प्रत्येक बुथ म्हणजे एकेक चौकी मोदींचा भाजपा बुथप्रमुखांशी संवाद

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील विधानसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदारांना आपल्या सोबत जोडून घेण्यासाठी ‘मेरा बुथ, सबसे मजबूत’ या अभियानाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपाच्या १ लाख बुथप्रमुखांशी संवाद साधला. या संवादात त्यांनी बुथ प्रमुखांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी काय केले पाहिजे, हे सांगत बुथ पातळीवर पक्षाची पकड अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक दिशा-निर्देश दिले. प्रत्येक बुथ म्हणजे युद्धातील […]

दिल्लीला प्रदूषणाचा मोठा विळखा सरकारी कार्यालयाच्या वेळेत बदल

नवी दिल्ली- देशाची राजधानी दिल्लीला प्रदुषणाचा विळखा पडला असून तो अधिकच आवळत चालला आहे. दिल्ली सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्याचा हवे तेवढा परिणाम होताना दिसत नाही. त्यामुळे आता सरकारने राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री आतिशी यांनी ही घोषणा केली.सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलल्यामुळे रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी कमी […]

पंजाब धुक्यात गुरफटले विमाने रद्द ! रेल्वेला विलंब

चंदीगढ – हवामानातील बदलामुळे कालपासून संपूर्ण पंजाब राज्यच धुक्यात गुरफटले असून त्याचा परिणाम विमान व रेल्वे वाहतूकीवर पडला आहे. पंजाबच्या विविध शहरात जाणारी विमाने रद्द करण्यात आली आहेत. रेल्वेचा वेगही मंदावल्यामुळे त्यांनाही विलंब होत आहे.रेल्वे गाड्या केवळ ५० किलोमीटर प्रतितास तर मालगाड्या ३० किलोमीटर प्रतितास वेगाने चालवण्याच्या सूचना रेल्वेने दिल्या. अनेक रेल्वे गाड्या या फॉग […]

अभिनेता गोविंदाची तब्येत बिघडली

जळगाव- शिंदे गटाचे नेते आणि अभिनेता गोविंदा आज महायुतीच्या प्रचारासाठी जळगाव जिल्ह्यात आले होते. यावेळी पाचोऱ्यामध्ये रोड शो सुरू असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले, त्यांच्या छातीमध्ये दुखू लागले तसेच गोविंदा यांच्या ज्या पायाला गोळी लागली होती, तो पाय देखील दुखत असल्याने त्यांनी आपला दौरा अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते तातडीने मुंबईकडे रवाना झाले.यावेळी ते […]

देशात महागाईचा दहशतवाद प्रियांका गाधींचा हल्लाबोल

शिर्डी – पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात आता देशात दहशतवाद नाही. पण सध्या देशात महागाईचा दहशतवाद मोठा आहे. सर्वसामान्यांचे व घर चालवणाऱ्या महिलांचा जीव या दहशतवादाचा सामना करताना मेटाकुटीला येतो असा जोरदार हल्लाबोल काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आज शिर्डी येथील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारसभेत केला.त्या म्हणाल्या की, एका बाजूला सरकार महागाई वाढवून तुम्हाला […]

गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के लोकांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदाबाद- गुजरात राज्यातील मेहसाणा जिल्ह्यात काल बुधवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले.या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.२ इतकी मोजण्यात आली आहे.सुदैवाने या भुकंपामुळे कोणतीही वित्त अथवा जिवितहानी झाली नाही. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्यावतीने सांगण्यात आले की,काल शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.रात्री अचानक जमीन हादरल्यामुळे लोक भयभीत झाले.अनेकजण घराबाहेर पळाले.भूकंपाचा केंद्रबिंदू गुजरातमधील मेहसाणा येथे […]

मायावतींची आज पुण्यात सभा

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती या उद्या रविवारी बसपा उमेदवारांच्या प्रचारार्थ पुण्यात जाहीर सभेला संबोधित करतील. येरवडा परिसरात प्रादेशिक मनोरुग्णालय मैदान, ई कॉमर झोन येथे दुपारी १२ वाजता त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेत मायावती यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय आकाश आनंद, राज्यसभा खासदार आणि केंद्रीय समन्वयक गौतम, केंद्रीय समन्वयक, महाराष्ट्र प्रभारी नर्मदाप्रसाद अहिरवार, महाराष्ट्र […]

खाद्यतेलाच्या किमती आठ टक्क्यांनी वाढल्या

मुंबई-देशातील महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.कांदा,टोमॅटो, लसूणपाठोपाठ आता खाद्यतेलांच्या किमतीने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट बिघडवले आहे.एका महिन्यात खाद्यतेलाच्या किमती आठ टक्क्यांनी वाढल्या आहेत.त्यामुळे लोकांना महिन्याच्या रेशनसाठी खिशाला कात्री लावावी लागणार आहे. अन्नधान्याच्या चलनवाढीमुळे ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाईने १४ महिन्यांचा उच्चांक गाठला आहे.ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १४ ऑक्टोबर रोजी शेंगदाणा तेलाची किंमत १९३.५८ रुपये प्रति लिटर होती.ती गु […]

शिरूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडा ठार

पुणे पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील टेंभेकर वस्ती येथे काल रात्री ७ वाजताच्या सुमारास घराच्या अंगणात खेळत असलेल्या एका मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. शिवतेज समाधान टेंभेकर (वय ४) असे मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवतेज घरासमोरील अंगणात खेळत होता. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला करत त्याला शेजारच्या शेतात उचलून नेले. त्याच्या […]

