Home / क्रीडा / Kapil Dev on Vaibhav Sooryavanshi : “मी फक्त टीव्हीवर मॅच बघतो…”; वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीवर कपिल देव नक्की काय म्हणाले? जाणून घ्या

Kapil Dev on Vaibhav Sooryavanshi : “मी फक्त टीव्हीवर मॅच बघतो…”; वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीवर कपिल देव नक्की काय म्हणाले? जाणून घ्या

Kapil Dev on Vaibhav Sooryavanshi : आयपीएल 2026 च्या हंगामात सध्या एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे १५ वर्षांचा फलंदाज...

By: Team Navakal
Kapil Dev on Vaibhav Sooryavanshi
Social + WhatsApp CTA

Kapil Dev on Vaibhav Sooryavanshi : आयपीएल 2026 च्या हंगामात सध्या एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे १५ वर्षांचा फलंदाज वैभव सूर्यवंशी. आपल्या स्फोटक फलंदाजीने त्याने दिग्गज गोलंदाजांना घाम फोडला आहे. १० सामन्यांत ४०४ धावा करणाऱ्या वैभवला भारतीय संघात संधी मिळावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. खुद्द सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सनेही त्याला आपला “आवडता खेळाडू” म्हटले आहे.

Kapil Dev on Vaibhav Sooryavanshi : कपिल देव यांची सावध प्रतिक्रिया

एका कार्यक्रमादरम्यान भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांना वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीबद्दल विचारण्यात आले. मात्र, त्यांनी यावर थेट भाष्य करणे टाळले. कपिल देव म्हणाले, “मी तुमच्यासारखाच टीव्हीवर क्रिकेट पाहतो. सुनील गावस्कर, रवी शास्त्री किंवा हर्ष भोगले यांसारखे लोक जे रोज क्रिकेट बारकाईने पाहतात, ते यावर अधिक चांगले भाष्य करू शकतील. मी घरी बसून टीव्हीवर सामने पाहतो, त्यामुळे त्यावर लगेच निकाल देणे योग्य ठरणार नाही.”

Kapil Dev on Vaibhav Sooryavanshi : आयपीएलमध्ये विक्रमांचा पाऊस

वैभव सूर्यवंशीसाठी हा हंगाम स्वप्नवत ठरत आहे. त्याने जसप्रीत बुमराह आणि जोश हेझलवूड सारख्या अनुभवी गोलंदाजांविरुद्ध निर्भयपणे फलंदाजी केली आहे. हैदराबादविरुद्ध त्याने अवघ्या 36 चेंडूत शतक ठोकले, जे आयपीएलमधील कोणत्याही भारतीयाने झळकावलेले दुसरे सर्वात वेगवान शतक ठरले आहे. या हंगामात आतापर्यंत त्याने १ शतक आणि २ अर्धशतके झळकावली आहेत.

अंडर-19 पासूनच चर्चेत

वैभवने गेल्या वर्षी गुजरात टायटन्सविरुद्ध ३५ चेंडूत शतक ठोकून सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर अंडर-19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध १७५ धावांची ऐतिहासिक खेळी करून त्याने आपली क्षमता सिद्ध केली. रियान परागच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स सध्या गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे आणि वैभवची फॉर्ममध्ये असणे ही संघासाठी जमेची बाजू ठरली आहे.

राजस्थान रॉयल्सचा पुढचा सामना ९ मे रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध होणार असून, सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा या युवा खेळाडूवर असतील.

हे देखील वाचा –

Rajasthan Royals Ownership: IPL सुरू असतानाच राजस्थान रॉयल्सची 15,660 कोटींना विक्री! पाहा कोण आहे नवे मालक

Mumbai Pune Expressway Missing Link: मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’वर सेल्फीचा नाद पडेल महागात! गाडी थांबवल्यास भरावा लागणार मोठा दंड

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या