Home / देश-विदेश / NEET 2026 : NEET विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार; नीट पुर्नपरीक्षेसाठी शुल्क आकारले जाणार नाही; शहर निवडण्याचा पर्याय सुद्धा असणार Available – धर्मेंद प्रधान

NEET 2026 : NEET विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार; नीट पुर्नपरीक्षेसाठी शुल्क आकारले जाणार नाही; शहर निवडण्याचा पर्याय सुद्धा असणार Available – धर्मेंद प्रधान

NEET 2026 : देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘नीट-युजी’ (NEET-UG) परीक्षा आता येत्या २१ जून २०२६ (रविवार) रोजी...

By: Team Navakal
NEET 2026 :
Social + WhatsApp CTA

NEET 2026 : देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘नीट-युजी’ (NEET-UG) परीक्षा आता येत्या २१ जून २०२६ (रविवार) रोजी घेतली जाणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) यासंदर्भात अधिकृत घोषणा केली असून, पेपरफुटीच्या गंभीर संशयामुळे १२ मे रोजी रद्द करण्यात आलेल्या परीक्षेचे नवीन वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. या निर्णयामुळे ३ मे रोजी परीक्षा दिलेल्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा पेच सुटण्यास मदत होणार आहे.

शिक्षणमंत्र्यांचे महत्त्वपूर्ण आश्वासन आणि सुधारणा
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत सरकारची भूमिका ‘शून्य सहनशीलता’ (Zero Tolerance) अशीच आहे. १२ मे रोजी पेपरफुटीचे संकेत मिळताच, कोणत्याही अपात्र उमेदवाराला संधी मिळू नये या उद्देशाने जबाबदारीने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुनर्परीक्षेसाठी खालील महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत:
परीक्षा शुल्क: या पुनर्परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. यापूर्वी भरलेले शुल्क पूर्णपणे परत केले जाणार असून, ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी ‘नि:शुल्क’ असेल.

वेळेत वाढ: विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी परीक्षेच्या वेळेत १५ मिनिटांची वाढ करण्यात आली आहे. आता ही परीक्षा दुपारी २:०० वाजता सुरू होऊन सायंकाळी ५:१५ वाजेपर्यंत चालेल.

शहर निवड: विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे परीक्षा शहर निवडण्याचा पर्याय पुन्हा उपलब्ध करून दिला जाणार आहे.

प्रवेशपत्र: परीक्षेसाठीची नवीन प्रवेशपत्रे १४ जूनपर्यंत अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

तपासाचा वेग: आतापर्यंत ७ आरोपींना बेड्या
नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) असून, त्यांनी या प्रकरणात आतापर्यंत ७ मुख्य आरोपींना अटक केली आहे. यामध्ये राजस्थानमधील मंगीलाल बिनवाल, दिनेश बिनवाल, विकास बिनवाल, हरियाणातील यश यादव आणि नाशिकचा शुभम खैरनार यांचा समावेश आहे. या पाचही आरोपींना दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू न्यायालयात हजर केले असता, त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या व्यतिरिक्त, पुण्यातील ब्युटिशियन मनीषा वाघमारे आणि नाशिकमधील धनंजय लोखंडे यांनाही सीबीआयने ताब्यात घेतले आहे.

पाच हजारांहून अधिक केंद्रांवर झाली होती परीक्षा
३ मे रोजी पार पडलेल्या मूळ परीक्षेसाठी भारतासह परदेशातील एकूण ५६५ शहरांमध्ये ५,४०० हून अधिक परीक्षा केंद्रे उभारण्यात आली होती. या परीक्षेला सुमारे २२.७९ लाख विद्यार्थी बसले होते.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या