Home / महाराष्ट्र / HSRP Deadline: हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी आजच शेवटची संधी; उद्यापासून सुरू होणार पोलिसांची मोठी मोहीम

HSRP Deadline: हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी आजच शेवटची संधी; उद्यापासून सुरू होणार पोलिसांची मोठी मोहीम

HSRP Deadline: महाराष्ट्रातील तमाम वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बातमी समोर आली आहे. राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी...

By: Team Navakal
HSRP Deadline: हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी आजच शेवटची संधी; उद्यापासून सुरू होणार पोलिसांची मोठी मोहीम
Social + WhatsApp CTA

HSRP Deadline: महाराष्ट्रातील तमाम वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बातमी समोर आली आहे. राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व प्रकारच्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट म्हणजेच ‘HSRP’ बसवण्यासाठी आता केवळ आजचा एकच दिवस शिल्लक राहिला आहे.

शासनाने निश्चित केलेली 30 जून 2026 ही अंतिम डेडलाईन आज संपत असून, उद्या 1 जुलैपासून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कडक दंडात्मक कारवाईची मोहीम उघडली जाणार आहे.

परिवहन विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, मुदत संपताच पोलीस आणि आरटीओचे अधिकारी रस्त्यावर उतरून संयुक्तपणे तपासणी सुरू करणार आहेत. या मोहिमेत विना-एचएसआरपी वाहनांवर जागेवरच दंडात्मक कारवाई केली जाईल. याशिवाय, ज्या वाहनांवर ही नवीन नंबर प्लेट नसेल, अशा वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (RTO) अनेक महत्त्वाची कामेही प्रशासनाकडून पूर्णपणे थांबवली जाणार आहेत.

HSRP Deadline: आरटीओमधील ‘या’ महत्त्वाच्या कामांना बसणार ब्रेक

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट न बसवणाऱ्या वाहनधारकांना उद्यापासून आरटीओ कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही कोणतीही कामे करून घेता येणार नाहीत. खालील प्रमुख सेवांवर पूर्णपणे बंदी घातली जाईल:

  • वाहन हस्तांतरण (नाव बदलणे): जुन्या वाहनांची खरेदी-विक्री केल्यानंतर होणारे नाव बदलण्याचे काम रोखले जाईल.
  • कागदपत्रांमधील बदल: वाहनावरील बँकेचा कर्जबोजा चढवणे किंवा उतरवणे, पत्ता बदलणे या सेवा मिळणार नाहीत.
  • पुनर्नोंदणी आणि इतर कामे: वाहनाची नवीन नोंदणी (रि-रजिस्ट्रेशन), परवाना नूतनीकरण आणि गाडीमधील इतर अंतर्गत बदलांना मंजुरी दिली जाणार नाही.

तात्पुरता दिलासा: वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी केवळ वाहनाच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी सध्या ही अट लागू नसेल, हाच काय तो मोठा दिलासा आहे.

HSRP Deadline: अपॉइंटमेंट घेतलेल्यांना दिलासा; ‘या’ कंपन्यांकडे आहे काम

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या वाहनधारकांनी आज 30 जूनपर्यंत ही नंबर प्लेट बसवण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन फी भरून आपली अपॉइंटमेंट बुक केली आहे, अशा लोकांना उद्यापासून सुरू होणाऱ्या दंडात्मक कारवाईतून तात्पुरती सवलत देण्यात आली आहे. मात्र, ज्यांनी अद्याप नोंदणीची साधी प्रक्रियाही सुरू केलेली नाही, त्यांना मात्र थेट दंडाचा सामना करावा लागेल.

राज्यात या नंबर प्लेटचे वाटप आणि फिटिंगचे काम सुलभ व्हावे म्हणून संपूर्ण महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यासाठी शासनाने ‘रोझमेर्टा टेक्नॉलॉजीज’, ‘रिअल इंडस्ट्रीज’ आणि ‘एफटीए HSRP सोल्यूशन्स’ या तीन अधिकृत कंपन्यांची नियुक्ती केली आहे.

HSRP Deadline: शासनाने निश्चित केलेले अधिकृत दर

नंबर प्लेटच्या नावाखाली सर्वसामान्यांची आर्थिक लूट होऊ नये म्हणून सरकारने गाड्यांच्या प्रकारानुसार अधिकृत दर ठरवून दिले आहेत:

  • दुचाकी वाहने (बाईक/स्कूटर): 450 रुपये
  • तीनचाकी वाहने (रिक्षा): 500 रुपये
  • हलकी मोटार वाहने (कार): 745 रुपये
  • मध्यम व अवजड व्यावसायिक वाहने: 745 रुपये

केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मधील नियम 50 आणि मोटार वाहन अधिनियमातील कलम 177 अन्वये ही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. हे नियम केवळ सर्वसामान्यांनाच नव्हे, तर सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांच्या वाहनांनाही लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आरटीओचा मनस्ताप आणि मोठा दंड टाळण्यासाठी वाहनधारकांनी आजच ऑनलाईन नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे देखील वाचा – Maharashtra Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 30 जूनची डेडलाईन हुकली; आता ‘या’ तारखेपर्यंत होणार कर्जमाफी

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या