नाशिकमध्ये पारा घसरला मोसमातील तापमानाची नोंद

नाशिक – नाशिक शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. काल १४ अंशापर्यंत खाली आलेले किमान तापमान आज १३.७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. किमान तापमानाचा पारा आता वेगाने घसरण्यास सुरुवात झाल्याने कडाक्याची थंडी पडली आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यात किमान तापमान तर थेट १२ अंशापर्यंत खाली घसरल्याची नोंद करण्यात आली.मागील तीन दिवसांपासून शहराच्या किमान तापमानाचा पारा घसरत […]

शेअर बाजारात मोठी घसरण सेन्सेक्स-निफ्टी कोसळले

मुंबई – शेअर बाजाराच्या सुरुवात आज तेजीसह झाली होती. मात्र त्यानंतर घसरण सुरू झाली ती बाजार बंद होईपर्यंत सुरूच राहिली. त्यामुळे दोन्ही प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ८२० अंकांनी घसरून ७८,६७५ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २५७ अंकांच्या घसरणीसह २३, ८८३ अंकांवर बंद झाला. तर बँक निफ्टी […]

राजस्थानात रेशन कार्डावर ४५० रुपयांत गॅस सिलिंडर

जयपूर- राजस्थानमध्ये आता रेशन कार्डवर नागरिकांना फक्त ४५० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर मिळणार आहे. राजस्थान सरकारने हा निर्णय घेतला आहे. रेशन कार्डधारकांना नॅशनल फूड सिक्युरिटी अ‍ॅक्ट म्हणजे एनएफएसएअंतर्गत कमीत कमी किमतीत गॅस सिलिंडर दिला जात होता. मात्र, उर्वरित आता रेशन कार्डधारकांनाही फक्त ४५० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजस्थान सरकारने रेशन कार्डच्या नियमांमध्ये […]

गोव्याच्या सत्तरीत आढळले दुर्मिळ ‘मलबार’ फुलपाखरू

पणजी- उत्तर गोवा जिल्ह्यातील सत्तरी तालुक्यातील अडवईच्या जंगलात ‘मलबार ट्री निम्स’ हे फुलपाखरू सापडले आहे.गोवा सरकारने या दुर्मिळ फुलपाखराला ‘राज्य फुलपाखरू’ म्हणून घोषित केले आहे. गोव्यातील काही विशिष्ट ठिकाणीच या दुर्मिळ फुलपाखरांचे अस्तित्व आहे.मात्र हे फुलपाखरू मूळ पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ठ (इंडेमिक) फुलपाखरू असून ते साधारणपणे एक हजार फुटाच्यावर डोंगर रांगांमध्ये दिसते.पांढऱ्या पंखांवर काळे ठिपके आणि […]

हेमंत सोरेन पाठोपाठ कल्पना सोरेन यांचेही हेलिकॉप्टर रोखून धरले

रांची – झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेत्यांना प्रचार करण्यापासून रोखण्याची रणनिती भाजपाने आखल्याचा आरोप होत आहे. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रोखल्यानंतर काल त्यांची पत्नी कल्पना सोरेन यांच्याही हेलिकॉप्टरच्या उड्डाणाला परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांना जवळपास एक तास हेलीपॅडवरच खोळंबून राहावे लागले.झारखंडमध्ये गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे हेलिकॉप्टर दोन […]

दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारली! व्हिडीओ व्हायरल, विरोधकांचे टीकास्त्र

जालना – माजी केंद्रीय मंत्री व भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी सामान्य कार्यकर्त्याला लाथ मारल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या घटनेवर विरोधकांनी दानवे यांच्यावर टीका केली आहे.काल शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी भाजपा नेते रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. कट्टर विरोधकांची दिलजमाई होण्याचा हा प्रसंग होता. या […]

बडोद्याच्या तेल शुद्धीकरण केंद्रात आग! दोघांचा मृत्यू

बडोदा- बडोदा येथील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या तेल शुद्धीकरण केंद्राच्या तेल साठवणूक टाक्यांमध्ये झालेल्या स्फोटानंतर भीषण आग लागली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. काल दुपारी तीन साडेतीन वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीवर आज सकाळी नियंत्रण मिळवण्यात यश आले.आयओसीएलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या केंद्रात साठवून ठेवण्यात आलेल्या बेंझिनच्या टाकीत स्फोट झाला. ही आग शेजारच्या इतर […]

