जपानमध्ये कामगारांना ४ दिवसांचा आठवडा

टोकियो – जपानमधील कामगार हे त्यांच्या भाषेतील एका म्हणीनुसार अक्षरशः मरेपर्यंत काम करत असतात. त्यांना आपल्या कामातून काही उसंत मिळावी, इतर काही कौशल्य शिकून घ्यावे त्याचप्रमाणे आपल्या कटुंबियांना अधिक वेळ देता यावा यासाठी जपानमध्ये आता आठवड्यातून केवळ ४ दिवस काम व ३ दिवसांची सुटी अशी पद्धत आणली जात आहे. कार्यपद्धतीत हा बदल करण्याचा निर्णय जपानच्या […]

एअर इंडिया विमानाततुटलेली खुर्ची होती क्रिकेटपटू जॉन्टी रोड्सची तक्रार

नवी दिल्ली – एअर इंडियाच्या प्रवासादरम्यान आलेल्या वाईट अनुभवाबद्दल दक्षिण अफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी रोह्डसने आपल्या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये नाराजी व्यक्त केली आहे.जॉन्टी सध्या भारतात असून त्याने म्हटले आहे की, माझे विमानप्रवासाच्या वाईट अनुभवाचे सत्र अद्यापही सुरु आहे. एअर इंडियाचे मुंबई ते दिल्ली विमान दीड तास उशिरा निघाले. त्यानंतर मी विमानात माझ्या जागेवर आलो तेव्हा लक्षात […]

हिमाचल प्रदेश राज्यात पावसामुळे ७० रस्ते बंद

सिमला- मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशात राज्यातील तब्बल ७० रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामध्ये सिमल्यातील ३५, मंडीतील १२,कांगडातील ११,कुलूतील ९ तसेच उना, सिरमौर,लाहोल आणि स्पिती जिल्ह्यातील प्रत्येकी एका रस्त्यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील २२ वीज उपकेंद्रातील वीज पुरवठा विस्कळित झाला आहे. हिमाचलच्या हवामान खात्याने यलो ॲलर्ट जारी केला असून […]

समृद्धी मार्गावर पुन्हा अपघात टेम्पो ट्रॅव्हलरची ट्रकला धडक

*१५ प्रवासी गंभीर जखमी छत्रपती संभाजीनगर – समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळ पुन्हा एकदा आयशर ट्रक आणि टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात झाल्याची घटना आज पहाटे घडली.उभ्या असलेल्या आयशर ट्रकला टेम्पो ट्रॅव्हलरने पाठीमागून जोरदाची धडक दिली.या अपघातात १५ प्रवासी गंभीर जखमी झाले.यातील टेम्पो चालक आणि क्लिनर यांची प्रकृती चिंताजनक आहे. समृद्धी महामार्गावर एक आयशर ट्रक काही कारणास्तव […]

सप्टेंबरमध्ये लाडकी बहीणची नोंदणी केल्यास दोन महिन्यांचा लाभ नाही

गडचिरोली- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरवात करत प्रत्येक महिलेला दार महिन्याला १५०० रुपये घोषणा केली होती. त्यानुसार या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत नोंदणी करण्याची मुदत होती. ३१ ऑगस्टपर्यंत नोंदणी करणाऱ्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे एकत्रित जमा झाले आहेत. योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्याने उर्वरित महिलांनीदेखील नोंदणी करण्यास सुरुवात केली […]

आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यावेळी त्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेणार आहेत. त्यासाठी शहरातील वाहतूकीत मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. त्याशिवाय राष्ट्रपतींच्या दौऱ्यावेळी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी भाविकांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने आवाहन केल आहे की, देवीच्या दर्शनासाठी द्रौपदी मुर्मू या […]

पुतीन यांच्याकडून किम जोंगना २४ उमद्या अश्वांची भेट

मॉस्को – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी उत्तर कोरियाचा हूकुमशाह किम जोंग यांना २४ जातीवंत उमदे घोडे भेट दिले आहेत. उत्तर कोरिया बरोबरच्या मैत्रीचे प्रतिक म्हणून हे घोडे भेट म्हणून पाठवण्यात आले आहेत.जागतिक राजकारणात रशिया व अमेरिका हे कायम एकमेकांचे शत्रू राहिलेले आहेत. त्यानुसारच त्यांची इतर देशांशी मैत्री असते. लहान देशांना आपल्याकडे वळवतांना ते शत्रूचा […]

कराडच्या खोडजाईवाडीचा एमआय तलाव १०० टक्के भरला

कराड- यंदा तालुक्यातील मसूर गावच्या पूर्वेला असलेल्या खोडजाईवाडी (किवळ) गावातील एमआय तलाव १०० टक्के भरल्याने सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.त्यामुळे ग्रामस्थांचा शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. सुमारे ६५ एकर जागेत पसरलेल्या या खोडजाईवाडी तलावात २०१४ पासून पाणीसाठा सुरू झाला आहे. गेल्यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने हा एमआय टँक कोरडा पडला होता.त्यामुळे या गावाला दुष्काळाचा […]

ठाणे जिल्ह्यात सप्टेंबरपासून कुत्रे, बैल, गायी म्हशींची गणना

ठाणे- ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात कुत्र्यांसह बकरे,गाई,बैल, शेळ्या-मेंढ्या आहेत. याची गणना सप्टेंबरमध्ये होणार आहे.घरोघरी जाऊन आणि पशुपालन संस्थांमध्ये ही पशुगणना होणार आहे. त्यासाठी महापालिका सहाय्य करणार असून प्रथमच मोबाइलमार्फत ही गणना प्रगणक करणार आहेत.४ हजार घरामागे एका प्रगणकाला काम करावे लागणार असल्याची माहिती डॉ‌.वल्लभ जोशी, जिल्हा पशसंवर्धन उपआयुक्त ठाणे,जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी […]

