Home / arthmitra / Indian Rupee Fall: रुपयाची ऐतिहासिक घसरण होण्याचे कारण काय? तुमच्या खिशावर काय होणार परिणाम? वाचा

Indian Rupee Fall: रुपयाची ऐतिहासिक घसरण होण्याचे कारण काय? तुमच्या खिशावर काय होणार परिणाम? वाचा

Indian Rupee Fall: जागतिक बाजारपेठेतील वेगाने बदलणाऱ्या घडामोडींमुळे भारतीय रुपयाची घसरण थांबताना दिसत नाही आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया अबतपर्यंतच्या...

By: Team Navakal
Indian Rupee Fall: रुपयाची ऐतिहासिक घसरण होण्याचे कारण काय? तुमच्या खिशावर काय होणार परिणाम? वाचा
Social + WhatsApp CTA

Indian Rupee Fall: जागतिक बाजारपेठेतील वेगाने बदलणाऱ्या घडामोडींमुळे भारतीय रुपयाची घसरण थांबताना दिसत नाही आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया अबतपर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर म्हणजेच प्रति डॉलर 96 च्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. चलन घसरल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सर्वसामान्यांच्या बजेटवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रुपयाच्या या घसरणीची मुख्य कारणे आणि त्याचे परिणाम खालीलप्रमाणे आहेत:

Indian Rupee Fall: रुपया घसरण्याची 3 मुख्य कारणे

  1. कच्च्या तेलाच्या किमतीत भडका: इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 107 डॉलरच्या पार गेला आहे. भारत आपली 85 टक्क्यांहून अधिक तेलाची गरज आयातीद्वारे पूर्ण करतो. तेल महाग झाल्याने भारताला डॉलरमध्ये जास्त पैसे मोजावे लागत आहेत, ज्यामुळे रुपया कमजोर होत आहे.
  2. मजबूत झालेला अमेरिकन डॉलर: अमेरिकेतील मजबूत आर्थिक आकडेवारीमुळे अमेरिकन मध्यवर्ती बँक व्याजदरात मोठी कपात करण्याची शक्यता कमी झाली आहे. परिणामी, डॉलर इंडेक्स वधारून 99.05 वर पोहोचला आहे. जागतिक अनिश्चिततेच्या काळात सुरक्षित गुंतवणूक म्हणून जगभरातील गुंतवणूकदार डॉलरला पसंती देत आहेत.
  3. परदेशी गुंतवणूकदारांची माघार: जागतिक पातळीवरील अस्थिरतेमुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आपले पैसे काढून घेण्यास सुरुवात केली आहे. देशातून डॉलर बाहेर जात असल्यामुळे रुपयावरील दबाव सातत्याने वाढत आहे.

Indian Rupee Fall: सर्वसामान्यांवर आणि देशावर होणारे परिणाम

परदेशातील शिक्षण आणि प्रवास महागणार: जे विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जात आहेत किंवा जे नागरिक परदेश दौऱ्याचे नियोजन करत आहेत, त्यांचा खर्च वाढणार आहे. कारण आता पूर्वीच्या तुलनेत डॉलर खरेदी करण्यासाठी अधिक भारतीय रुपये मोजावे लागणार आहेत.

महागाईत होणार वाढ: रुपया कमजोर झाल्यामुळे परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तू महाग होतात. कच्च्या तेलाचे दर वाढल्याने देशात नुकतीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. इंधन महागल्याने वाहतूक खर्च वाढेल आणि पर्यायाने भाजीपाल्यापासून ते जीवनावश्यक वस्तूंपर्यंत सर्व काही महाग होऊ शकते.

इलेक्ट्रॉनिक्स आणि गाड्या महागणार: भारतात मोठ्या प्रमाणावर लागणारे मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे सुटे भाग आणि कच्चा माल परदेशातून येतो. डॉलर महागल्यामुळे कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढेल, ज्यामुळे ग्राहकांसाठी या वस्तू खरेदी करणे अधिक खर्चिक होईल.

हे देखील वाचा – PM Modi on Foreign Travel Tax: परदेश प्रवासावर नवीन कर लागणार? सोशल मीडियावरील ‘त्या’ चर्चेवर स्वतः पंतप्रधान मोदींनी दिले स्पष्टीकरण

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या