Home / महाराष्ट्र / Devendra Fadnavis Public Transport Order: फडणवीसांचा मोठा निर्णय! मंत्री आणि अधिकारी आता आठवड्यातून एकदा मेट्रोने फिरणार; ताफाही केला अर्धा

Devendra Fadnavis Public Transport Order: फडणवीसांचा मोठा निर्णय! मंत्री आणि अधिकारी आता आठवड्यातून एकदा मेट्रोने फिरणार; ताफाही केला अर्धा

Devendra Fadnavis Public Transport Order: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीसाठी केलेल्या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली...

By: Team Navakal
Devendra Fadnavis Public Transport Order
Social + WhatsApp CTA

Devendra Fadnavis Public Transport Order: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीसाठी केलेल्या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात दोन उच्चस्तरीय बैठका घेतल्या. या बैठकीत त्यांनी राज्यातील सर्व मंत्री आणि नोकरशहा यांनी आठवड्यातून किमान एक दिवस मेट्रो किंवा सार्वजनिक बसने प्रवास करावा, असे निर्देश दिले आहेत.

Devendra Fadnavis Public Transport Order: मंत्र्यांचा ताफा होणार अर्धा

मुख्यमंत्र्यांनी स्वतःपासूनच बदलाची सुरुवात केली असून, मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या त्वरित प्रभावाने निम्मी करण्यात आली आहे. दौऱ्यावर असताना ताफ्यातील गाड्यांची संख्या मर्यादेपेक्षा जास्त होणार नाही, याची जबाबदारी स्थानिक पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षकांची असेल.

Devendra Fadnavis Public Transport Order: विमान प्रवास आणि परदेश दौऱ्यांवर निर्बंध

  • खाजगी विमान वापर टाळा: महत्त्वाचे काम नसल्यास सरकारी विमाने किंवा हेलिकॉप्टरचा वापर न करता नियमित विमान सेवेचा (एअरलाईन्स) वापर करण्याच्या सूचना मंत्र्यांना देण्यात आल्या आहेत.
  • परदेश दौरे बंद: तूर्तास मंत्री आणि अधिकाऱ्यांनी कोणतेही परदेश दौरे करू नयेत, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
  • व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर भर: अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष बैठकीला बोलावण्याऐवजी जास्तीत जास्त बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Devendra Fadnavis Public Transport Order: राज्यपालांकडूनही पुढाकार

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनीदेखील आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यांनी गृह विभागाला पत्राद्वारे कळवले असून, इंधन बचतीसाठी आणि ऊर्जेच्या संवर्धनासाठी सुरक्षा व्यवस्थेचा फेरआढावा घेऊन ताफ्याचा आकार मर्यादित करण्यास सांगितले आहे.

होर्डिंग्ज आणि सजावटीवर कारवाई

ऊर्जा बचतीसाठी अनावश्यक फ्लेक्स, होर्डिंग्ज आणि सजावटीच्या दिव्यांच्या वापरावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जागतिक संकट पाहता अर्थव्यवस्था रुळावर ठेवण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या सूचनांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे फडणवीस यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

हे देखील वाचा – Petrol Diesel Price Hike 2026: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ; पाहा तुमच्या शहरातील नवे दर

Web Title:
संबंधित बातम्या