Petrol Diesel Price Hike 2026 : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली प्रतीक्षा अखेर संपली असून केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ केली आहे. शुक्रवार १५ मे पासून हे नवे दर लागू झाले असून किरकोळ ग्राहकांसाठी तब्बल ४ वर्षांनंतर ही दरवाढ करण्यात आली आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. इंधनासोबतच सीएनजीच्या दरातही २ रुपयांची वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे.
Petrol Diesel Price Hike 2026 : चार प्रमुख महानगरांतील नवे दर (प्रति लिटर)
| शहर | पेट्रोलचा नवा दर | वाढ | डिझेलचा नवा दर | वाढ |
|---|---|---|---|---|
| दिल्ली | 97.77 रुपये | +3.00 | 90.67 रुपये | +3.00 |
| कोलकाता | 108.74 रुपये | +3.29 | 95.13 रुपये | +3.11 |
| मुंबई | 106.68 रुपये | +3.14 | 93.14 रुपये | +3.11 |
| चेन्नई | 103.67 रुपये | +2.83 | 95.25 रुपये | +2.86 |
Petrol Diesel Price Hike 2026 : सीएनजीच्या किमतीतही भडका
दिल्लीत सीएनजीचे दर २ रुपयांनी वाढून 79.09 रुपये प्रति किलो झाले आहेत. मुंबईतही सीएनजी २ रुपयांनी महागला असून आता मुंबई महानगर क्षेत्रात १ किलो सीएनजीसाठी ८४ रुपये मोजावे लागणार आहेत.
Petrol Diesel Price Hike 2026 : दरवाढीचे मुख्य कारण काय?
इराण युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी भारताला ६९ डॉलर प्रति बॅरलने मिळणारे कच्चे तेल आता ११३ ते ११४ डॉलरवर पोहोचले आहे. यामुळे इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांना दररोज सुमारे १६०० कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत होते. अखेर हे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने दरवाढीचा निर्णय घेतला आहे.
Petrol Diesel Price Hike 2026 : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पेट्रोल-डिझेलचे दर
- मुंबई: पेट्रोल 106.58 | डिझेल 93.08
- पुणे: पेट्रोल 106.82 | डिझेल 93.46
- ठाणे: पेट्रोल 106.84 | डिझेल 93.44
- नाशिक: पेट्रोल 107.93 | डिझेल 94.41
- नागपूर: पेट्रोल 107.13 | डिझेल 93.67
- छत्रपती संभाजीनगर: पेट्रोल 106.34 | डिझेल 95.64
- कोल्हापूर: पेट्रोल 107.49 | डिझेल 94.15
- रत्नागिरी: पेट्रोल 108.35 | डिझेल 94.92
- परभणी: पेट्रोल 108.63 | डिझेल 95.13
इंधन बचतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शक्य असल्यास घरून काम (वर्क फ्रॉम होम) करण्याचे आवाहन केले आहे. दिल्ली सरकारनेही इंधन वाचवण्यासाठी ९० दिवसांची विशेष मोहीम सुरू केली असून सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून दोन दिवस घरून काम करण्याची मुभा दिली आहे.