विरोधकांना त्रास देणे सत्ताधाऱ्यांचा दृष्टीकोन ! शरद पवारांची टीका

नाशिक- विरोधकांना त्रास देणे हा सत्ताधाऱ्यांचा दृष्टीकोन आहे अशी टीका शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. आज शरद पवार नाशिक दौऱ्यावर होते. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती. यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, सत्ता त्यांच्या हातात आहे, सत्तेचा कसा उपयोग करायचा हे त्यांनी ठरवलेले […]

राज्यातील आठ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

मुंबई- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव या आठ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर थंडीची चाहूल लागलेली असताना अचानक पुन्हा […]

नवनियुक्त परिचारिकांना ४ महिन्यांपासून वेतन नाही

मुंबई – मुंबई महापालिका प्रशासनाने पालिकेच्या विविध रुग्णालयात नियुक्त केलेल्या ६०० परिचारिकांना अद्याप पगारच मिळालेला नाही.या परिचारिका गेले चार महिने वेतनाशिवाय काम करत आहेत. त्यांना तत्काळ त्यांचे थकित वेतन देण्यात यावे,अशी मागणी महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश देवदास यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.प्रकाश देवदास यांनी पालिका आयुक्त भूषण […]

सावंतवाडीत १५ नोव्हेंबरला प्रत्येक मंदिरांमध्ये दीपोत्सव

सावंतवाडी – यंदा शुक्रवार १५ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा आहे. या त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने शहरातील प्रत्येक मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील महिला भगिनींनी पाच तरी पणत्या आपल्या जवळच्या मंदिरामध्ये लावून दीपोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे.गेल्यावर्षी या उपक्रमात मोठ्या संख्येने शहरातील महिलांनी सहभाग घेतला होता.तसेच […]

नोकर भरतीतील उमेदवाराचे गुण माहिती अधिकार कक्षेत

मुंबई- सरकारी पदाच्या नोकर भरतीत सहभागी झालेल्या उमेदवाराला मिळालेले गुण हे माहिती अधिकाराच्या कक्षेत येतात. ही वैयक्तिक माहिती नसून ती प्रदर्शित केल्याने कोणत्याही प्रकारच्या गोपनीयतेचा भंग होत नाही,असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित यंत्रणेने याचिकाकर्त्यांला माहिती देण्याचे निर्देश दिले.२०१८ मध्ये ओंकार कळमणकर यांनी पुणे जिल्हा न्यायालयात कनिष्ठ लिपिक पदासाठी परीक्षा दिली होती.त्यावेळी लेखी आणि […]

कर्नाटकच्या कारवारमध्ये गिधाड आढळल्याने खळबळ

कारवार – कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार शहरात अत्याधुनिक ट्रॅकिंग उपकरण बसवलेले एक गिधाड आढळून आल्याने खळबळ उडाली.या गिधाडामुळे सर्वत्र भीतीचे व कुतूहलाचे वातावरण होते. मात्र,या गिधाडाला अभ्यासासाठी जीपीएस उपकरण बसवण्यात आल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले आहे.या गिधाडाच्या गळ्यात छोटे चौकोनी यंत्र, पाठीवर यंत्र आणि दोन्ही पायांना रिंगसारखे जीपीएस यंत्र बसवले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव […]

कार्तिकीनिमित्त आकर्षक सजावट! सगर दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी

पंढरपूर – कार्तिकी एकादशी निमित्त आज पंढरपूर विठ्ठल मंदिराची आकर्षक फुलांनी सजावट केली. तर यंदा मानाचे वारकरी म्हणून सगर दाम्पत्याला मान मिळाला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिक एकादशीनिमित्त आज शासकीय महापूजा पार पडली. यानिमित्त विठ्ठल – रुक्मिणीच्या गर्भगृहात झेंडू , शेवंती, कार्नेशियन, गुलाब अशा विविध पंधरा प्रकारच्या पाना फुलांची आकर्षक सजावट केली होती. या […]

हेलिपॅडवर उतरताच गहजब! उद्धव ठाकरेंच्या बॅगेची तपासणी – मोदी-शहांची बॅग तपासता का? ठाकरेंचा सवाल

यवतमाळ – आज उबाठा नेते उध्दव ठाकरे हे प्रचार सभेसाठी वणी येथे हेलिकॉप्टरने येताच त्यांच्या हेलिकॉप्टरची आणि छोट्या बॅगेची तपासणी आयोगाच्या अधिकार्‍यांनी केली. यामुळे खळबळ माजली. सत्ताधार्‍यांनी ही तपासणी योग्य ठरवली तर विरोधकांनी यावर जबरदस्त टीका केली.उद्धव ठाकरे आज उबाठाचे वणी मतदारसंघाचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारासाठी यवतमाळ जिल्ह्यात आले होते. त्यांची वणी येथे जाहीर […]