Home / क्रीडा / Cameron Green : २५ कोटींची बोली, १८ कोटींचा पगार आणि शून्यावर बाद; कॅमेरॉन ग्रीनची सुमार कामगिरी केकेआरसाठी चिंतेचा विषय

Cameron Green : २५ कोटींची बोली, १८ कोटींचा पगार आणि शून्यावर बाद; कॅमेरॉन ग्रीनची सुमार कामगिरी केकेआरसाठी चिंतेचा विषय

Cameron Green : इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या लिलावात ज्या खेळाडूवर सर्वाधिक धनादेश उधळले गेले, तो ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन...

By: Team Navakal
Cameron Green
Social + WhatsApp CTA

Cameron Green : इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या लिलावात ज्या खेळाडूवर सर्वाधिक धनादेश उधळले गेले, तो ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीन सध्या मैदानात पूर्णपणे अपयशी ठरताना दिसत आहे. १६ डिसेंबर रोजी अबू धाबी येथे पार पडलेल्या मिनी लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) ग्रीनला तब्बल २५.२० कोटी रुपयांच्या विक्रमी रकमेसह आपल्या संघात समाविष्ट केले होते. या अवाढव्य बोलीमुळे त्याने मिचेल स्टार्कचा २४.७५ कोटींचा विक्रम मोडला आणि तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला. मात्र, मैदानातील त्याची कामगिरी पाहता, शाहरुख खानच्या मालकीच्या या संघाने एवढी मोठी गुंतवणूक का केली, असा प्रश्न आता क्रिकेट तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे.

मैदानातील संघर्ष आणि दुखापतीचे सावट-
कॅमेरॉन ग्रीन सध्या फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर चाचपडताना दिसत आहे. १४ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात तो नूर अहमदच्या पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. त्याची फलंदाजीची आकडेवारी अत्यंत निराशाजनक असून, ५ सामन्यांतील ५ डावांत त्याने केवळ ५६ धावा केल्या आहेत. यात केवळ ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. गोलंदाजीच्या बाबतीतही परिस्थिती गंभीर आहे. ५ सामन्यांपैकी त्याने केवळ २ डावांत गोलंदाजी केली असून २४ चेंडूंत ५८ धावा खर्च करत केवळ एक बळी मिळवला आहे. त्याच्या या खराब कामगिरीमागे दुखापत असल्याचे स्पष्ट झाले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार, ग्रीनला पाठीच्या खालच्या भागात दुखापत झाली असून त्याला १०-१२ दिवस गोलंदाजीपासून दूर राहावे लागणार आहे.

कोट्यवधींची बोली, पण पगार मात्र १८ कोटी?
कॅमेरॉन ग्रीनच्या लिलावातील रकमेवरून एक महत्त्वाचा तांत्रिक नियम समोर आला आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या नवीन नियमांनुसार, मिनी लिलावात कोणत्याही परदेशी खेळाडूचा पगार १८ कोटी रुपयांच्या वर असू शकत नाही. जरी केकेआरने २५.२० कोटींची बोली लावली असली, तरी ग्रीनला प्रत्यक्षात १८ कोटी रुपयेच मिळतील. उर्वरित ७.२० कोटी रुपये बीसीसीआयच्या ‘खेळाडू कल्याण निधी’मध्ये जमा होतील. मात्र, फ्रँचायझी म्हणून केकेआरला आपल्या तिजोरीतून पूर्ण २५.२० कोटी रुपये खर्च करावे लागतील. लिलावात आर्थिक शिस्त राखण्यासाठी आणि अवाजवी बोलींना लगाम घालण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.

भारतीय खेळाडूंना पूर्ण पगार; ऋषभ पंत अव्वल स्थानी-
विशेष म्हणजे, १८ कोटींची ही मर्यादा केवळ परदेशी खेळाडूंना लागू आहे. भारतीय खेळाडूंना लिलावात मिळालेली पूर्ण रक्कम पगार म्हणून मिळते. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात लखनौ सुपर जायंट्सने (LSG) ऋषभ पंतला २७ कोटी रुपयांना विकत घेतले होते. पंत हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला असून त्याला हा संपूर्ण पगार मिळत आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या