Home / क्रीडा / Ben Stokes Controversy: क्रिकेट विश्वात खळबळ! नाईटक्लबमध्ये राडा केल्यामुळे बेन स्टोक्सचे कर्णधारपद धोक्यात; ECB कडून चौकशी सुरू

Ben Stokes Controversy: क्रिकेट विश्वात खळबळ! नाईटक्लबमध्ये राडा केल्यामुळे बेन स्टोक्सचे कर्णधारपद धोक्यात; ECB कडून चौकशी सुरू

Ben Stokes Controversy: इंग्लंड क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स आणि त्याचा सहकारी खेळाडू गस अकिन्सन हे दोघे एका मोठ्या...

By: Team Navakal
Ben Stokes Controversy: क्रिकेट विश्वात खळबळ! नाईटक्लबमध्ये राडा केल्यामुळे बेन स्टोक्सचे कर्णधारपद धोक्यात; ECB कडून चौकशी सुरू
Social + WhatsApp CTA

Ben Stokes Controversy: इंग्लंड क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स आणि त्याचा सहकारी खेळाडू गस अकिन्सन हे दोघे एका मोठ्या वादात अडकले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवल्यानंतर, या दोन्ही खेळाडूंनी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) घालून दिलेला रात्री १२ चा संचारबंदीचा नियम मोडला आणि लंडनमधील एका नाईटक्लबला भेट दिली.

या नाईटक्लबमध्ये झालेल्या एका हाणामारीनंतर आता बेन स्टोक्सचे कर्णधारपद धोक्यात आले असून गस अकिन्सनला संघातून बाहेर काढले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. क्रिकेट बोर्डाने या संपूर्ण प्रकरणाची अधिकृत चौकशी सुरू केली आहे.

नाईटक्लब नेमके काय घडले?

हा वाद लंडनमधील चेलसी भागातील एका प्रसिद्ध नाईटक्लबमध्ये मध्यरात्रीनंतर घडला. रिपोर्ट्सनुसार, या घटनेत पोलीस तक्रार झाली नसली तरी बोर्डाच्या सुरक्षा रक्षकाला गंभीर दुखापत झाली आहे:

  • रग्बी खेळाडूशी वाद: नाईटक्लबमध्ये इंग्लंडच्या या दोन्ही क्रिकेटपटूंचा सामना ‘सॅरेसेन्स अकॅडमी’च्या एका रग्बी खेळाडूशी झाला.
  • सुरक्षा रक्षकाला लागला मार: त्या रग्बी खेळाडूने वेगवान गोलंदाज गस अकिन्सनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो चुकून खेळाडूंसोबत असलेल्या क्रिकेट बोर्डाच्या सुरक्षा रक्षकाला लागला.
  • टाके घालण्याची आली वेळ: या हल्ल्यात सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने वैद्यकीय मदत द्यावी लागली आणि त्याच्या जखमेवर टाके घालावे लागले. सुदैवाने या हाणामारीत बेन स्टोक्स आणि अकिन्सन या दोघांनाही कोणतीही दुखापत झालेली नाही.

क्रिकेटर आक्रमक नव्हते; सूत्रांचा दावा

या प्रकरणात दोन्ही क्रिकेटपटूंचा दोष नसल्याचा दावा काही केला जात आहे. संबंधित रग्बी खेळाडूची पार्श्वभूमी वादग्रस्त असून त्यानेच आधी वाद उकरून काढला होता. बोर्डाच्या अंतर्गत सूत्रांनुसार, इंग्लंडचे क्रिकेटपटू यामध्ये आक्रमक नव्हते, त्यांनी केवळ स्वतःचा बचाव केला. एका चुकीच्या प्रवृत्तीच्या व्यक्तीमुळे कर्णधारपद जाणे योग्य ठरणार नाही, असेही एका सूत्राने म्हटले आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाची कडक भूमिका

या घटनेनंतर क्रिकेट बोर्डाने तातडीने निवेदन जारी केले असून कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना 17 जूनपासून सुरू होत आहे, त्यापूर्वीच या खेळाडूंना मोठी शिक्षा सुनावली जाऊ शकते.

बोर्डाने म्हटले आहे की, “सोमवारी पहाटे एका नाईटक्लबमध्ये ही घटना घडली तेव्हा बेन स्टोक्स आणि गस अकिन्सन तिथे उपस्थित होते. आम्ही याविषयी अधिक माहिती गोळा करत असून, दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघ निवडीची घोषणा लवकरच केली जाईल.”

नियम का कडक करण्यात आले होते?

ऑस्ट्रेलियातील ॲशेस मालिकेतील पराभवानंतर इंग्लंडच्या खेळाडूंवर अतिप्रमाणात मद्यपान करणे आणि बेशिस्त वर्तन करण्याचे आरोप झाले होते. त्यानंतर जानेवारी महिन्यातच बोर्डाने खेळाडूंसाठी रात्री 12 नंतर बाहेर राहण्यावर बंदी घालणारा कडक नियम लागू केला होता. हा नियम मोडल्यामुळेच बोर्ड आता अधिक आक्रमक झाले आहे. जर बेन स्टोक्सला कर्णधारपदावरून हटवले गेले, तर तरुण फलंदाज हॅरी ब्रूककडे इंग्लंडच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोपवले जाऊ शकते.

हे देखील वाचा – Vizag Steel Plant Blast: क्रेन निकामी झाली अन् १६०० अंशांचे उकळते लोखंड थेट कामगारांवर कोसळले; थरकाप उडवणारा घटनाक्रम आला समोर

Web Title:
संबंधित बातम्या