रेल्वे कोच, स्पेअर पार्ट्स आणि खाण उपकरणांच्या निर्मितीतील BEML लिमिटेड कंपनी

रेल्वे कोच, स्पेअर पार्ट्स आणि खाण उपकरणांच्या निर्मितीसाठी सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी म्हणजे BEML लिमिटेड (पूर्वीचे भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड) कंपनी. या कंपनीची स्थापना मे 1964 मध्ये बंगलोर कॉम्प्लेक्समध्ये झाली. कंपनीने अंशतः निर्गुंतवणूक केली आहे आणि सध्या भारत सरकारच्या एकूण इक्विटीच्या 54 टक्के मालकी आहे. तसेच, उर्वरित 46 टक्के सार्वजनिक, वित्तीय संस्था, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार, बँका आणि कर्मचारी यांच्याकडे आहे.

BEML लिमिटेड, एक \’शेड्यूल-ए\’ कंपनी असून संरक्षण, रेल्वे, ऊर्जा, खाणकाम आणि पायाभूत सुविधा यांसारख्या भारतातील प्रमुख क्षेत्रांना सेवा देते. कंपनीची सुरुवात पाच कोटी रुपयांच्या माफक उलाढालीने झाली. मात्र आज कंपनीच्या विविध व्यवसाय पोर्टफोलिओमुळे कंपनी रु. 3,500 कोटीपेक्षा जास्त उलाढाल साध्य करू शकली आहे.

या कंपनीची सेवा बेंगळुरू, कोलार गोल्ड फिल्ड्स (KGF), म्हैसूर, पलक्कड आणि उपकंपनी – विज्ञान इंडस्ट्रीज लिमिटेड, चिकमंगळूर जिल्ह्यातील नऊ उत्पादन युनिटद्वारे केली जाते.

BEML चा निव्वळ नफा डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत 183.74% वाढून रु. 78.51 कोटी झाला आहे, जो डिसेंबर 2020 ला संपलेल्या मागील तिमाहीत रु. 27.67 कोटी होता. डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत रु. 2133.09 कोटी रुपयांच्या तुलनेत विक्री 55.60% वाढून रु. 1133.09 कोटी झाली आहे.

दरम्यान, अस्थिर शेअर बाजारातही या कंपनीचा शेअर आज (१० मार्च २०२२ रोजी) ग्रीन मार्कवर ट्रेड करत होता. पाच वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरची किंमत ९९० रुपये होती. आज त्याची किंमत १४७५ रुपये आहे. म्हणजे गेल्या पाच वर्षात या कंपनीने जवळपास १६० टक्के परतावा दिला आहे.

Scroll to Top