मरिन ड्राइव्हच्या इमारतींची उंची ५८ मीटरपर्यंत कशी वाढवली?

मुंबई – दक्षिण मुंबईतील मरिन ड्राइव्ह परिसरात इमारतींच्या पुनर्विकासात इमारतीना ५८ मीटरपर्यंत उंचीची परवानगी देऊन बांधकाम व्यवसायिकांवर महेरबान झालेल्या महापालिकेच्या कारभारवर तीव्र नाराजी व्यक्त करत उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने इमारतींना २४ मीटर ऐवजी ५८ मीटर उंचीला परवानगी देऊन टोलेजंग इमारती उभारल्या जाणार आहेत. […]

ऐन दिवाळीत थंडीऐवजी पावसाची शक्यता

मुंबई – पश्चिम बंगालवर धडकलेल्या ‘दाना’ चक्रीवादळाचा परिणाम राज्यात होणार असल्याचे चित्र दिसते. यामुळे राज्यात यावर्षी दिवाळीत थंडी ऐवजी पाऊस पडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून यामुळे राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती.आज आणि […]

दुबईत पायी चालणार्‍या ४४ हजार लोकांना दंड

दुबई- दुबईत वाहतूक नियमांचे काटेकोर पद्धतीने पालन केले जाते. फक्त वाहनचालकच नाही तर रस्त्याने पायी चालणाऱ्या नागरिकांनादेखील वाहतूक नियमांचे पालन करावे लागते. त्यानुसार दुबईत पायी चालणाऱ्या ४४ हजार लोकांना दंड ठोठावण्यात आला आहे.वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.या पादचाऱ्यांवर प्रत्येकी ४०० दिनारचा दंड ठोठावण्यात आला आहे. दुबईत पायी चालणाऱ्यांसाठी ‘जे वॉकिंग’ नावाचा कायदा […]

नासाचे चार अंतराळवीर पृथ्वीवर सुखरुप परतले

वॉशिंग्टन – अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाची आणखी एक अंतराळ मोहीम आज यशस्वी झाली. एन्डेव्हर नावाचे नासाचे अंतराळ यान चार अंतराळवीरांना घेऊन पृथ्वीवर पोहोचले.क्रू -८ ड्रॅगन एन्डेव्हर नावाची ही अंतराळ मोहीम खरेतर कमी कालावधीसाठी आखण्यात आली होती. काही तांत्रिक कारणांमुळे ही मोहीम लांबली.आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर तब्बल २३३ दिवस वास्तव्य करून चार अंतराळवीर सुखरुप पृथ्वीवर परतले.मॅथ्यू […]

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण महाराष्ट्र सरकारची याचिका फेटाळली

नवी दिल्ली – सुप्रीम कोर्टाने आज महाराष्ट्र सरकार व सीबीआयला दणका दिला. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयने अभिनेत्री रिया चक्रवर्ती व तिच्या कुटुंबियांविरोधात लुकआऊट नोटीस बजावली होती. ही नोटीस रदद् करण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या निकालाविरोधात सीबीआयसह सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.मात्र सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली आणि हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला .सीबीआयने २०२० मध्ये […]

रतन टाटांच्या मृत्यूपत्रात पाळीव श्वानाचेही नाव

मुंबई – प्रसिध्द उद्योगपती दिवंगत रतन टाटा यांचा दानशूरपणा आणि प्राणिप्रेमाचा आणखी एक उदाहरण त्यांच्या मृत्यूपश्चात समोर आले आहे. आपल्या पश्चात हजारो कोटींची संपत्ती रतन टाटा आपल्या वारसांसाठी मागे ठेवून गेले आहेत. त्यांच्या मृत्यूपत्रात वारसांची नावे आहेतच त्याचबरोबर टाटा यांनी आपल्या पाळीव श्वान टिटो याच्यासाठीदेखील तरतूद करून ठेवली आहे.रतन टाटा यांची सुमारे दहा हजार कोटी […]

शेअर बाजारातमोठी घसरण

मुंबई – शेअर बाजारात विक्रीचा मारा आज सलग पाचव्या दिवशी कायम राहिला. मुंबई शेअर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही सलग पाचव्या दिवशी मोठी घसरण झाली.सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी १ हजार अंकांनी घसरला.मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात जोरदार विक्री झाली. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, उर्जा कंपन्यांमध्ये विक्रीचा जोर दिसून आला. बँकिंग आणि ऑटोमोबाईल निर्देशांक घसरणीसह बंद झाले.

