Upcoming Sporty SUVs India: भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये सध्या एसयूव्ही गाड्यांचा वरचष्मा पाहायला मिळत आहे. ग्राहकांमध्ये वाढत्या लोकप्रियतेमुळे हॅचबॅक आणि सेडान गाड्यांच्या विक्रीला मोठा फटका बसला आहे. याच कारणामुळे आता देशातील दिग्गज वाहन उत्पादक कंपन्या आपले पूर्ण लक्ष फक्त एसयूव्ही सेगमेंटवर केंद्रित करत आहेत.
जर तुम्ही देखील उत्तम लुक आणि कडक परफॉर्मन्स असणारी नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. येत्या काळात ५ भन्नाट स्पोर्टी एसयूव्ही गाड्या भारतीय रस्त्यांवर धावण्यासाठी सज्ज होत आहेत.
१. स्कोडा कायलाक स्पोर्टलाइन (Skoda Kylaq Sportline)
स्कोडा कंपनीची ४ मीटरपेक्षा कमी लांबीची एसयूव्ही ‘कायलाक’ सध्या भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. आकर्षक डिझाईन आणि उत्तम आरामदायी सुविधेमुळे लॉन्च झाल्यापासून अवघ्या १ वर्षाच्या आत या कारच्या ५०,००० पेक्षा जास्त युनिट्सची विक्री झाली आहे. आता कंपनी याचे अधिक आकर्षक असे ‘स्पोर्टलाइन’ मॉडेल आणत आहे. या नवीन व्हेरियंटमध्ये चारही बाजूंना ब्लॅक-आउट एलिमेंट्स पाहायला मिळतील, जे कारला नेहमीच्या मॉडेलपेक्षा अधिक स्पोर्टी लुक देतील. यामध्ये १.० लीटर क्षमतेचे ३ सिलेंडर टर्बो-पेट्रोल इंजिन दिले जाईल.
२. स्कोडा कोडीयाक आरएस (Skoda Kodiaq RS)
ज्यांना मोठ्या आकाराच्या आणि वेगवान गाड्यांची आवड आहे, त्यांच्यासाठी स्कोडा कंपनी या वर्षाच्या अखेरीस आपल्या प्रीमियम एसयूव्ही कोडीयाकचे ‘आरएस’ मॉडेल भारतात सादर करणार आहे. या गाडीमध्ये क्रोम फिनिशऐवजी ग्रिल आणि इतर भागांवर ग्लॉस-ब्लैक फिनिशिंग पाहायला मिळेल, ज्यामुळे कार अधिक मस्कुलर दिसते. कारच्या अंतर्गत भागात रेड एक्सेंट, आरएस बॅजिंग आणि विशेष स्पोर्टी सीट्ससह पॅनोरमिक सनरूफसारखे प्रीमियम फीचर्स मिळतील. यात २.० लीटरचे दमदार टर्बो-पेट्रोल इंजिन असणार आहे.
३. निसान टेक्टॉन १.३ (Nissan Tecton 1.3)
निसान कंपनी येत्या ९ जुलै, २०२६ रोजी आपल्या नवीन ‘टेक्टॉन’ एसयूव्हीवरून अधिकृतपणे पडदा उचलणार आहे. या गाडीचे बाह्य डिझाईन रेनॉल्ट डस्टरपेक्षा पूर्णपणे वेगळे असून ते निसानच्या प्रसिद्ध ‘पॅट्रोल’ एसयूव्हीसारखे दिसते. मात्र, कारच्या केबिनची रचना आणि फीचर्स बऱ्याच अंशी डस्टरसारखेच राहतील. परफॉर्मन्ससाठी यामध्ये १.३ लीटरचे टर्बो-पेट्रोल इंजिन दिले जाईल. भविष्यात कंपनी याचे हायब्रिड मॉडेल देखील बाजारात आणू शकते.
४. टाटा सिएरा ईव्ही (Tata Sierra EV)
टाटा मोटर्स आपली लोकप्रिय ठरलेली ‘सिएरा’ कार आता नवीन इलेक्ट्रिक अवतारात परत आणत आहे. आगामी काही महिन्यांत लॉन्च होणारी ही ईव्ही पूर्णपणे नवीन इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. इलेक्ट्रिक कार असल्यामुळे हिचा पिक-अप अत्यंत वेगवान असेल, ज्यामुळे ही कार अवघ्या १० सेकंदांपेक्षा कमी वेळात ० ते १०० किमी प्रतितास असा वेग पकडू शकेल. यामध्ये ६५ kWh आणि ७५ kWh चे मोठे बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता असून, ही कार एका चार्जमध्ये जवळपास ५०० किमीची रेंज देऊ शकते.
५. टाटा अविन्या एक्स (Tata Avinya X)
टाटा मोटर्स आपल्या नवीन प्रीमियम इलेक्ट्रिक नेटवर्क अंतर्गत ‘अविन्या एक्स’ ही आलिशान एसयूव्ही सादर करणार आहे. या कारच्या कॉन्सेप्ट मॉडेलची पहिली झलक गेल्या वर्षी ऑटो एक्स्पोमध्ये दाखवण्यात आली होती. टाटा अविन्या एक्स ही एक लांबलचक आणि लक्झरी एसयूव्ही असेल, जी ग्राहकांना ५ सीटर, ६ सीटर आणि ७ सीटर अशा विविध पर्यायांमध्ये उपलब्ध करून दिली जाईल. या गाडीमध्ये अनेक प्रगत आणि हाय-टेक फीचर्स पाहायला मिळतील, जे सध्या टाटाच्या इतर कोणत्याही गाडीत उपलब्ध नाहीत.
हे देखील वाचा – Abhishek Banerjee Attacked: “शासकच बनले मारेकरी!”; पुतण्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ममता बॅनर्जींचा भाजप सरकारवर हल्लाबोल










