वर्ध्याच्या महाकाळीतील धाम धरण ओव्हरफ्लो

वर्धा – मुसळधार पावसामुळे वर्धा शहरासह आजूबाजूच्या ११ ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणारा महाकाळी येथील धाम धरण १०० टक्के भरले. या धरणातील पाणी ओसंडून वाहू लागले आहे. यामुळे वर्धा शहराच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. या धरणाची उंची वाढविण्यात आली होती. नदीत विसर्ग सुरू झाल्याने काचनूर, खरांगणा, आंजी, मोरांगणा या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धनोडी येथील […]

केजरीवाल यांना दिलासा नाहीच सीबीआय कोठडीत वाढ

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अद्याप दिलासा नाहीच. दिल्ली मद्य धोरण कथित घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राऊज एव्हेन्यू स्पेशल न्यायालयाने त्यांची सीबीआय कोठडी ८ ऑगस्टपर्यंत वाढवली आली आहे.विशेष न्यायमूर्ती कावेरी बावेजा यांनी आज हे निर्देश दिले. या सुनावणीवेळी केजरीवाल हे तिहार कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. ३१ जुलैला होणाऱ्या पुढील […]

रायगडच्या सर्व शाळांना सुट्टी

रायगड- आज रायगड जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली होती. रायगड जिल्ह्याला काल रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे अनेक भागात नद्या ओसंडून वाहू लागल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यात रोहा शहरातील कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे शहरात अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. महाड शहरातही काही भागात पाणी चढले होते. जिल्ह्याला रेड अलर्ट दिला असल्याने […]

मावळ आणि मुळशीमधील पर्यटन स्थळे २९ जुलै पर्यंत बंद

पुणे- अतिवृष्टीमुळे मावळ आणि मुळशीमधील सर्व पर्यटनस्थळे २९ जुलैपर्यंत बंद राहणार आहेत. या दोन्ही भागांतील विविध पर्यटनस्थळे, मंदिरे, धबधब्यांवर पर्यटकांना जाण्यास बंद घातली आहे.हवामान विभागाने पुढील पाच दिवस पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मावळ व मुळशी विभागाचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी २९ जुलैपर्यंत […]

ज्येष्ठ मराठी साहित्यिक फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन

मुंबई – ज्येष्ठ मराठी साहित्यिक, पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ते आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे आज पहाटे वसईतील राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.फादर दिब्रिटो हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. वसईच्या जेलाडी येथील निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे त्यांनी शेवटचा श्वास घेतला.दुपारी साडेतीन […]

मीरारोडच्या जलतरण तलावासाठी ९९ झाडांवर कुर्‍हाड चालवणार

भाईंदर- मुंबई-अहमदाबाद महामार्गाजवळ मीरारोडच्या काशिमीरा परिसरातील मीरागाव भागात जलतरण तलाव उभारला जाणार आहे.त्यासाठी जवळपास ९९ झाडे तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यातील ९३ झाडे तर मुळासकट तोडली जाणार आहेत.तर केवळ ६ झाडांचे पुनरोपण केले जाणार आहे. मीरा- भाईंदर पालिकेच्या या निर्णयावर पर्यावरणप्रेमींनी मात्र संताप व्यक्त केला आहे. मीरागाव भागात इकोसिटी बांधकाम प्रकल्पाच्या बाजूला व संजय गांधी […]

वाळूशिल्पकार सुदर्शन यांनी राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली

नवी दिल्ली – वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी आज दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. १२ जुलैला सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय वाळूशिल्प स्पर्धेत सुदर्शन पट्टनाईक यांना सुवर्णपदकासह गोल्डन सँड मास्टर पुरस्कार मिळाल्याबद्दल द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचे अभिनंदन केले.सुदर्शन पटनायक यांचा जन्म १५ एप्रिल १९७७ मध्ये ओडिशा येथील पुरीमध्ये झाला. २०१४ मध्ये त्यांना श्री पद्मश्री […]

पॅराग्लायडिंग विश्वचषक स्पर्धेचे यजमान पद भारताला मिळाले

शिमला – पॅराग्लायडिंग विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी यावेळी भारताला मिळाली आहे.हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यातील बीर-बिलिंग येथे येत्या २ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.५० देशांतील १३० स्पर्धक यामध्ये सहभागी होणार आहेत.गेल्या वर्षी बीर-बिलिंग येथे पॅराग्लायडिंग अॅक्युरसी प्री-वर्ल्ड कप आणि पॅराग्लायडिंग क्रॉस-कंट्री प्री-वर्ल्ड कप स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.त्यानंतर आता पॅराग्लायडिंग […]

मुंबईतील पाणीकपात २९ जुलैपासून मागे घेणार

मुंबई : शहरात मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असल्यामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत सध्या सुरू असलेली १० टक्के पाणीकपात आता मागे घेण्यात येणार आहे. २९ जुलैपासून मुंबईतील पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी जाहीर केला आहे. मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात घट […]

भरपावसात जव्हार तालुक्यात पोंढीचा पाडा पुलाला भगदाड

पालघर- जव्हार तालुक्यात मागील सात दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.या पावसामुळे तालुक्यातील झाप मार्ग ते मांगेलवाडा पासून चोथ्याची वाडीपर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.त्यातच पोंढीचा पाडा गावाजवळ असलेल्या पुलाला साधारण साडेतीन फूट व्यासाचे भगदाड पडले असून त्यामुळे अनेक गावपाड्यांचा संपर्क तुटला आहे.तसेच याठिकाणी अपघाताची शक्यता वाढली आहे. गेल्या वर्षभरापासून एस आकाराच्या वळणात रस्ता खचला […]

