Home / arthmitra / Post Office Scheme: गुंतवणुकीवर सरकारी गॅरंटी! निवृत्तीनंतर पैशांची चिंता विसरा, पोस्टाच्या ‘या’ योजनेत दरमहा मिळतील 20,500 रुपये

Post Office Scheme: गुंतवणुकीवर सरकारी गॅरंटी! निवृत्तीनंतर पैशांची चिंता विसरा, पोस्टाच्या ‘या’ योजनेत दरमहा मिळतील 20,500 रुपये

Post Office Scheme: प्रत्येक व्यक्ती आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा भविष्यासाठी राखून ठेवते, जेणेकरून निवृत्तीनंतर कोणापुढे हात पसरण्याची वेळ येऊ नये....

By: Team Navakal
Post Office Scheme: गुंतवणुकीवर सरकारी गॅरंटी! निवृत्तीनंतर पैशांची चिंता विसरा, पोस्टाच्या 'या' योजनेत दरमहा मिळतील 20,500 रुपये
Social + WhatsApp CTA

Post Office Scheme: प्रत्येक व्यक्ती आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा भविष्यासाठी राखून ठेवते, जेणेकरून निवृत्तीनंतर कोणापुढे हात पसरण्याची वेळ येऊ नये. जर तुम्हालाही म्हातारपणी पैशांची चणचण भासू नये असे वाटत असेल, तर पोस्ट ऑफिसची ‘सीनियर सिटिजन सेविंग्स स्कीम’ (SCSS) तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. या योजनेत एकदाच गुंतवणूक करून तुम्ही दरमहा 20,500 रुपये घरबसल्या कमवू शकता.

Post Office Scheme: ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात सुरक्षित पर्याय

पोस्ट ऑफिसची ही योजना खास ज्येष्ठांसाठी तयार करण्यात आली आहे. यामध्ये सरकार स्वतः गॅरंटी देते, त्यामुळे पैसे बुडण्याची कोणतीही भीती नसते. महत्त्वाचे म्हणजे, इतर बचत योजनांच्या तुलनेत यामध्ये व्याजाचा दर अधिक आहे. सध्या या योजनेवर 8.2 टक्के दराने व्याज मिळत आहे, जे अनेक बँकांच्या मुदत ठेव दरापेक्षा जास्त आहे.

Post Office Scheme: दरमहा 20,500 रुपयांची कमाई कशी होईल?

या योजनेत तुम्ही किमान 1,000 रुपये आणि जास्तीत जास्त 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. यातील व्याजाचे पैसे दर तीन महिन्यांनी तुमच्या खात्यात जमा केले जातात.

  • गुंतवणूक रक्कम: 30 लाख रुपये.
  • वार्षिक व्याज (8.2%): 2,46,000 रुपये.
  • त्रैमासिक व्याज: 61,500 रुपये.
  • मासिक सरासरी उत्पन्न: 20,500 रुपये. अशा प्रकारे, या व्याजातून तुम्ही तुमच्या औषधांचा खर्च किंवा दैनंदिन गरजा सहज पूर्ण करू शकता.

Post Office Scheme: कर सवलतीचा फायदा

या योजनेत गुंतवणूक केल्यास जुन्या कर रचनेनुसार कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक कर सवलतीचा लाभ घेता येतो. जर एका वर्षात व्याजाची रक्कम 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्यावर टीडीएस कपात केली जाते. मात्र, फॉर्म 15H जमा करून तुम्ही ही कपात टाळू शकता.

Post Office Scheme: कोण अर्ज करू शकतो?

  1. 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे नागरिक.
  2. 55-59 वर्षे वयोगटातील व्यक्ती ज्यांनी स्वेच्छानिवृत्ती (VRS) घेतली आहे.
  3. संरक्षण दलातील सेवानिवृत्त व्यक्ती वयाची 50 वर्षे पूर्ण झाल्यानंतर काही अटींसह खाते उघडू शकतात.
  4. हे खाते वैयक्तिक किंवा जोडीदारासोबत संयुक्तपणे उघडता येते.

मुदत आणि नियम

या योजनेचा लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा आहे, जो निवृत्तीनंतर आणखी 3 वर्षांसाठी वाढवता येतो. जर तुम्हाला 5 वर्षांपूर्वी पैसे काढायचे असतील, तर तुम्ही ते काढू शकता, परंतु त्यावर 1 ते 1.5 टक्के दराने दंड आकारला जातो. कोणत्याही बँकेत किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही हे खाते सहज सुरू करू शकता.

हे देखील वाचा – 

Sai Sudharsan Record: साई सुदर्शनने रचला इतिहास! ख्रिस गेलचा ‘तो’ मोठा विक्रम मोडला

Paytm Payments Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना RBI कडून रद्द; तात्काळ प्रभावाने सर्व सेवा बंद; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

 AAP Rajya Sabha MPs Resign : ‘आप’ सोडली तरी खासदारकी का जाणार नाही? जाणून घ्या राघव चड्ढा आणि 6 खासदारांच्या ‘सेफ गेम’मागचे गणित

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या