Home / महाराष्ट्र / Pune News : पुण्यात ‘संतोष माने’ प्रकरणाची पुनरावृत्ती टळली! मद्यधुंद व्यक्तीने बस पळवली; माथेफिरूला पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडले

Pune News : पुण्यात ‘संतोष माने’ प्रकरणाची पुनरावृत्ती टळली! मद्यधुंद व्यक्तीने बस पळवली; माथेफिरूला पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडले

Pune News : पुण्यातील वर्दळीचा भाग असलेल्या डेक्कन परिसरात शनिवारी दुपारी एका विचित्र घटनेने खळबळ उडाली. एका मद्यधुंद व्यक्तीने सार्वजनिक...

By: Team Navakal
Pune News
Social + WhatsApp CTA

Pune News : पुण्यातील वर्दळीचा भाग असलेल्या डेक्कन परिसरात शनिवारी दुपारी एका विचित्र घटनेने खळबळ उडाली. एका मद्यधुंद व्यक्तीने सार्वजनिक वाहतुकीची बस चोरून ती रस्त्यावर सुसाट चालवण्यास सुरुवात केली. सुदैवाने, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा भीषण अपघात टळला असून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.

नेमका प्रकार काय घडला?

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र बँक चौकातून या व्यक्तीने अचानक बसचा ताबा मिळवला आणि ती पळवली. ही बस गुडलक चौक आणि कारंजी मार्गे पुन्हा डेक्कन बस स्थानकाकडे आली. यावेळी बसचा वेग आणि चालकाची अवस्था पाहून परिसरात असलेल्या नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती.

योगायोगाने, त्या दिवशी जवळच असलेल्या कलाकार कट्ट्यावर एक आंदोलन सुरू होते. त्यामुळे घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा आणि माध्यम प्रतिनिधी हजर होते. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी वेळ न गमावता बसचा पाठलाग सुरू केला. थोड्याच अंतरावर पोलिसांनी मोठ्या शिताफीने बस रोखली आणि चालकाला खाली खेचून ताब्यात घेतले.

२०१२ च्या त्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेची आठवण

या घटनेमुळे पुणेकरांच्या मनात २५ जानेवारी २०१२ रोजी घडलेल्या संतोष माने प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या. त्यावेळी स्वारगेट डेपोतून एसटी बस पळवून संतोष मानेने शहरात ९ निष्पापांचा बळी घेतला होता. शनिवारच्या घटनेने पुन्हा एकदा पुण्याच्या रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

परंतु, डेक्कनमधील या घटनेत पोलिसांच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही. तो इसम पूर्णपणे मद्याच्या नशेत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हे देखील वाचा – 

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांच्या पोरानं जयपूरमध्ये राडा घातला; 36 चेंडूत शतक ठोकत वैभव सूर्यवंशीने इतिहास रचला

KL Rahul Record: केएल राहुलचा धमाका! आयपीएलमध्ये १५० धावांचा टप्पा ओलांडणारा पहिला भारतीय; मोडला १५ वर्षांपूर्वीचा विक्रम

Web Title:
संबंधित बातम्या