चीनमध्ये निवृत्तीचे वय ७० वर्ष करणार

बीजिंग- चीनचा जन्‍मदर घसरत चालला असून वृद्धांची संख्‍या मात्र वाढत आहे.त्‍यामुळे देशात काम करणार्‍यांची संख्‍या कमी होत आहे. ही परिस्‍थिती लक्षात घेऊन चीन सरकारने निवृत्तीचे वय १० वर्षांनी वाढवून ७० वर्ष केले जाणार आहे . चीनमध्‍ये पुरुष ६० व्‍या वर्षी आणि महिला ५५ व्‍या वर्षी निवृत्त होतात.कठोर परिश्रमात गुंतलेल्‍या महिलांना ५० वर्षांनंतरच सेवानिवृत्ती मिळते. चीनमधील […]

दोडामार्ग तालुक्यातील मणेरी रस्त्याची दुरवस्था

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील दोडामार्ग- बांदा राज्य मार्गावर असलेल्या मणेरी येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे.या रस्त्यावरुन वाहन चालकांना अक्षरशः कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत.या रस्त्यामुळे पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. दोडामार्ग तालुक्यातील अनेक रस्ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त केले होते.मात्र, दोडामार्ग- बांदा मार्गवरील मणेरी येथे रस्त्याची […]

अमरावतीत शेतमजुरांना घेऊन जाणारी रिक्षा उलटली

अमरावती- अमरावती जिल्हातील तिवसा येथे शेतमजुरांना घेऊन निघालेली रिक्षा उलटली. या अपघात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र १० शेतमजूर जखमी झाले, त्यातील ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात तिवसा सार्शी मार्गावर घडला. अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील शेतमजुरांना घेऊन रिक्षा तिवसा-शर्शी मार्गावरील असलेल्या शेताकडे निघाला होती. मात्र अचानक रिक्षासमोर कुत्रा आडवा आल्याने चालकाचे नियंत्रण […]

१० वर्षांनंतर सिंधुदुर्गात सापडला हत्तीरोगाचा रुग्ण

मालवण- सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० वर्षांनंतर पुन्हा एकदा हत्ती रोगांचा शिरकाव झाला आहे.मालवण तालुक्यात हत्तीरोगाचा रुग्ण सापडला आहे.हा रुग्ण एक महिला असून तिच्यावर आरोग्य विभाग औषधोपचार करत आहे.दरम्यान, हा रुग्ण गेल्या महिन्यात सापडला असून त्यानंतर आतापर्यंत मालवण तालुक्यातून १२३८ जणांचे नमुने घेतले आहेत. २०१४ मध्ये जिल्ह्यात हत्तीरोगाचा शेवटचा रुग्ण आढळून आला होता. मालवण तालुक्यात त्यावेळी ७१ […]

ओमराजे निंबाळकरांवर निवडणूक आयोगाची कारवाई

धाराशिव- धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, कैलास पाटील यांच्यासह त्यांचे दोन अंगरक्षक असे एकूण चार जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले. मतमोजणी केंद्रात अंगरक्षकांसह प्रवेश केल्याने आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी केली होती. त्यानंतर आता निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी गुन्हा नोंद […]

कंगना रनौट यांच्या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान

मनाली – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून विजयी झालेल्या खासदार अभिनेत्री कंगना रनौट यांच्या निवडीला हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवरील सुनावणीप्रसंगी न्यायालयाने काल रनौट यांना नोटीस बजावली. लायक राम नेगी असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. नेगी यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र […]

सर्वात जुन्या मशीदीवर जर्मनीने घातली बंदी !

बर्लिन- जर्मनी आणि युरोपमधील सर्वांत जुन्या मशिदीपैकी एक असलेल्याइस्लामिक सेंटर हॅम्बुर्ग (आयझेडएच)आणि त्याच्या संबंधित संघटनांवर बंदी घातली आहे.पोलिसांनी देशभरातील ५३ मालमत्तांवर छापे टाकल्यानंतर ही कारवाई केली.जर्मनीच्या गृहमंत्री नॅन्सी फेझर यांनी सांगितले की,तपासातील पुराव्यांवरून आयझेडएचच्या कामकाजाबद्दल संशय निर्माण होत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. आयझेडएचवर जर्मनीमध्ये इस्लामवादी-अतिरेकी, निरंकुश विचारसरणीला प्रोत्साहन देण्याचा आणि हिजबुल्लाला पाठिंबा देण्याचा आरोप […]

नाट्य निर्मात्याची फसवणूक केली! जरांगे-पाटलांविरोधात अटक वॉरंट

पुणे -मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले मनोज जरांगे-पाटील 13 वर्षांपूर्वीच्या एका फसवणुकीच्या प्रकरणामुळे आज अडचणीत आले. एका नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणीच्या खटल्यात पुण्यातील न्यायालयाने जरांगे-पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केल्याने जरांगेंच्या उपोषणाची चर्चा फसवणूक प्रकरणाकडे वळली. जरांगेंनीही त्यावर आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत आगपाखड केली. मला अडकविण्यासाठी जुने प्रकरण उकरून काढल्याचा आरोप करीत ते म्हणाले की, […]

उद्धव व आदित्य ठाकरेंना अडकवण्याचा भाजपाचा कट अनिल देशमुखांवर दबाव! श्याम मानव यांचा गौप्यस्फोट

नागपूर – तीन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना नेते अनिल परब यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी कट आखण्यात आला होता. त्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता, असा खळबळजनक गौप्यस्फोट अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे (अंनिस) संस्थापक सदस्य श्याम मानव यांनी आज नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना […]