Home / राजकीय / Raj Thackeray : अंधेरी ते वर्सोवा; पश्चिम मुंबईत राज ठाकरे यांचा दौरा

Raj Thackeray : अंधेरी ते वर्सोवा; पश्चिम मुंबईत राज ठाकरे यांचा दौरा

Raj Thackeray : – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS)अध्यक्ष Raj Thackeray उद्या (२५ मे) पश्चिम मुंबईच्या दौऱ्यावर असून, या दौऱ्याकडे मनसेच्या...

By: Team Navakal
Raj Thackeray
Social + WhatsApp CTA

Raj Thackeray : – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS)अध्यक्ष Raj Thackeray उद्या (२५ मे) पश्चिम मुंबईच्या दौऱ्यावर असून, या दौऱ्याकडे मनसेच्या आगामी संघटनात्मक रणनीतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण म्हणून पाहिले जात आहे. अंधेरी (Andheri), जोगेश्वरी, दिंडोशी (Dindoshi) आणि वर्सोवा (Versova)या पश्चिम उपनगरांमध्ये राज ठाकरे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून, कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्षबांधणीवर विशेष भर देणार आहेत.

मनसेकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दौऱ्यात राज ठाकरे कार्गो विमानतळ परिसरातील महाराष्ट्र नवनिर्माण हवाई कामगार सेनेच्या कार्यालयाला भेट देणार आहेत. विमानतळ परिसरातील कामगारांच्या समस्या, रोजगाराशी संबंधित प्रश्न आणि संघटनात्मक मुद्द्यांवर ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. कामगार संघटनांमध्ये पक्षाची पकड अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

तसेच पश्चिम मुंबईतील काही नव्या मनसे शाखांचे उद्घाटनही राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पश्चिम उपनगरांमध्ये पक्षाचा विस्तार आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यावर मनसेने विशेष लक्ष केंद्रित केल्याचे बोलले जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून मनसेकडून मुंबईतील विविध भागांमध्ये शाखाविस्तार, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून राज ठाकरे यांचा हा दौरा आयोजित करण्यात आल्याचे पक्षातील सूत्राची माहिती आहे.

राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी अंधेरी, जोगेश्वरी, दिंडोशी आणि वर्सोवा परिसरात मनसे कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी स्वागत फलक, बॅनर्स, भगवे झेंडे आणि पक्षाचे चिन्ह लावण्यात आले असून, परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘शिवतीर्थ’वर आदित्य ठाकरे

Aditya And Amit Thackeray
Aditya And Amit Thackeray

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते Amit Thackeray यांचा आज वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त Aaditya Thackeray यांनी थेट ‘शिवतीर्थ’वर जाऊन अमित ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या उपस्थितीत अमित ठाकरे यांनी केक कापला. मुंबई महानगरपालिका निवडणुकांनंतर या दोन युवा नेत्यांची झालेली ही पहिलीच भेट असल्याने राजकीय वर्तुळात तिची चर्चा रंगली आहे.

या वेळी शिवतीर्थ परिसरात मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे वाढदिवस सोहळ्यात इंग्रजी गाण्यांऐवजी मराठी गाण्यांद्वारे शुभेच्छा देण्यात आल्या. मराठी अस्मितेचा संदेश देण्याचा प्रयत्न मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून आणलेल्या खास केकने सर्वांचे लक्ष वेधले. देशभरात चर्चेत असलेल्या ‘NEET’ पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केकवर ‘नीट हटवा, देश वाचवा’ असा संदेश लिहिण्यात आला होता. त्यामुळे वाढदिवसाचा कार्यक्रम केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित न राहता शैक्षणिक आणि राजकीय मुद्द्यांवरही भाष्य करणारा ठरला.


हे देखील वाचा –

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही तर कॉकरोच पार्टी रस्त्यावर आंदोलन करणार! दीपकेचा इशारा

देवस्थान इनाम कायदा मंदिरांच्या अस्तित्वावर घाला घालणारा आहे ! मंदिर महासंघाच्या सुनील घनवटांचा आरोप

मध्यप्रदेशात नूरजहा आंब्याला व्हीव्हीआयपी सुरक्षा! ५ किलो वजनाच्या एका आंब्याची किंमत आहे तरी किती ?

Web Title:
संबंधित बातम्या