टीव्ही पाहणे महागणार १८ टक्के जीएसटी लागून

नवी दिल्ली- यावर्षी जुलै महिन्यात मोबाईल रिचार्ज महाग झाले. त्यानंतर आता टीव्ही बघणे महाग होणार आहे.केंद्र सरकारने नुकताच चॅनेलच्या शुल्कामध्ये वाढ आणि १८ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला.मात्र या निर्णयाला तामीळनाडूसह देशभरातून विरोध होऊ लागला आहे. ट्रायने केबल टीव्ही चॅनेलच्या शुल्कामध्ये वाढ केली आहे. जीएसटी १८ टक्के लावला आहे. याविरोधात केबल टीव्ही ऑपरेटरने नाराजी व्यक्त […]

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ३ जवान शहीद! दोघेजण जखमी

श्रीनगर- जम्मू काश्मीरमधील गुलमर्गजवळ लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला.या हल्ल्यात लष्कराचे २ जवान शहीद झाले, तर दोघेजण जखमी झाले. लष्करात मजूर म्हणून काम करणाऱ्या दोन नागरिकांचा मृत्यू झाला. गुलमर्गच्या नागीन भागात नियंत्रण रेषेपासून ५ किमी अंतरावर हा हल्ला झाला. जम्मू-काश्मीरच्या गुलमर्गमध्ये भारतीय लष्कराचे वाहन नियंत्रण रेषेकडे चालले असताना दहशतवाद्यांनी या वाहनावर अंदाधुंद गोळीबार केला.या गोळीबारात […]

आजपासून करार संपल्याने चिपी – मुंबई विमानसेवा बंद

मालवण – सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान बनलेली चिपी-मुंबई विमानसेवा ऐन दिवाळी आणि निवडणूक काळात बंद होणार आहे. चिपी-मुंबई विमानसेवा तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सुरू करण्यात आली होती. मात्र त्याची मुदत उद्या शनिवार २६ ऑक्टोबर रोजी संपणार असल्याने हवाई प्रवासाची तिकीट विक्री २६ आॅक्टोबरला बंद होणार आहे. तब्बल २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ९ ऑक्टोबर २०२१ पासून सिंधुदुर्गातील ‘चिपी […]

पुण्यात लोकवस्तीत बिबट्याचा वावर

पुणे – वाघोली शहरामध्ये जुन्या भाडळे वस्तीत डिकॅथलॉन दुकानाच्या शेजारी असलेल्या वस्तीमध्ये बिबट्याचा वावर आढळला.चार दिवसांपूर्वी परिसरातील मेंढपाळाच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला होता. या हल्यात मेंढीचे एक पिल्लू फस्त केले होते .हा परिसर लोकवस्तीचा असून शेजारी अंगणवाडी आहे. यामुळे येथील लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.या परिसरातील रहिवाशांनी या ठिकाणी पिंजरा लावण्याची अनेक […]

दाना चक्रीवादळाचा वेग मंदावला पूर्वतयारीमुळे जिवीतहानी नाही

कोलकाता – अंदमान जवळील समुद्रात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे निर्माण झालेल्या दाना चक्रीवादळाचा परिणाम पश्चिम बंगाल, ओडिशासह ७ राज्यांना बसला. विविध राज्यातील प्रशासनांनी केलेल्या पूर्वतयारीमुळे व एनडीआरएफच्या तत्परतेमुळे या वादळात जिवीतहानीचे वृत्त नसले तरी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.ओडीशातील केंद्रपारा जिल्ह्यातील भितरकनिका आणि भद्रक जिल्ह्यातील धामरामध्ये ११० किमी प्रतितास वेगाने वारे वाहिले. या चक्रीवादळामुळे ओडिशात […]

