Volkswagen Taigun Facelift: जर तुम्ही नवीन एसयूव्ही (SUV) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर फॉक्सवॅगनने तुमच्यासाठी एक भन्नाट डील आणली आहे. कंपनीने आपल्या ‘Taigun’ या प्रसिद्ध एसयूव्हीचे नवीन फेसलिफ्ट व्हर्जन अधिकृतपणे भारतीय बाजारात लाँच केले आहे. केवळ सुरक्षितता आणि दमदार परफॉर्मन्सच नाही, तर पैशांच्या बचतीसाठीही ही कार आता एक स्मार्ट गुंतवणूक ठरणार आहे.
Volkswagen Taigun Facelift: किंमत आणि जबरदस्त ‘बायबॅक’ ऑफर
नवीन फॉक्सवॅगन टायगुनची सुरुवातीची किंमत १०.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे. या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कंपनीने दिलेली ७५% बायबॅक गॅरंटी.
- ऑफर काय आहे? जर तुम्ही ही कार खरेदी केली आणि ३ वर्षे किंवा ३०,००० किमी चालवल्यानंतर ती परत केली, तर कंपनी तुम्हाला एक्स-शोरूम किमतीच्या ७५% रक्कम परत देण्याची हमी देत आहे.
- ही ऑफर ३१ मे २०२६ पर्यंतच्या बुकिंगवर लागू आहे.
Volkswagen Taigun Facelift: कसा आहे नवीन लूक आणि डिझाइन?
फेसलिफ्ट मॉडेलमध्ये बाह्य रूपात काही प्रीमियम बदल करण्यात आले आहेत. समोरच्या बाजूला आता इल्युमिनेटेड फॉक्सवॅगन लोगो आणि फुल-विड्थ लाईट बार देण्यात आला आहे. कारला ९ रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आले असून, यात अवाकाडो पर्ल आणि कॉर्बन स्टील मॅट सारखे नवीन रंग लक्ष वेधून घेतात. मागे नवीन एलईडी टेललॅम्प्स आणि वेलकम-गुडबाय ॲनिमेशन फिचर जोडले आहे.
Volkswagen Taigun Facelift: इंजिन आणि परफॉर्मन्स
मॅकॅनिकली या कारमध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे ८-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्स.
- १.० लीटर TSI टर्बो पेट्रोल: ११४ bhp पॉवर आणि १७८ Nm टॉर्क. (६-स्पीड मॅन्युअल आणि ८-स्पीड ऑटोमॅटिक पर्याय)
- १.५ लीटर TSI टर्बो पेट्रोल: १४८ bhp पॉवर आणि २५० Nm टॉर्क. (७-स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक)
केबिन आणि हाय-टेक फीचर्स
कारचे इंटीरियर अधिक प्रीमियम आणि एआय (AI) बेस्ड फीचर्सने सज्ज आहे.
- १०.२५-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि १०.१-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम.
- पॅनोरमिक सनरुफ, ६-वे इलेक्ट्रिक ॲडजस्टेबल व्हेंटिलेटेड सीट्स आणि अपडेटेड एसी सिस्टम.
- ४० हून अधिक कनेक्टेड फीचर्स आणि नवीन ग्राफिक्ससह स्मूथ सॉफ्टवेअर.
सुरक्षिततेत ५-स्टार रेटिंग
फॉक्सवॅगन टायगुन ही सुरक्षिततेसाठी ओळखली जाते. नवीन मॉडेलमध्ये ६ एअरबॅग्ज, ईबीडीसह एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC), ट्रॅक्शन कंट्रोल आणि हिल होल्ड असिस्ट सारखे ४० हून अधिक सेफ्टी फीचर्स दिले आहेत. कंपनी या कारसोबत ४ वर्षे किंवा १ लाख किमीची वॉरंटी आणि ४ वर्षांचे रोडसाइड असिस्टन्स मोफत देत आहे.
हे देखील वाचा –
Modi-Trump Call: मोदी-ट्रम्प यांच्यात 40 मिनिटे खलबतं! ‘या’ महत्त्वाच्या मुद्यांवर झाली चर्चा











