World Gold Reserve Ranking 2026 : सोनं हे केवळ दागिना नसून कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा मानलं जातं. सध्या जगात वाढती महागाई आणि युद्धाचं सावट असताना, जगातील बड्या देशांच्या मध्यवर्ती बँकांनी सोन्याचा साठा वाढवण्यावर भर दिला आहे. अशा परिस्थितीत जगातील सोन्याचा सर्वात मोठा खजाना नेमका कोणाकडे आहे आणि आपला भारत या शर्यतीत कुठे आहे, हे जाणून घेणं औत्सुक्याचं ठरेल.
World Gold Reserve Ranking 2026 : जगात कोणाचे वर्चस्व?
सोन्याच्या साठ्याचा विचार केला तर अमेरिका आजही जगात पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेकडे सुमारे 8,133 टन सोन्याचा साठा आहे. युरोपीय देशांमध्ये जर्मनी 3,350 टनांसह दुसऱ्या क्रमांकावर, इटली 2,452 टनांसह तिसऱ्या आणि फ्रान्स 2,437 टनांसह चौथ्या स्थानावर आहे.
World Gold Reserve Ranking 2026 : चीन आणि रशियाची मोठी झेप
रशिया जवळ 2,330 टन सोन्याचा साठा असून तो टॉप-5 मध्ये कायम आहे. दुसरीकडे चीनची गती सध्या सर्वात जास्त आहे. चीनकडे सध्या 2,313.5 टन सोनं असून, गेल्या 17 महिन्यांपासून चीन सातत्याने सोन्याची खरेदी करत आहे. हीच गती कायम राहिल्यास चीन लवकरच अव्वल ५ देशांमध्ये स्थान मिळवू शकतो.
World Gold Reserve Ranking 2026 : भारताची स्थिती काय?
एकेकाळी ‘सोन्याची चिमणी’ म्हणून ओळखला जाणारा भारत आता पुन्हा एकदा आपला सुवर्ण साठा मजबूत करत आहे. मार्च 2026 ला संपलेल्या सहामाहीत, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) लंडनहून 104.23 मेट्रिक टन सोनं मायदेशी हलवलं आहे. सध्या 2026 मध्ये आरबीआयकडे एकूण 880 टन सोनं उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, सरकारी साठ्याव्यतिरिक्त भारतातील सामान्य नागरिक हे सोन्याचे जगातील सर्वात मोठे ग्राहक आहेत.
शेजारील देशांची अवस्था
भारताच्या तुलनेत पाकिस्तान आणि बांगलादेश खूपच मागे आहेत. पाकिस्तानकडे केवळ 64.77 टन सोनं आहे, तर बांगलादेशचा साठा फक्त 14.28 टन इतका मर्यादित आहे. ही आकडेवारी त्या देशांची कमकुवत आर्थिक स्थिती दर्शवते.
सोनं खरेदीत ‘हा’ देश सर्वात पुढे
2026 मध्ये सोनं खरेदीच्या बाबतीत पोलंडने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये पोलंडने विक्रमी 20 टन सोन्याची खरेदी केली. याशिवाय उझबेकिस्तान आणि कझाकस्तान या देशांनीही गेल्या काही महिन्यांत प्रत्येकी 8 टन सोन्याची भर आपल्या साठ्यात घातली आहे.
थोडक्यात सांगायचं तर, सध्या जग पुन्हा एकदा सोन्याकडे वळताना दिसत आहे. येणाऱ्या काळात सोनं हे केवळ दागिना नसून आर्थिक सुरक्षेचं सर्वात मोठं शस्त्र ठरणार आहे.
हे देखील वाचा – Census 2027: देशात पहिल्यांदाच होणार ‘डिजिटल जनगणना’! मोबाईलवर विचारले जाणार हे 33 प्रश्न; पाहा तुमचे नाव आणि घर कसं नोंदवायचं?