मतदानासाठी २० नोव्हेंबरला सार्वजनिक सुटी जाहीर

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान असून या दिवशी राज्य शासनाने सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. अधिकाधिक लोकांनी मतदान करावे यासाठी ही सुटी जाहीर करण्यात आली आहे.या आदेशानुसार राज्यातील उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या उपक्रम व आस्थापनांना आपल्या कर्मचाऱ्यांना ही सुटी द्यावी लागणार आहे. ज्या आस्थापनांना काम बंद करणे शक्य नसेल त्यांनी कर्मचाऱ्यांना मतदानासाठी […]

जपानी अमेरिकन कंपन्यांची शिपरॉकेट कंपनीत गुंतवणूक

नवी दिल्ली – जपानच्या एमयुएफजी म्हणजेच मित्सुबिशी युएफजे फायनन्शियल ग्रुप आणि अमेरिकेतील कॉन्ग्लोमेराटे कोच ग्रुप यांनी भारतातील शिपरॉकेट कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी राष्ट्रीय स्पर्धा आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे.शिपरॉकेट ही २२० देशांमध्ये कुरिअर सेवा आहे. या कंपनीतील गुंतवणुकीसाठी राष्ट्रीय स्पर्धा आयोगाची परवानगी आवश्यक असते. एमयुएफजी बँक ही भारतातील बँकींग क्षेत्रात कार्य करत असून त्यांना शिपरॉकेट मध्ये […]

जेजुरी जवळील एसटी अपघातात १० जखमी

पुणे – बारामतीहून जेजुरीकडे जाणाऱ्या एसटी बसला झालेल्या अपघातात दहा जण जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील दोघांची प्रकृती गंभीर आहे.जेजुरीकडे जाणारी ही एसटी बस काल संध्याकाळी जेजुरी मोरगाव रस्त्यावरील मावडी गावाजवळ आला असता बसच्या चालकाला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्याचा बसवरील ताबा सुटला व बस रस्त्यालगतच्या मोरीत कोसळली. या […]

इम्रान खानच्या पत्नीला जामीन ९ महिन्यांनंतर कारागृहातून बाहेर

इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. बुशरा बीबी तब्बल २६५ दिवसांनंतर रावळपिंडी येथील आदियाला कारागृहातून बाहेर आल्या आहेत. बुशरा बीबी यांना गेल्या वर्षी ३१ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. सत्तेवर असताना सरकारी तिजोरीतील मालमत्ता विकण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्या […]

प्रताप पाटील चिखलीकरांचे वीस वर्षांत पाचव्यांदा पक्षांतर

मुंबई – राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.अनेक नेते पक्षांतर करत आहेत.पक्षाने उमेदवारी नाकारली की लगेच दुसऱ्या पक्षात उडी मारून उमेदवारी पदरात पाडून घेत आहेत. भाजपाचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे त्यातील एक नाव आहे .चिखलीकरांनी मागील वीस वर्षांच्या राजकीय वाटचालीत पाचव्यांदा पक्षांतर केले आहे. भाजपाला सोडचिठ्ठी देत आजच त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार […]

परतीच्या पावसात देवगडात भातशेती झाली जमीनदोस्त

देवगड – मागील काही दिवसांपासून देवगड परिसरात अधूनमधून परतीचा पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे शेतातील उभे भाताचे पीक जमीनदोस्त होत आहे. त्यातच रानडुकरे आणि गवा रेड्यांचा उपद्रव वाढत चालला आहे.त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. सध्या भातपीक कापणीला आले आहे. मात्र सतत पडणार्‍या परतीच्या पावसामुळे या कापणीला विलंब होत आहे. इतकेच नाही तर काही ठिकाणी जोरदार […]

महाराष्ट्र दिल्लीपुढेच झुकत चालला मविआ-युतीची दिल्लीला धावाधाव

मुंबई – महाराष्ट्राच्या उमेदवारांची यादी दिल्लीत अंतिम होते हेच चित्र गेल्या दोन दिवसात स्पष्ट झाले आहे. मविआ आणि महायुतीच्या नेत्यांनी इथे कितीही बैठका घेतल्या तरी दिल्लीतून अंतिम मंजुरी घ्यावी लागते. महायुतीची यादी अंतिम करावी यासाठी ऐन निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री आणि दोघे उपमुख्यमंत्री आज दिल्लीला रवाना झाले. इकडे मविआचीही अंतिम यादी आलेली नसून काँग्रेसची दिल्लीत बैठक […]