शरद पवार ४ दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उद्यापासून चार दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा आहे. या चार दिवसांच्या दौऱ्यात शरद पवार भेटीगाठीचा कार्यक्रम व बैठकांचे आयोजन केले आहे. तसेच कागल येथील गैबी चौकात शरद पवारांच्या उपस्थितीत भाजपाचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात […]

व्यावनसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ

मुंबई- सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल केला असून आजपासून मुंबईत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत ३९ रुपयांनी वाढवली आहे. त्यामुळे १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर आजपासून १,६९१ रुपयांना मिळणार आहे. ही दरवाढ फक्त व्यावसायिक सिलिंडरच्या दरामध्येच असणार आहे. घरगुती […]

राहुल गांधी ३ दिवसीय अमेरिका दौऱ्यावर

नवी दिल्ली- लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांचा हा दौरा ८ सप्टेंबर ते १० सप्टेंबर पर्यंत असणार आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच अमेरिकेला जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते डलास आणि वॉशिंग्टनला भेट देतील. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी ही माहिती दिली. […]

मेट्रो- ३ पहिल्या टप्प्यातील रेल्वे प्रवास २४ सप्टेंबरपासून

मुंबई- मुंबईकरांसाठी एक महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मेट्रो- ३ च्या पहिल्या टप्प्यातील बीकेसी ते आरे कॉलनी दरम्यानचा रेल्वे प्रवास २४ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या टप्प्यातील ९७ टक्के काम पूर्ण झाले आहे,अशी माहिती मिळाली असल्याचे वॉचडॉग फाऊंडेशनचे अ‍ॅड.गॉडफ्रे पिमेंटा यांनी सांगितले. वॉचडॉग फाऊंडेशनचे अ‍ॅड.गॉडफ्रे पिमेंटा यांनी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडे मेट्रो-३ च्या वस्तुस्थितीबाबत माहिती अर्ज […]

गोव्यातील डिचोली शहरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर

पणजी- उत्तर गोवा जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या डिचोलीशहरावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे.कालपासून खासदार सदानंद तानवडे , माजी खासदार विनय तेंडुलकर आणि आमदार डॉ.चंद्रकात शेट्टे व नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्या हस्ते उद्घाटन करून हे कॅमेरे प्रत्यक्ष सुरू करण्यात आले आहेत. शहरातील वाढत्या चोर्‍या आणि गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे अशी मागणी शहरातील […]

आता मुंबईतील ३० वर्षे जुन्या ६६ इमारतीची दुरुस्ती होणार !

१५० कोटींच्या निधीलाराज्य सरकारची मान्यता मुंबई- राज्य सरकारने मुंबईतील ३० वर्षे जुन्या ६६ इमारतींची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी शासनाने १५० कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र निवारा निधीतून उपलब्ध करून देण्यास विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे. मुंबईतील ६६ इमारती ३० वर्षे जुन्या असून सध्या या इमारतींची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. आर्थिक परिस्थितीमुळे रहिवाशांना त्यांच्या […]

वाशिममध्ये ट्रक अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

वाशिम- एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना जिल्ह्यातील मंगरूळपिरनजीक साखरा फाट्याजवळ काल दुपारी घडली. या भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा जागीच मूत्यू झाला.राजू देवराव खोरणे (३०) आणि अनिल देवराव खोरणे (२७) अशी या मृत भावांची नावे आहेत. मृत राजू आणि अनिल हे दोघे भाऊ वाशिमवरून दुचाकीने आपल्या पारडी गावाकडे जात होते. त्याची गाडी […]

नितीशच्या जनता दलाचे प्रवक्ते के. सी. त्यागींचा राजीनामा

पाटणा- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल संयुक्तचे राष्ट्रीय प्रवक्ते के.सी.त्यागी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. व्यक्तिगत कारणासाठी आपण हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले असले तरी लोकशाही आघाडी सरकारच्या विरोधातील त्यांनी केलेल्या काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. के.सी.त्यागी यांच्या जागी राजीव रंजन प्रसाद […]

२० वर्षे बंद बोअरवेलमधून उडाले ६० फुटांपर्यंत पाणी

नंदुरबार- तालुक्यातील संततधार पावसातच खोंडामळी गावात गुरुवारी एक चमत्कार घडला.एका शेतकर्‍यांच्या २० वर्षे बंद असलेल्या बोअरवेलमधून अचानकपणे तब्बल ६० फुटांपर्यंत आकाशात पाण्याचे फवारे उडाले. शेवटी बोअरवेलवर दगड ठेवून पाण्याचा प्रवाह बंद करण्यात आला. खोंडामळी गावात राहणारे शेतकरी मधुकर सावंत यांनी आपल्या शेतात २० वर्षांपूर्वी एक बोअरवेल खोदली होती.मात्र ही बोअरवेल तेव्हापासुन बंद अवस्थेत होती.या बंद […]

मविआचे आज ‘जोडे मारा’आंदोलन! परवानगी नाही! मात्र मोर्चा होणारच!

मुंबई- राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याने त्यांचा अवमान झाला आहे. त्याच्या निषेधार्थ उद्या महाविकास आघाडीकडून महायुती सरकारच्या विरोधात मुंबईत हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया असा मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी ‘सरकारला जोडे मारा‘ आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाला अद्याप पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. मात्र पोलिसांनी परवानगी दिली नसली तरीही उद्याचे आंदोलन होणारच, […]