Home / देश-विदेश / Naxal Free India: 3 पिढ्यांचा हिंसाचार संपला! भारत आता पूर्णपणे नक्षलमुक्त; अमित शाह यांची मोठी घोषणा

Naxal Free India: 3 पिढ्यांचा हिंसाचार संपला! भारत आता पूर्णपणे नक्षलमुक्त; अमित शाह यांची मोठी घोषणा

Naxal Free India: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक ऐतिहासिक घोषणा करताना, सुरक्षा दलांच्या अथांग त्यागामुळे भारताने नक्षलवादावर पूर्णपणे विजय...

By: Team Navakal
Naxal Free India: 3 पिढ्यांचा हिंसाचार संपला! भारत आता पूर्णपणे नक्षलमुक्त; अमित शाह यांची मोठी घोषणा
Social + WhatsApp CTA

Naxal Free India: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक ऐतिहासिक घोषणा करताना, सुरक्षा दलांच्या अथांग त्यागामुळे भारताने नक्षलवादावर पूर्णपणे विजय मिळवला असून देश आता नक्षलमुक्त झाला असल्याचे जाहीर केले आहे. छत्तीसगडमधील बस्तर प्रांताचा भाग असलेल्या आणि एकेकाळी नक्षलवादाचा मुख्य गड मानल्या गेलेल्या जगदलपूर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

“मी आज अगदी छाती ठोकून सांगू शकतो की, भारत आता नक्षलमुक्त झाला आहे,” अशा शब्दांत शाह यांनी देशाच्या या मोठ्या यशाचा गौरव केला. तीन दिवसांच्या छत्तीसगड दौऱ्यावर असलेल्या गृहमंत्र्यांनी केंद्र आणि राज्य सरकार बस्तरमध्ये कायमस्वरूपी शांतता आणि वेगाने विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच पुढील 5 वर्षांत हा आदिवासी पट्टा देशातील सर्वात विकसित आदिवासी भाग म्हणून समोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Naxal Free India: सुरक्षा दलांच्या बलिदानाचे फळ

‘बादल’ (बस्तर अकॅडमी ऑफ डान्स, आर्ट अँड लिटरेचर) कॅम्पसमध्ये नागरिकांना संबोधित करताना गृहमंत्री म्हणाले की, हा एक ऐतिहासिक दिवस आहे.

  • 1970 च्या दशकात सुरू झालेल्या डाव्या विचारसरणीच्या या उग्रवादाने (नक्षलवाद) देशातील तब्बल 3 पिढ्या हिंसाचारात होरपळून काढल्या. यामुळे हजारो लोक मूलभूत सुविधा आणि विकासापासून वंचित राहिले.
  • 2014 मध्ये जेव्हा मोदी सरकार सत्तेवर आले, तेव्हा देशासमोर प्रामुख्याने जम्मू-काश्मीर, ईशान्येकडील राज्ये आणि डाव्या विचारसरणीचा उग्रवाद ही 3 मोठी सुरक्षा आव्हाने होती. आज देशाने या तिन्ही आव्हानांवर मोठ्या प्रमाणावर मात केली आहे.

कार्यक्रमादरम्यान अमित शाह यांनी नक्षली हिंसाचारात बळी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांची आणि नक्षलविरोधी मोहिमेत शौर्य गाजवणाऱ्या सुरक्षा जवानांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. तसेच नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या 1,000 पेक्षा जास्त जवानांना त्यांनी ‘अमर वाटिका’ स्मारकावर जाऊन श्रद्धांजली वाहिली.

Naxal Free India: शरण आलेल्यांसाठी भव्य पुनर्वसन आराखडा

नक्षलवादाचा रस्ता सोडून मुख्य प्रवाहात येणाऱ्या तरुणांना पाठिंबा देण्याचे आवाहन अमित शाह यांनी समाजातील नेत्यांना केले.

छत्तीसगडमध्ये आतापर्यंत सुमारे 3,000 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. शरण आलेल्या या माजी बंडखोरांना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी सरकारने एक व्यापक पुनर्वसन आराखडा तयार केला आहे.

छत्तीसगडमधील केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) सुमारे 200 कॅम्प्सपैकी 70 कॅम्प्सचे रूपांतर आता थेट “जनकल्याण सेवा केंद्रांमध्ये” केले जाणार आहे. या केंद्रांच्या माध्यमातून दुर्गम भागात रस्ते, बँक शाखा, पोस्ट ऑफिस, एलपीजी गॅस, अन्नधान्य वितरण, पिण्याचे पाणी आणि वीज यांसारख्या पायाभूत सुविधांचा विस्तार केला जाईल.

हे देखील वाचा – Fuel Price Hike: सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका! 5 दिवसातच पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ

Web Title:
संबंधित बातम्या