Abhijit Dipke VS Kiren Rijiju : ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) आणि तिचे संस्थापक अभिजित दिपके (Abhijit Dipke) पुन्हा एकदा सोशल मीडियावरील वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. पक्षाच्या सोशल मीडिया फॉलोअर्सचा उगम नेमका कुठला, यावरून आता केंद्रीय मंत्र्यांपासून (Union Minister Kiren Rijiju)ते सोशल मीडिया वापरकर्त्यांपर्यंत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
शनिवारी अभिजित दिपके यांनी एक स्क्रीन रेकॉर्डिंग (Screen Recording) शेअर करत पक्षाच्या इन्स्टाग्राम खात्यावरील ९४ टक्क्यांहून अधिक प्रेक्षक आणि फॉलोअर्स भारतीय असल्याचा दावा केला. केंद्रीय मंत्री Kiren Rijiju यांनी पाकिस्तानमधून फॉलोअर्स मिळविणाऱ्यांवर टीका करणारे वक्तव्य केल्यानंतर दिपके यांनी ही आकडेवारी सार्वजनिक केली.
‘CJP’कडे निर्देश करणारी टिप्पणी?
किरण रिजिजू यांनी आपल्या पोस्टमध्ये कोणत्याही व्यक्तीचे किंवा संघटनेचे नाव घेतले नव्हते. मात्र ‘कॉकरोच जनता पार्टी’ची सोशल मीडिया खाती विविध प्लॅटफॉर्मवर रोखण्यात आल्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांची टिप्पणी अप्रत्यक्षपणे CJPकडे निर्देश करणारी असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली.
रिजिजू यांनी पोस्टमध्ये म्हटले होते की, “पाकिस्तान आणि जॉर्ज सोरोस गटाकडून मान्यता किंवा फॉलोअर्स मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांबद्दल मला सहानुभूती वाटते.” त्यानंतरच्या दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी, “भारतात मोठी लोकसंख्या आणि ऊर्जावान तरुण आहेत. खरे आणि मौल्यवान फॉलोअर्स मिळवण्यासाठी पुरेसे लोक देशातच आहेत,” असेही नमूद केले.
मुख्य न्यायमूर्तींच्या वक्तव्यानंतर जन्मलेली ‘व्यंगात्मक चळवळ’
‘कॉकरोच जनता पार्टी’ची सुरुवात एका व्यंगात्मक (Satirical) सोशल मीडिया चळवळीमधून झाल्याचे सांगितले जाते. देशाचे मुख्य न्यायमूर्ती Surya Kant यांनी काही तरुणांचा उल्लेख “कॉकरोच” असा केल्याच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सोशल मीडियावर या नावाने मोहिम सुरू झाली.
सुरुवातीला विनोद म्हणून सुरू झालेल्या या मोहिमेला अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक तरुणांनी स्वतःला “कॉकरोच” म्हणून संबोधण्यास सुरुवात केली आणि काही दिवसांतच या चळवळीची लोकप्रियता वाढली. विशेषतः इन्स्टाग्रामवर CJPच्या फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढून काही काळासाठी ती भाजपच्या अधिकृत खात्यापेक्षाही जास्त झाल्याचा दावा करण्यात आला.
खाते हॅक झाले’, दिपके यांचा आरोप
अभिजित दिपके यांनी यापूर्वीच CJPचे X (पूर्वीचे ट्विटर) खाते भरतात रोखण्यात आल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर इन्स्टाग्राम खाते आणि वेबसाइटबाबतही त्यांनी अशाच प्रकारचे दावे केले होते.
शनिवारी X वर पोस्ट केलेल्या स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये त्यांनी इन्स्टाग्राम खात्याची आकडेवारी दाखवली. त्यानुसार २२ एप्रिल ते २१ मे या कालावधीत खात्याला तब्बल १.६ अब्ज (Billion) व्ह्यूज आणि १.२ कोटी नवे फॉलोअर्स मिळाले होते.
दिपके यांनी शेअर केलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामवरील प्रेक्षकांपैकी ९४.१ टक्के भारतातील , १ टक्का अमेरिकेतील, ०.७ टक्के ब्रिटनमधील, तर ०.६ टक्के कॅनडा आणि संयुक्त अरब अमिरातीतील होते.
“९४ टक्क्यांहून अधिक प्रेक्षक हिंदुस्थानातील असताना केंद्रीय मंत्री किरण रिजिजू हिंदुस्थानी तरुणांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?” असा सवाल दिपके यांनी उपस्थित केला. तसेच ही आकडेवारी इन्स्टाग्राम खाते कथितरीत्या ‘हॅक’ होण्यापूर्वीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
This is the screen recording of our audience demographic which we have shared with media before our account was hacked.
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) May 23, 2026
More than 94% of the audience is from India.
Why is a Union Minister @KirenRijiju labelling Indian youth as Pakistani? https://t.co/av0WnxIOui pic.twitter.com/W4YY1LL1IJ
‘४९ टक्के फॉलोअर्स पाकिस्तानमधील’ – सुकांत मजूमदार
दरम्यान, केंद्रीय मंत्री Sukanta Majumdar यांनीही CJPवर गंभीर आरोप केले. त्यांच्या दाव्यानुसार, “कॉकरोच जनता पार्टीच्या सोशल मीडिया फॉलोअर्सपैकी ४९ टक्के पाकिस्तानमधील आहेत, तर केवळ ९ टक्के हिंदुस्थानातील आहेत.”
मात्र दिपके यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीत याच्या नेमके उलट चित्र दिसत असल्याचा दावा समर्थकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर दोन्ही बाजूंनी आकडेवारी, स्क्रीनशॉट्स आणि विविध तांत्रिक दावे शेअर केले जात असून, हा वाद आणखी चिघळताना दिसत आहे.
सोशल मीडिया राजकारण पुन्हा चर्चेत
या संपूर्ण प्रकरणामुळे सोशल मीडिया फॉलोअर्सची खरी संख्या, बॉट्स (Bots), विदेशी फॉलोअर्स, अकाऊंट हॅकिंग आणि डिजिटल प्रचार यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. काही जण CJPला तरुणांच्या असंतोषाचे प्रतीक मानत आहेत, तर काहींच्या मते ही केवळ सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी उभी करण्यात आलेली मोहीम आहे.
हे देखील वाचा –
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही तर कॉकरोच पार्टी रस्त्यावर आंदोलन करणार! दीपकेचा इशारा
देवस्थान इनाम कायदा मंदिरांच्या अस्तित्वावर घाला घालणारा आहे ! मंदिर महासंघाच्या सुनील घनवटांचा आरोप
मध्यप्रदेशात नूरजहा आंब्याला व्हीव्हीआयपी सुरक्षा! ५ किलो वजनाच्या एका आंब्याची किंमत आहे तरी किती ?









