Home / महाराष्ट्र / Modi Cabinet Reshuffle: केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता, ‘हे’ मोठे नेते मंत्रिपदावरून होणार आऊट?

Modi Cabinet Reshuffle: केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता, ‘हे’ मोठे नेते मंत्रिपदावरून होणार आऊट?

Modi Cabinet Reshuffle: नवी दिल्लीतील राजकीय घडामोडींना अचानक प्रचंड वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती...

By: Team Navakal
Modi Cabinet Reshuffle: केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता , 'हे' मोठे नेते मंत्रिपदावरून होणार आऊट?
Social + WhatsApp CTA

Modi Cabinet Reshuffle: नवी दिल्लीतील राजकीय घडामोडींना अचानक प्रचंड वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. एका केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आणि मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याच्या चर्चांदरम्यान ही भेट झाल्यामुळे दिल्लीत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

२४ जून रोजी सकाळी 11 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक होणार असून, त्यानंतर पुढील 24 तासांत मोठ्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या सर्व घडामोडींच्या एक दिवस आधी, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राज्यसभा कार्यकाळ 21 जून रोजी संपला असून पक्षाने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली नव्हती. कुरियन यांच्या राजीनाम्यानंतर आता मंत्रिमंडळातील इतर काही मंत्र्यांची गच्छंती होणार असल्याचे बोलले जात आहे.

‘एक व्यक्ती, एक पद’ नियम आणि पंजाबचे बदलते समीकरण

भाजपमधील अंतर्गत सूत्रांच्या मते, आगामी विधानसभा निवडणुका आणि पक्षाच्या संघटनात्मक नियमांमुळे काही मंत्र्यांना आपली पदे सोडावी लागू शकतात:

  • रावणीत सिंग बिट्टू राज्याबाहेर: राज्यसभेची उमेदवारी न मिळालेले दुसरे केंद्रीय मंत्री रावणीत सिंग बिट्टू यांनी अद्याप राजीनामा दिला नसला, तरी त्यांनी दिल्लीतील आपला गाशा गुंडाळला आहे. पुढील वर्षी होणारी पंजाब विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी ते सज्ज झाले असून त्यांनी राज्य पातळीवरील राजकारणात उतरण्याची घोषणा केली आहे.
  • एक व्यक्ती, एक पद नियम: दिल्ली भाजपचे अध्यक्ष बनलेले केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा आणि उत्तर प्रदेश भाजपची जबाबदारी सांभाळणारे केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांना ‘एक व्यक्ती, एक पद’ या नियमामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागण्याची दाट शक्यता आहे.

३ राजकीय गणिते; बंडखोरांना सामावून घेण्याची तयारी

या आगामी फेरबदलांमागे भाजपचे ३ मोठे राजकीय हेतू असल्याचे बोलले जात आहे:

  • १. बंडखोर नेत्यांना संधी: आम आदमी पक्षातून (AAP) भाजपमध्ये आलेले राघव चड्ढा, तृणमूल काँग्रेसमधील (TMC) बंडखोर गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले खासदार यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते.
  • २. संसदेत दोन-तृतीयांश बहुमताचा आकडा: देशात मतदारसंघांची पुनर्रचना करण्यासाठी भाजपला संसदेत दोन-तृतीयांश बहुमताची गरज आहे. एप्रिल महिन्यात हे बिल मंजूर होऊ शकले नव्हते. आता इतर पक्षांतून आलेल्या खासदारांच्या पाठिंब्यामुळे भाजप या बहुमताच्या जवळ पोहोचला आहे.
  • ३. पंजाबमधील राजकीय ताकद: पंजाबमध्ये स्वतःच्या बळावर ताकद निर्माण करण्यासाठी भाजप हिंदू आणि शीख चेहऱ्यांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये राघव चड्ढा किंवा माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. तसेच अमृतसरचे मूळ रहिवासी आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ यांचेही नाव आघाडीवर आहे.

दिल्लीत तातडीच्या बैठकांचे सत्र

पंजाबमधील भाजपचे प्रभारी नितीन नबीन यांनी आपला ३ दिवसांचा दौरा अर्धवट सोडून राघव चड्ढा यांच्यासोबत तातडीने दिल्ली गाठली आहे. त्यांनी पंजाबच्या राज्यपालांची विमानतळावरच भेट घेतली आणि थेट दिल्लीचे विमान पकडले. यावरून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलाचे आणि पंजाबमधील नव्या राजकीय समीकरणांचे काम अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

हे देखील वाचा – Lohagad Fort Murder Case: लोहगडवरून होणाऱ्या पतीला ढकलणाऱ्या तरुणीने ४ दिवसांपूर्वीच केला होता तसाच प्रयत्न; २,००४ कॉल्सने उघडले गुपित

Web Title:
संबंधित बातम्या