Home / महाराष्ट्र / Shivaji Maharaj Statue in Israel: शिवरायांच्या नौदलात होते ज्यू कमांडर; आता थेट इस्रायलमध्ये उभारला जाणार महाराजांचा भव्य पुतळा

Shivaji Maharaj Statue in Israel: शिवरायांच्या नौदलात होते ज्यू कमांडर; आता थेट इस्रायलमध्ये उभारला जाणार महाराजांचा भव्य पुतळा

Shivaji Maharaj Statue in Israel: ३५० वर्षांपूर्वी ६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. याच ऐतिहासिक ‘शिवराज्याभिषेक...

By: Team Navakal
Shivaji Maharaj Statue in Israel: शिवरायांच्या नौदलात होते ज्यू कमांडर; आता थेट इस्रायलमध्ये उभारला जाणार महाराजांचा भव्य पुतळा
Social + WhatsApp CTA

Shivaji Maharaj Statue in Israel: ३५० वर्षांपूर्वी ६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. याच ऐतिहासिक ‘शिवराज्याभिषेक दिना’चे औचित्य साधून महाराष्ट्रासाठी एक अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. मुंबईतील इस्रायलच्या वाणिज्य दूतावासाने इस्रायलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा केली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (X) पोस्ट शेअर करत या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. हा पुतळा भारत आणि इस्रायल यांच्यातील शतकानुशतके जुन्या मैत्रीचे आणि दोन्ही संस्कृतींमधील अनोख्या संबंधांचे प्रतीक ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.

मराठा साम्राज्याचा आणि ज्यूंचा काय आहे संबंध?

जगभरात ज्यू समाजाला अनेक शतके छळ आणि अत्याचाराचा सामना करावा लागला होता. परंतु, भारत हा अशा मोजक्या देशांपैकी एक आहे, जिथे ज्यू लोक कोणत्याही भीतीशिवाय सन्मानाने राहिले. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर राहणाऱ्या ज्यू समुदायाला ‘बेने इस्रायली’ म्हटले जाते:

  • ‘शनिवार तेली’ ओळख: हे लोक तेल गाळण्याचा आणि किराणा व्यापाराचा व्यवसाय करायचे. मात्र, ज्यू धर्मातील नियमांनुसार ते शनिवारी कामापासून पूर्णपणे दूर राहायचे. यामुळे महाराष्ट्रात त्यांना ‘शनिवार तेली’ म्हणून ओळखले जाऊ लागले. (हिंदू तेल उत्पादक सोमवारी तर मुस्लिम तेल उत्पादक शुक्रवारी विश्रांती घेत असत).
  • मराठी संस्कृतीचा स्वीकार: बेने इस्रायली लोकांनी महाराष्ट्रात राहून मराठी भाषा आत्मसात केली आणि येथील संस्कृतीशी एकरूप झाले.
  • लोकसंख्या: एकेकाळी भारतात ७५,००० च्या आसपास असणारी बेने इस्रायली लोकांची संख्या सध्या जवळपास ५,००० च्या घरात आहे. यातील बहुतांश लोक १९४८ मध्ये इस्रायल देशाची निर्मिती झाल्यानंतर तिथे स्थायिक झाले.

शिवरायांच्या सैन्यात आणि नौदलात ज्यू सैनिकांचे योगदान

फार कमी लोकांना माहीत आहे की, १७ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना बेने इस्रायली बांधवांची युद्धकौशल्याची क्षमता ओळखली होती. महाराजांनी या समाजातील अनेक शूर सैनिकांना आपल्या सैन्यात आणि नौदलात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या.

ऐतिहासिक संदर्भांनुसार, रेव्हरंड जेम्स हेन्री लॉर्ड यांच्या पुस्तकात ‘अॅरॉन चुर्रीकर’ नावाच्या ज्यू अधिकाऱ्याचा उल्लेख आढळतो, ज्यांना मराठा नौदलात ‘नायक’ (नौदल कमांडर) म्हणून नियुक्त करण्यात आले होते आणि त्यांच्या सेवेसाठी जमीनही बहाल करण्यात आली होती. याशिवाय सामजी आणि आबाजी नावाच्या दोन ज्यू भावांनी मराठा नौदलात महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. कोकणातील अनेक किल्ल्यांचे नेतृत्वही ज्यू कुटुंबांतील पूर्वजांकडे होते. पुढे १८ व्या शतकात कान्होजी आंग्रे यांच्या आरमारातही ज्यू सैनिकांनी पराक्रम गाजवला होता.

इस्रायलच्या राजदूतांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

मुंबईतील इस्रायलचे महावाणिज्य दूत यानिब रेवाच यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या मोहिमेची माहिती दिली. “छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इस्रायलमध्ये असणे हे आमच्यासाठी खूप अभिमानास्पद आहे. महाराष्ट्राचा इतिहास आणि इस्रायलमधील ज्यू समाज यांचे खूप जुने नाते आहे. आज इस्रायलमध्ये ५०,००० पेक्षा जास्त बेने इस्रायली लोक राहतात, जे मराठी भाषा आणि खाद्यसंस्कृती आजही जपून आहेत,” असे रेवाच यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

या ऐतिहासिक स्मारकासाठी महाराष्ट्र सरकार पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ब्रिटिश भारतीय सैन्यातही या समाजाने पुढे मोठी कामगिरी केली होती, मात्र शिवरायांच्या काळातील त्यांचे योगदान भारत-इस्रायल मैत्रीची पायाभरणी करणारे मानले जाते.

हे देखील वाचा – PM Ujjwala Yojana: उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा झटका! आता वर्षाला मिळणारे अनुदानित गॅस सिलेंडर थेट केले निम्मे; पाहा नवा नियम

Web Title:
संबंधित बातम्या