१८, १९ नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी नाही

पुणे – विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी १७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असल्याने १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी असेल असे सांगितले जात होते. मात्र ते वृत्त चुकीचे असून राज्य सरकारने सार्वत्रिक सुट्टी जाहीर केलेली नाही. केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाली असेल त्या शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय मुख्याध्यपकांनी आपल्या अधिकारात घ्यावा. १८ […]

गोवा सरकारी कार्यालयात एलईडी बल्ब बंधनकारक

पणजी – गोवा राज्यात सरकारच्या उर्जा संवर्धन कायदा २००१ अंतर्गत विजेची बचत मोहीम सुरू आहे.या मोहिमेअंतर्गत राज्यातील सरकारी कार्यालये तसेच केंद्र सरकारच्या कार्यालयांना यापुढे एलईडी बल्ब बसविणे बंधनकारक असेल. याविषयीचा आदेश मुख्य वीज अभियंत्यांनी जारी केला आहे. आदेशाचे पालन न झाल्यास संबंधित कार्यालयाच्या विजेची जोडणी तोडण्याचे अधिकार वीजखात्याला असतील, असे आदेशात नमूद केले आहे. एलईडी […]

मुरुडच्या समुद्र किनाऱ्यांवर परदेशी ‘सीगल’ पक्ष्यांचे थवे

मुरुड -दिवाळी संपल्यापासून मुरुडमध्ये गुलाबी थंडी जाणवत आहे. त्यामुळे या थंडीचा आनंद घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे परदेशी पाहुणे म्हणजे सीगल पक्षी अर्थात समुद्रपक्षी मोठ्या प्रमाणात मुरुडमध्ये दाखल झाले आहेत.या पक्ष्यांना पाहण्यासाठी मुरुडमध्ये पर्यटकांचीही गर्दी होत आहे.ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत या सीगल पक्ष्यांचा मुरुडच्या किनार्‍यावर मुक्काम असतो. थंडीच्या काळात लडाखमध्ये बर्फवृष्टी झाली की हे पक्षी पुरेसे खाद्य आणि वास्तव्य […]

बिजनौरमध्ये अपघात नवदांपत्यांसह ७ ठार

बिजनौर – उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे आज सकाळी घडलेल्या अपघातात नवरा नवरीसह वऱ्हाडांमधील एकूण ७ जणांचा मृत्यू झाला. धुक्यामुळे समोरील वाहन न दिसल्याने हा अपघात झाल्याचे म्हटले जात असून मृतांमधील सहा जण एकाच कुटुंबातील आहेत. भरधाव जाणाऱ्या क्रेटा कारने टेम्पोला धडक दिल्याने हा अपघात झाला. मृतांमधील सर्वजण टेम्पोमधील आहेत.उत्तर प्रदेशातील कुटुंब झारखंडमध्ये लग्न आटोपून मुरादाबाद […]

आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राला तडे

वॉशिंग्टन – अंतराळातील आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला तडे गेल्याचे समोर आले असून अनेक ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे अंतराळात असलेल्या सुनिता विल्यम्स सह इतरांविषयीही चिंता वाढली आहे. या अंतराळ स्थानकाला गेल्या काही वर्षांपासून तडे जात असून त्यात आता वाढ झाल्याने नासाही चिंतेत आहे.या संदर्भात उघड झालेल्या नासाच्या एका अहवालामुळे सर्व अंतराळवीरही धोकादायक स्थितीत असल्याचे म्हटले जात […]

भिवंडीतील मतदान केंद्रांवर आता सीसीटीव्हींची नजर !

भिवंडी – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भिवंडी पश्चिममधील प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.लोकसभेच्या निवडणुकीत भिवंडीतील काही मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता . त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.त्याचे लाइव्ह वेब कास्टिंग होणार असल्याची माहिती भिवंडी पश्चिमचे निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे यांनी दिली. निर्णय अधिकारी उदय किसवे यांनी सांगितले की, भिवंडी पश्चिममध्ये […]

राज्यात १८ नोव्हेंबरपासून थंडीची लाट !

परभणी- राज्यात सोमवार १८ नोव्हेंबरपासून थंडीची लाट येणार आहे. तापमानात मोठी घट होऊन १२-१३ अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी थंडीमुळे आपल्या पिकांवर होणाऱ्या परिणामांपासून संरक्षण करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी,असे आवाहन प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एका व्हिडिओद्वारे केले आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या ताज्या हवामान अंदाजानुसार सांगली,सातारा,कोल्हापूर,सोलापूर जिल्ह्यातील जत […]

गुजरातच्या पोरबंदर समुद्रात ७००किलो अंमली पदार्थ जप्त

नवी दिल्ली- भारतीय नौदल,एनसीबी अर्थात अंमली पदार्थ नियंत्रण विभाग आणि गुजरात पोलिसांनी एका संयुक्त कारवाईत गुजरातच्या पोरबंदर समुद्रात ७०० किलोग्रॅम ‘मेथाम्फेटामाइन ‘ हे कृत्रिम अंमली पदार्थ जप्त केले.यंदाच्या वर्षांत नौदलाने पकडलेला हा दुसरा मोठा अंमली पदार्थाचा साठा आहे. गुरुवारी रात्री उशिरा सुरू झालेल्या या कारवाईमध्ये अंमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचे जाळे उद्ध्वस्त केले आहे.अंमली पदार्थाचा साठा […]

एकजुटीने राहा! पाकिस्तानवर तिरंगा फडकवू! बटेंगे तो कटेंगे! फडणवीसांचे पूर्ण समर्थन

मुंबई- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वादंग उठला आहे. भाजपाचेच ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि पंकजा मुंडे यांनी या घोषणेपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी तर सुरुवातीपासून या घोषणेला उघड विरोध केला आहे. मात्र […]