FASTag New Rules: फास्टॅग वापरणाऱ्या वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महामार्गावरून प्रवास करताना जर तुम्ही फास्टॅग कारच्या काचेवर कायमस्वरूपी न चिटकवता तो खिशात किंवा डॅशबोर्डवर ठेवत असाल, तर सावधान! भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) अशा वाहनधारकांना कडक इशारा दिला असून असे करणाऱ्यांना थेट ब्लॅकलिस्ट करण्याची ताकीद दिली आहे.
FASTag New Rules: NHAI ने का दिला इशारा?
NHAI ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करत या प्रकारावर चिंता व्यक्त केली आहे. अनेक लोक फास्टॅग कारच्या समोरच्या काचेवर कायमस्वरूपी चिटकवत नाहीत. त्याऐवजी, ते काचेवर एक पारदर्शक पाकीट लावतात आणि टोल प्लाजा जवळ आल्यावर त्यात फास्टॅग ठेवतात. प्रवास संपला की ते काढून पुन्हा खिशात ठेवले जाते.
एकाच फास्टॅगचा वापर दुसऱ्या गाडीसाठी केला जाऊ नये, यासाठी हा नियम करण्यात आला आहे. मात्र, लोक याचा गैरफायदा घेत असल्याचे समोर आले आहे.
For a smooth and hassle-free journey, ensure your FASTag is pasted on vehicle's windscreen firmly.
— NHAI (@NHAI_Official) April 28, 2026
Holding the FASTag instead of pasting it can lead to blacklisting.#NHAI pic.twitter.com/JdDq4DOJaQ
FASTag New Rules: नियम मोडल्यास भरावा लागेल दंड
जर तुम्ही फास्टॅग अधिकृतपणे दिलेल्या जागेवर चिटकवला नाही, तर तुमचे खाते कायमचे बंद केले जाऊ शकते. म्हणजेच तुम्हाला ब्लॅकलिस्ट केले जाईल.
- दुप्पट टोल: टोल नाक्यावर पोहोचल्यावर जर तुमचा फास्टॅग काम करत नसेल किंवा तो ब्लॅकलिस्ट असेल, तर तुम्हाला रोख स्वरूपात दुप्पट टोल टॅक्स भरावा लागेल.
- वाहतूक कोंडी: जोपर्यंत सिस्टीम फास्टॅगला योग्यरित्या ट्रॅक करत नाही, तोपर्यंत टोलचे गेट उघडणार नाही. यामुळे तुम्हाला आणि मागे असलेल्या इतर वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो.
FASTag New Rules: काय आहे NHAI चा सल्ला?
NHAI ने वाहनधारकांना स्पष्ट सांगितले आहे की, फास्टॅग हा त्याच्या निश्चित केलेल्या जागेवरच म्हणजेच कारच्या पुढील काचेवर (विंडशील्ड) व्यवस्थित चिटकवलेला असावा. तो वारंवार काढणे किंवा लपवून ठेवण्याचा प्रयत्न करणे नियमांच्या विरोधात आहे. असे करणे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या महागात पडू शकते, त्यामुळे वेळीच सावध होऊन आपला फास्टॅग योग्य ठिकाणी चिटकवून घ्या.
हे देखील वाचा – Census 2027: देशात पहिल्यांदाच होणार ‘डिजिटल जनगणना’! मोबाईलवर विचारले जाणार हे 33 प्रश्न; पाहा तुमचे नाव आणि घर कसं नोंदवायचं?










