदाधिकार्‍यांची नावे नाहीत. उत्तर प्रदेश सरकारने 13 जून रोजी ट्रस्टच्या विनंतीवरून एसआयटी स्थापन केली होती. एसआयटीने 23 जून रोजी उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) संजय प्रसाद यांना प्राथमिक अहवाल सादर केला. मात्र संजय प्रसाद हे ट्रस्टचे पदसिद्ध सदस्यदेखील आहेत.


श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचे गाडी चालक रामशंकर यादव उर्फ टिन्नू, ट्रस्टचे पदाधिकारी अनिल मिश्रा यांचे नातेवाईक अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा,  गणना कर्मचारी मनीष यादव, अविनाश शुक्ला, करुणेश पांडेय, रमाशंकर मिश्रा, गणना प्रभारी सुभाष श्रीवास्तव आणि अन्य काही अज्ञात व्यक्तींविरोधात काल गुन्हा नोंदविण्यात आला. या सर्वांवर कट रचून देणगीची रक्कम चोरल्याचा आरोप आहे. पोलिसांनी टिन्नूसह सात आरोपींना अटक केली आहे.


6 जून रोजी राम मंदिरातील देणगी चोरीचा प्रकार उघड झाला होता. मात्र चौकशी करण्याबाबत टोलवाटोलवी सुरू होती. परंतु आरोप वाढत गेले. एका हिंदू संघटनेने लेखी तक्रार दिली. त्यानंतर 13 जून रोजी सरकारने एसआयटीची स्थापना केली. एसआयटीने 23 जून रोजी शासनाकडे अहवाल सादर करून एफआयआर दाखल करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर ट्रस्टी कृष्ण मोहन यांच्या तक्रारीवरून रामजन्मभूमी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी तक्रारीत नावे दिलेल्या आरोपींना अटक करण्यात आली आहे.  अटक केलेल्या सर्व आरोपींची पोलीस ठाण्यात रात्रभर चौकशी करण्यात आली. पोलीस तपासात आतापर्यंत सुमारे 60 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.


ही चोरी संघटित पद्धतीने करण्यात आल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, देणगीतील रक्कम काढल्यानंतर अनुकल्प मिश्रा आणि इतर आरोपी नोटांचे बंडल बाथरूममध्ये लपवत असत. योग्य संधी मिळाल्यानंतर ती मंदिराबाहेर नेली जात असे आणि नंतर एका घरात त्याची वाटणी केली जात असे. हा प्रकार गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सुरू असल्याचा संशय आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरी करताना दिसलेल्या सर्व व्यक्तींना आरोपी करण्यात आले आहे. चौकशी आणि इतर पुराव्यांच्या आधारे संपूर्ण कटात टिन्नू यादव आणि सुभाष श्रीवास्तव यांची प्रमुख भूमिका असल्याचे समोर आले आहे. एसआयटीने सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचा पुरावा म्हणून तपासात समाविष्ट केला असून, आता पोलीस त्याच पुराव्यांच्या आधारे पुढील तपास करणार आहेत. मात्र 45 दिवसांनंतर सीसीटीव्ही फुटेज आपोआप नष्ट होत असल्याने इतकी वर्षे चोरी कशी होत होती याचा कॅमेरा पुरावा मिळणार नाही.

आपनेही पुरावे दिले
आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंह यांनीही राम मंदिर देणगी व जमीन घोटाळ्याचे महत्त्वाचे पुरावे विशेष तपास पथकाला (एसआयटी) सादर केले. लखनौ येथे एसआयटीचे अध्यक्ष विजय विश्वास पंत यांच्या कार्यालयात जाऊन त्यांनी सुमारे 11 पुराव्यांचे संच सादर केले. संजय सिंह म्हणाले की, राम मंदिराशी संबंधित जमीन व्यवहारातील 11 महत्त्वाची कागदपत्रे मी एसआयटीकडे दिली आहेत. एक-एक करून सर्व घोटाळे बाहेर येत आहेत. देणगीपेटीतील चोरीबाबतही रोज नवे प्रकार उघड होत आहेत. कधी चांदीची चोरी, कधी प्रभू श्रीरामांच्या पादुकांची, तर कधी दागिन्यांची. इतकेच नव्हे तर ‘काकभुशुंडी’ची मूर्तीही चोरीला गेली आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या