Home / महाराष्ट्र / Mumbra Murder Case: मुंब्र्यातील मर्डर मिस्ट्रीने महाराष्ट्र हादरला! पती-पत्नीने मिळून केला प्रियकराचा गेम; मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

Mumbra Murder Case: मुंब्र्यातील मर्डर मिस्ट्रीने महाराष्ट्र हादरला! पती-पत्नीने मिळून केला प्रियकराचा गेम; मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

Mumbra Murder Case: ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरातून महिनाभरापूर्वी बेपत्ता झालेल्या एका २४ वर्षीय तरुणाच्या गूढ प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश...

By: Team Navakal
Mumbra Murder Case
Social + WhatsApp CTA

Mumbra Murder Case: ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरातून महिनाभरापूर्वी बेपत्ता झालेल्या एका २४ वर्षीय तरुणाच्या गूढ प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या तरुणाची निर्घृण हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह एका हिरव्या रंगाच्या ड्रममध्ये कोंबून वसईतील नाल्यात फेकून देण्यात आला होता.

पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेसह दोघांना अटक केली असून, आणखी दोन आरोपी सध्या फरार आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गेल्या वर्षी उत्तर प्रदेशातील मेरठ येथे झालेल्या अशाच एका थरारक हत्याकांडाची आठवण ताजी झाली आहे.

Mumbra Murder Case: पैशांच्या वसुलीसाठी गेला आणि परतलाच नाही

अर्बाज खान असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. अर्बाज 3 एप्रिल रोजी दादर येथे कोणाकडून तरी अडकलेले पैसे आणण्यासाठी घरातून निघाला होता, मात्र तो पुन्हा घरी परतलाच नाही. तो बेपत्ता झाल्यामुळे चिंतेत असलेल्या कुटुंबाने अखेर मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सुरुवातीला तो बेपत्ता झाल्याची नोंद करून तपास सुरू केला.

Mumbra Murder Case: तांत्रिक तपासाने उघड केला कट

मुंब्रा पोलिसांनी तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल लोकेशनचा आधार घेतला. यामध्ये एक महत्त्वाची माहिती समोर आली की, अर्बाज ज्या दिवशी बेपत्ता झाला, त्या दिवशी त्याचे लोकेशन वसईत होते आणि तिथे तो त्याची मैत्रीण मेहजबीन शेख हिच्यासोबत होता. या संशयावरून पोलिसांनी मेहजबीन आणि तिचा भाऊ तारिक शेख यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. पोलिसांच्या खाक्या दाखवताच दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.

Mumbra Murder Case: खंडणीसाठी खून आणि मृतदेहाची विल्हेवाट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण कटात मेहजबीनचा पती हसन आणि तारिकचा मित्र मुअज्जम पठाण हे देखील सामील होते. आरोपींनी अर्बाजकडे खंडणीची मागणी केली होती, मात्र अर्बाजने ती देण्यास नकार दिला. याच रागातून आरोपींनी त्याची हत्या केली. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी अर्बाजचा मृतदेह एका हिरव्या रंगाच्या प्लास्टिक ड्रममध्ये कोंबला आणि तो वसईतील एका निर्जन नाल्यात फेकून दिला. पोलिसांनी नाल्यातून हा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह जप्त केला आहे.

दोघे गजाआड, दोघे फरार

पोलीस उपायुक्त प्रिया ढामणे यांनी या कारवाईला दुजोरा दिला आहे. पोलिसांनी मेहजबीन शेख आणि तारिक शेख यांना अटक केली असून, फरार झालेले इतर दोन आरोपी हसन आणि मुअज्जम पठाण यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाची आठवण ताजी

या घटनेमुळे मार्च 2025 मधील मेरठ येथील ‘ब्लू ड्रम’ मर्डर केसची आठवण पुन्हा जागी झाली आहे. तिथे मुस्कान रस्तोगी नावाच्या महिलेने तिच्या प्रियकराच्या मदतीने पती सौरभ राजपूतची औषध देऊन हत्या केली होती. त्यानंतर त्यांनी मृतदेहाचे 15 तुकडे करून ते सिमेंटच्या ओल्या मिश्रणासह एका निळ्या ड्रममध्ये बंद केले होते. वसईतील घटनेने पुन्हा एकदा अशाच क्रूरतेचे दर्शन घडवले आहे.

हे देखील वाचा – PM Modi on Foreign Travel Tax: परदेश प्रवासावर नवीन कर लागणार? सोशल मीडियावरील ‘त्या’ चर्चेवर स्वतः पंतप्रधान मोदींनी दिले स्पष्टीकरण

Web Title:
संबंधित बातम्या